राष्ट्रवादी-भाजपचे बडे नेते सांगली दौऱ्यावर, कोणत्या पक्षाचा होणार महापौर?

महापौर गीता सुतार यांची मुदत 21 फेब्रुवारी रोजी संपणार आहे. महापौर पद खुले असल्याने इचुकांची संख्या वाढली आहे.

राष्ट्रवादी-भाजपचे बडे नेते सांगली दौऱ्यावर, कोणत्या पक्षाचा होणार महापौर?
Follow us
| Updated on: Feb 13, 2021 | 10:32 AM

सांगली : महापौर आणि उपमहापौर निवडणूक जाहीर झाल्यानंतर सत्ताधारी भाजपमध्ये हालचाली सुरू झाल्या आहेत. महापौर गीता सुतार यांची मुदत 21 फेब्रुवारी रोजी संपणार आहे. महापौर पद खुले असल्याने इचुकांची संख्या वाढली आहे. सांगली महापालिकेत भाजपची एक हाती सत्ता आहे भाजपचे संख्याबळ अपक्ष धरून 43 आहेत. तर विरोधी पक्ष काँग्रेसचे 19 तर राष्ट्रवादीचे 15 सदस्य आहेत. (BJP state president Chandrakant Patil and NCP state president minister Jayant Patil will be in Sangli on Sunday)

सत्ताधारी भाजपकडून स्वाती शिंदे, युवराज बावडेकर, धिरज सूर्यवंशी, निरंजन आवटी यांची नावे चर्चेत आहेत. भाजपमध्ये इच्छुकांची संख्या ज्यास्त असल्यामुळे खुद्द भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना येउन या ठिकाणी निर्णय घ्यावा लागत आहे. तर राष्ट्रवादीकडून मेनुद्दीन बागवान, दिग्विजय सुर्यवंशी, काँग्रेसकडून उत्तम साखळकर, मंगेश चव्हाण हे इच्छुक आहेत. त्यामुळे भाजपचे वरिष्ठ नेते नेमके कोणाला महापौर पदाची संधी देतात याकडे सर्वांचे लक्ष लावले आहे.

महापौर निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर भाजप आणि विरोधी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये हालचाली गतिमान झाल्या आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मंत्री जयंत पाटील हे येत्या रविवारी सांगली दौऱ्यावर असणार आहेत. भाजप आणि राष्ट्रवादी – काँगेसच्या स्वतंत्र बैठकादेखील यावेळी पार पडणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या बैठकांमध्ये महापौर उमेदवारीवर निर्णय होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, जयंत पाटील यांनी थोड्या वेळा आधीच भाजपवर निशाणा साधला आहे. “भाजपमध्ये बहुजनांना बाहेर काढण्याचं काम केलं जातंय. मागील विधानसभेत भाजपने माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांना तिकीट नाकारलं. नंतर त्यांच्या पत्नींना तिकीट देऊन त्यांना अर्ज भरू नका असं सांगण्यात आलं. बहुजन समाजाच्या नेत्यांना पक्षातून बाहेर काढण्याचं काम भाजपत होत आहे. एकनाथ खडसेंना लक्षात आलं त्यांनी निर्णय घेतला. बावनकुळेंना लक्षात येईल,” असे म्हणत त्यांनी जलसंपदामंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी बावनकुळे यांना अप्रत्यक्षपणे पक्षप्रवेशाची ऑफर दिली. ते ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवरही बोट ठेवले.

“भाजपमध्ये बहुजनांना बाहेर काढण्याचं काम केलं जातंय. मागील विधानसभेत भाजपने माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना तिकीट नाकारलं. त्यांनतर त्यांच्या पत्नीला तिकीट दिलं. त्यांच्या पत्नी अर्ज भरायला गेल्या मात्र त्यांनाही अर्ज भरू नका असं सांगितलं गेलं. बहुजन समाजाच्या नेत्यांना पक्षातून बाहेर काढण्याचं काम भाजपत होत आहे. एकनाथ खडसेंना लक्षात आलं त्यांनी निर्णय घेतला. बावनकुळे यांनाही लक्षात येईल की, पद्धतीने आपल्या नावावर फुल्ली मारली,” असे जयंत पाटील म्हणाले. तसेच, भाजपमध्ये एकदा का नावावर फुली मारली, की ती फुलीच राहते. हे बावनकुळेंना कधीतरी कळेल, असे वक्तव्य केल्याने राष्ट्रवादीची दारं बावनकुळेंसाठी खुली तर नाहीयेत ना?, असा प्रश्न उपस्थित केला जातोय. (BJP state president Chandrakant Patil and NCP state president minister Jayant Patil will be in Sangli on Sunday)

संबंधित बातम्या – 

‘मंत्री फरार..झाला थरार’… पूजा चव्हाणप्रकरणी सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल; गंभीर खुलाशांसह सरकारला विचारले ‘हे’ प्रश्न

पिंपरी चिंचवडचे कर्तव्यदक्ष महापालिका आयुक्त श्रवण हर्डीकर यांची बदली

मुख्यमंत्री अ‍ॅक्शन मोडमध्ये, पूजा चव्हाण प्रकरणाची घेतली माहिती; राठोडांवर कोणत्याही क्षणी कारवाई?

(BJP state president Chandrakant Patil and NCP state president minister Jayant Patil will be in Sangli on Sunday)

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.