AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मंत्री फरार..झाला थरार’… पूजा चव्हाणप्रकरणी सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल; गंभीर खुलाशांसह सरकारला विचारले ‘हे’ प्रश्न

विशेष म्हणजे या पोस्टमध्ये पूजा चव्हाणच्या आत्महत्या प्रकरणाच्या संबंधी अनेक प्रश्न विचारण्यात आले आहेत. (Pooja Chavan suicide case social media)

'मंत्री फरार..झाला थरार'... पूजा चव्हाणप्रकरणी सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल; गंभीर खुलाशांसह सरकारला विचारले 'हे' प्रश्न
पूजा चव्हाण
| Updated on: Feb 13, 2021 | 10:38 AM
Share

यवतमाळ :  पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात भाजपने थेट शिवसेनेचे नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांचं नाव घेतल्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर वनमंत्री संजय राठोड यांच्या विरोधात सोशल मीडियावर अनेक मेसेज व्हायरल होत आहेत. त्यातीलच एका पोस्टमध्ये वनमंत्र्यांना शोधा आणि बक्षिस घेऊन जा, असा संदेश देणारी एक पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. विशेष म्हणजे या पोस्टमध्ये पूजा चव्हाणच्या आत्महत्या प्रकरणाच्या संबंधी अनेक प्रश्न विचारण्यात आले आहेत.

पूजा चव्हाणच्या आत्महत्या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांचे नाव समोर आल्यानंतर त्यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. माध्यमांसमोरही त्यांनी अद्याप कोणतीही भूमिका मांडलेली नाही. त्यामुळे अनेक प्रकारच्या चर्चांना उधाण आले आहे. सोशल मीडियावर तर अनेक प्रकारच्या पोस्ट पाहायला मिळत आहेत. अशाच एका पोस्टमध्ये पूजा चव्हाणने आत्महत्या केल्यानंतर संजय राठोड हे राज्यस्तरीय जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत गैरहजर होते, असे का?, असा सवाल केला आहे. (Pooja Chavan suicide case post going viral on social media asking serious question)

व्हायरल झालेली पोस्ट जशास तशी :

वनमंञ्यांना शोधा.. बक्षिस मिळवा.. मंञी फरार..झाला थरार !

पूजा चव्हाणची आत्महत्या 7 फेब्रवारी रोजी झाली. आत्महत्या झाली आणि सोमवारी अमरावती येथे उपमुख्यमंञी अजित पवार यांच्या राज्यस्तरीय जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत वनमंञी त्यांचा नियोजीत दौरा असूनही गैरहजर होते, असे का ?

बंजारा भाषेत बोलणारा हा मंञी वनमंञीच आहे. ही बाब आता लपवून ठेवता येणार नाही.

खालील बाबी समजुन घ्या.

पूजा चव्हाण आत्महत्या करणार ही बाब वनमंत्र्यांना पूर्वीच माहित होती, हे विधान नक्कीच आश्चर्यजनक आहे. मग आता वनमंञ्याचा आणि पूजा चव्हाण हिचा काय संबंध?, असा प्रश्न सामान्य माणसाला नक्कीच पडणार. तेच तर आता शोधायचे आहे.

आत्महत्या झाल्यावर वनमंञ्यांनी सर्वप्रथम आत्महत्येचा पुरावा सापडू नये म्हणून मोबाईल व लॅपटॉप गायब करण्यासाठी अरुण राठोडला सांगीतले. त्यांनी गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्याचा आदेश दिला. हे सर्व कशासाठी?

येवढेच नाही तर लॅपटॉप आणि मोबाईल इमारतीवर दोरीने चढून काढण्यासाठी सांगीतले. ही सत्यस्थिती असूनही पोलीस मात्र काहीच पावलं उचलत नाहीत. पैशांच्या जोरावर आणि बदनामीच्या नावावर पूजाच्या कुटूंबाचे तोंड दाबण्यात आले. हीसुद्धा या प्रकारणातली सत्य परिस्थिती आहे.

या प्रकरणी पोलीस अधिकारी कुठलीही माहिती देत नसून ते मौन बाळगून आहेत.

हे सर्व कुणाच्या दबावावर? आणि कुणाला वाचविण्यासाठी सुरु आहे? असा प्रश्न आता पडला आहे.

हाच गुन्हा जर इतर कुणी सामान्य माणसांनी केला असता तर पोलिसांनी संबंधित व्यक्तीला उचलून रिमांडवर घेतले असते.

आताही वेळ गेलेली नाही. पोलीस विभागाने आपला धर्म पाळला तर त्यांच्यापासून कुणीही वाचणार नाही. त्यांनी फक्त खालील बाबी तपासाव्या.

1) पूजा आणि या मंत्र्यांचे कॉल डिटेल चेक करावे.

2) व्हॉट्सअ‌ॅप तसेच मॅसेज चेक करावे.

3) दोन्ही मोबाईल एकाच स्थळी केव्हा राहिले, हे तपासावे. त्यानंतर सत्य समोर आल्याशिवाय राहणार नाही.

4) अरुण राठोडला अटक करुन त्याची झाडाझडती घ्यावी.

एक कॅबिनेट दर्जाचा मंत्री आपली सर्व प्रकारची सुरक्षा आणि ताफा सोडून कुठे लपून बसला आहे हे न उलगडणारे कोडे निश्चितच आहे.

आता प्रश्न असा पडतो की, हे सर्व सुर्यप्रकाशासारखे स्वच्छ असूनही या प्रकरणात सरकारदरबारी सर्व काही चिडीचूप का आहे?

आता कुठे गेला मुख्यमंञी उद्धव ठाकरे यांचा राजधर्म ?

दरम्यान, पूजा चव्हाणने आत्महत्या केल्यानंतर वरील पोस्ट व्हायरल होत आहे. पोस्टमध्ये विचारलेल्या प्रश्नांची दखल घेण्याचाही मागणी केली जात आहे. या आत्महत्या प्रकरणात सरकार काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

संबंधित बातम्या :

मुख्यमंत्री अ‍ॅक्शन मोडमध्ये, पूजा चव्हाण प्रकरणाची घेतली माहिती; राठोडांवर कोणत्याही क्षणी कारवाई?

एका मुलीची आत्महत्या, कथित मंत्र्याचं नाव, 11 ऑडिओ क्लिप, ऐका प्रत्येक क्लीप; वाचा शब्द न् शब्द जशास तसा!

मलाच जीव द्यावा लागेल, असं कथित मंत्री का म्हणाला?; पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण गळ्याचा फास ठरणार?

(Pooja Chavan suicide case post going viral on social media asking serious question)

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...