AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uddhav Thackeray : भाजप मुक्त राम पाहिजे, त्यासाठी उद्धव ठाकरे यांची मोठी घोषणा

Uddhav Thackeray : "पिकविमा का मिळाला नाही? लोकसभेत तोंड उघडू शकता का? गद्दारांना विचारा. राम मंदिर लुटलं जातंय, हे सर्व प्रश्न विचारण्याचं धाडस आहे का गद्दारांना? की गद्दारीने तुमचं रक्त नासलं का?"

Uddhav Thackeray : भाजप मुक्त राम पाहिजे, त्यासाठी उद्धव ठाकरे यांची मोठी घोषणा
Uddhav Thackeray
| Updated on: Jun 27, 2026 | 12:45 PM
Share

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज यवतमाळ दौऱ्यावर आहेत. मागच्या आठवड्यात ठाकरे गटाचे 9 पैकी 6 खासदार फुटले. जे खासदार फुटले, त्या लोकसभा मतदारसंघांच्या दौऱ्यावर उद्धव ठाकरे आहेत. खासदार फुटले म्हणून पक्ष संघटना स्थानिक पातळीवर कमकुवत होऊ नये, शिवसैनिकांचं खच्चीकरण होऊ नये, त्यांच्यामध्ये विश्वास टिकून रहावा यासाठी उद्धव ठाकरे फुटलेल्या खासदारांचे सहाही मतदारसंघ पिंजून काढणार आहेत. आज यवतमाळ मधल्या सभेत बोलताना त्यांनी फुटलेल्या खासदारांचा समाचार घेतलाच. पण भाजपंवरही जोरदार हल्लाबोला केला. अयोध्येत राम मंदिरात दान चोरीचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी उत्तर प्रदेश सरकारने SIT नेमली असून कारवाई सुरु आहे. याच मुद्यावरुन उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला.

“हिंदुंना जागृती आली पाहिजे. आजचा सामनातील अग्रलेख वाचा. मध्ये मध्ये मोर्चा काढणारे झोपले आहेत का? सकल हिंदू समाज वाले कुठे आहेत?. भाजपमुक्त राम पाहिजे. आम्ही त्यासाठी आंदोलन करणार आहोत. या विळख्यातून रामाला सोडवण्यात येणार आहे. भोंदूंपासून सोडवणार आहोत. शिवसेना पहिली ठिणगी महाराष्ट्रात टाकेल” अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी यवतमाळमध्ये केली. त्यांनी निष्ठावंत शिवसैनिकांच्या मेळाव्याला संबोधित केलं.

लोकसभेत तोंड उघडू शकता का? गद्दारांना विचारा

“पिकविमा का मिळाला नाही? लोकसभेत तोंड उघडू शकता का? गद्दारांना विचारा. राम मंदिर लुटलं जातंय, हे सर्व प्रश्न विचारण्याचं धाडस आहे का गद्दारांना? की गद्दारीने तुमचं रक्त नासलं का? शिवसेना का संपवत आहात, कारण त्यांना कुणी प्रश्न विचारू नये म्हणून. शिवसेना प्रश्न विचारते, त्यांना आवडत नाही” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

आपलं हिंदूत्व माणुसकी लुटणारं

“इथे वाघाचं जीवन जगत होते. तिकडे गाढवाचं जीवन जगा. जे लादलं जाईल ते वाहत राहा. शिवसेना ही प्रेम देणारी संघटना आहे. त्याच्या जीवावर सर्व आहेत. मी लढणार आहे. तुम्ही सोबत राहणार की नाही. आपलं हिंदूत्व माणुसकी लुटणारं आहे. मंदीर लुटणारं नाही” असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.

Follow Us
शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करू... पाहणी दौऱ्यादरम्यान फडणवीसांचं
शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करू... पाहणी दौऱ्यादरम्यान CM फडणवीसांचं शेतकऱ्यांना आश्वासन
मुख्यमंत्री थेट शेताच्या बांधावर; शेतकऱ्यांन फोडला हंबरडा, काय घडलं?
CM Fadnavis At Latur : मुख्यमंत्री थेट शेताच्या बांधावर; शेतकऱ्यांन फोडला हंबरडा, काय घडलं?
सणासुदीआधी शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी; राणा जगजीतसिंह पाटील...
सणासुदीआधी शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी; राणा जगजीतसिंह पाटील मुख्यमंत्र्यांना काय म्हणाले?
मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन; फडणवीसांनी..
मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन; फडणवीसांनी सांगितली मोठी माहिती
निवडणूक आयोगाच्या कारभारावर राऊतांचा सवाल; थेट मनमानी केल्याचा आरोप
निवडणूक आयोगाच्या कारभारावर राऊतांचा सवाल; थेट मनमानी केल्याचा आरोप
शिवराज मोटेगावकरबाबत मोठी अपडेट समोर; आदित्य मोटेगावकरला थेट...
शिवराज मोटेगावकरबाबत मोठी अपडेट समोर; आदित्य मोटेगावकरला थेट परीक्षेला बसण्यास बंदी
पुणे लोहगड प्रकरणात धक्कादायक वळण; डिजिटल पुरावे समोर
पुणे लोहगड प्रकरणात धक्कादायक वळण; डिजिटल पुरावे समोर
लालबागच्या राजाच्या चरणी पवार कुटुंब नतमस्तक; पार्थ पवारसह कायनात धर..
लालबागच्या राजाच्या चरणी पवार कुटुंब नतमस्तक; पार्थ पवारसह कायनात धर यांनीही घेतले दर्शन
गेल्या 10 महिन्यांतच 14 वेळा तक्रार, निवडणूक आयोगात अंतर्गत मतभेद...
गेल्या 10 महिन्यांतच 14 वेळा तक्रार, निवडणूक आयोगात अंतर्गत मतभेद, नेमकं प्रकरण काय?
धनुष्यबाण कुणाचं? शिवसेना पक्षचिन्हावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी,
धनुष्यबाण कुणाचं? शिवसेना पक्षचिन्हावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, नेमकं...