2024 ला मोदी 400 च्या क्रॉस, काँग्रेसला मात्र बसमध्ये बसवून नेता येतील एवढेच खासदार मिळणार, चंद्रकांत पाटलांनी काँग्रेसला डिवचलं

| Updated on: Jan 07, 2021 | 4:14 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेले निर्णय पाहता 2024 च्या निवडणुकीमध्ये भाजप 400 चा आकडा क्रॉस करणार, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला. (2024 elections Chandrakant Patil)

2024 ला मोदी 400 च्या क्रॉस, काँग्रेसला मात्र बसमध्ये बसवून नेता येतील एवढेच खासदार मिळणार, चंद्रकांत पाटलांनी काँग्रेसला डिवचलं
चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष भाजप
Follow us on

सिंधुदुर्ग : “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेले निर्णय पाहता 2024 च्या निवडणुकीमध्ये भाजप 400 चा आकडा क्रॉस करणार. काँग्रेसला मात्र एका बसमध्ये बसवून नेता येईल येवढेच खासदार मिळणार” असा दावा करत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसचा डिवचलं आहे. ते कणकवलीमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या राजकीय मुद्द्यांना हात घालत काँग्रेसला धारेवर धरलं.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेले निर्णय पाहता 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 400 पेक्षा जास्त मिळतील. भाजप 400 चा आकडा क्रॉस करेल. तर दुसरीकडे काँग्रेसला मात्र एका बसमध्ये बसवून नेता येतील इतकेच खासदार मिळतील,” असे चंद्रकांत पाटील म्हणाले. तसेच महाविकास आघाडीच्या अस्तित्वाबाबतही त्यांनी यावेळी भाष्य केले. राज्यात सत्तेत असलेल्या तिन्ही पक्षांना आपण किती दिवस सत्तेत राहू हे माहिती असल्याचे म्हणत त्यांनी आघाडी सरकार जास्त काळ टिकणार नसल्याचे सूतोवाच केले.

संपूर्ण देशांच कृषी कायद्यांना समर्थन

यावेळी बोलताना त्यांनी केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांचे समर्थन केले. “संपूर्ण देशाने कृषी कायद्यांचे समर्थन केले आहे. हे कायदे सहा महिन्यांपूर्वी झाले. मात्र विरोधकांना आता जाग आली आहे. एका राज्यातली मूठभर लोकांच्या साथीने हे आंदोलन केले जात आहे,” असे विधान चंद्रकांत पाटलांनी केले. तसेच, संपूर्ण देश या कायद्याचं समर्थन करतो आहे, हे दाखवण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.

तसेच, नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य शेतकऱ्यांचा विचार केला. त्यामुळे त्यांना विरोध केला जातोय असा आरोप चंद्रकांत पाटलांनी विरोधकांवर केला. “शेतमाल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर विकण्याचा कायदा काँग्रेसने तीन वेळा आणण्याचा प्रयत्न केला. आता शेतकऱ्यांना फसवले जात असल्याचा आरोप ते करत आहेत,” असे म्हणत शेतकऱ्यांना वेडे समजता का?, असे खडे बोल त्यांनी विरोधकांनी सुनावले. तसेच, मोदींनी शेतकरी हिताचे कायदे केले. त्यामुळेच त्यांना विरोध होतोय असं चंद्रकात पाटील म्हणाले.

संंबंधित बातम्या :

शिवसेनेच्या ‘त्या’ इशाऱ्यानंतरही राष्ट्रवादीकडून ‘पारनेर पॅटर्न’ची पुनरावृत्ती; आता उद्धव ठाकरे काय करणार?

केशवा, फसवापासून ते धोंडा आणि कोंडापर्यंत; भाजप-काँग्रेस नेत्यांची ट्विटरवर जोरदार जुगलबंदी

“औरंगाबादचं नाव बदलायला सांगितलं यांनी विमानतळाचं बदललं, मग तुम्हाला मुख्यमंत्रीऐवजी सरपंच म्हणू का?”