राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो समाप्त होईल; मनोज तिवारींनी साधला निशाणा

भाजप खासदार मनोज तिवारी यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. त्यांनी 'राज ठाकरेंसोबत जो जाइल, तो समाप्त होईल' असे म्हटले आहे.

राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो समाप्त होईल; मनोज तिवारींनी साधला निशाणा
Raj And Manoj
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Jul 19, 2025 | 12:51 PM

मराठी आणि हिंदीच्या मुद्यावरून राज्यात चांगलाच वाद पेटला आहे. मिरा-भाईंदर येथे व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मराठीचा मुद्दा उचलून सभा घेतली. या सभेत त्यांनी सरकारवर निशाणा साधला. दरम्यान, मराठीच्या मुद्द्यावरुन अभिनेता, भाजपचे खासदार मनोज तिवारी यांनी राज ठाकरेंना चांगलेच सुनावले आहे. त्यांनी ‘राज ठाकरेंसोबत जो जाइल, तो समाप्त होईल’ असे स्पष्ट म्हटले आहे.

काय म्हणाले मनोज तिवारी?

मनोज तिवारी यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेविषयी प्रश्न विचारताच ते म्हणाले, ‘या देशाची आणि महाराष्ट्राची जी प्रांतीय एकता आहे, जा भाषिक एकता आहे, भाईचारा आहे ते तोडण्याचा प्रयत्न करणारा हा प्राणी आहे. त्यामुळे राज ठाकरेला ज्याला जे बोलायचे आहे ते बोलावे पण कायम एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी जो व्यक्ती राजकारणाच्या कचराकुंडीत गेला आहे त्याला पुन्हा जीवंत करण्याचा प्रयत्न कोणत्याही टीकेने होऊ नये अशी मी प्रार्थना करतो.’

वाचा: राजकीय परिवारात जन्म घेता म्हणून दादागिरीचे लायसन घेऊन येता का?; रोहित पवारांविरुद्ध पोलीस आक्रमक

पुढे ते म्हणाले, ‘यांना महाराष्ट्राची जनता कुठेही उभं करत नाही आणि जे राज ठाकरेसोबत जातील ते देखील महाराष्ट्रात समाप्त होतील. कारण महाराष्ट्र, महाराष्ट्रातील लोक, मराठी भाषाच्या अस्मितेचे पालन भारतीय जनता पार्टी योग्य पद्धतीने करत आहे. त्यांच्या इतका कोणताही मराठी माणूस संस्कृतीचा आदर करु शकत नाही. पण हे लोक तर मराठी संस्कृतीचा अनादर करत आहेत. जसे की राज ठाकरे.’