AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केशवा, फसवापासून ते धोंडा आणि कोंडापर्यंत; भाजप-काँग्रेस नेत्यांची ट्विटरवर जोरदार जुगलबंदी

उत्तर-प्रत्युत्तराची अशीच एक जुगलबंदी केशव उपाध्ये आणि सचीन सावंत यांच्यात रंगली आहे. (Sachin sawant keshav upadhye)

केशवा, फसवापासून ते धोंडा आणि कोंडापर्यंत; भाजप-काँग्रेस नेत्यांची ट्विटरवर जोरदार जुगलबंदी
| Updated on: Jan 07, 2021 | 2:00 PM
Share

मुंबई : बांधकाम विकासकांना प्रीमियममध्ये 50% सवलत देण्याचा प्रस्ताव मंजूर केल्यानंतर महाविकास आघाडीवर भाजपकडून टीका होत आहे. महाविकास आघाडीचे सरकार हे विकासक धार्जिणे असल्याचा आरोप भाजपकडून केला जातोय. या टीकेला महाविकास आघाडीच्या नेत्यांकडूनही तेवढ्याच ताकदीने उत्तर दिले जात आहे. ट्विटरवर तर खास काव्यात्मक शैलीमध्ये एकमेकांवर प्रहार केले जात आहेत. उत्तर-प्रत्युत्तराची अशीच एक जुगलबंदी केशव उपाध्ये आणि सचिन सावंत यांच्यात रंगली आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ‘उद्धवा अजब तुझे सरकार’ म्हणत खास अशा काव्यमय शैलीत ठाकरे सरकारवर टीका केली. तर दुसरीकडे काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनीसुद्धा ‘ राज्यातला बापडा समाधानी असून, महाविकास आघाडीच छे आपडा’ म्हणत असल्याचे त्याच काव्यमय शैलीत उपाध्ये यांना उत्तर दिले आहे. (Sachin sawant and keshav upadhye poetic criticism to each other)

केशव उपाध्ये यांची टीका

केशव उपाध्ये यांनी सरकार कंत्राटदार, आणि विकासक धार्जिणे असल्याची टीका केली आहे. राज्यातील नागरिकांच्या नशिबी कोंडा आला असून कंत्राटदारांना मात्र मणीहार घातला जातोय, असं उपाध्ये यांनी काव्यमय शैलीत म्हटलं आहे. तसेच ‘उद्धवा अजब तुझे सरकार’ असे म्हणत त्यांनी मंत्र्यांच्या गाड्यंना सरकार पैसे देतं. कंत्राटदारांची बिलं द्यायला सरकारकडे पैसै आहेत. मात्र, मुंबईकरांना मालमत्ता करात सवलत मिळत नाही. वेगवेगळ्या सामाजिक घटकांना मदत मिळत नसल्याची, टीका केली आहे.

केशव उपाध्ये यांची टीका

इथे नागरिकांच्या नशिबी कोंडा कंत्राटदांराना मणीहार उध्दवा अजब तुझ सरकार गोरगरीब जनता इथे उपाशी बिल्डरांना मात्र मणीहार उध्दवा अजब तुझे सरकार

सचीन सांवत यांचे चोख उत्तर

केशव उपाध्ये यांनी टीका केल्यानंतर काँग्रेस प्रवक्ते सचीन सावंत यांनी महाविकास आघाडीवर केलेल्या टीकेला त्याच काव्यमय शैलीत उत्तर दिलं आहे. त्यांनी केशव उपाध्ये यांना ‘केशवा’ असे संबोधून उपाध्ये यांचा शब्दच्छल फसवा असल्याचे म्हटले आहे. तसेच, हे सरकार अजब नसून, गजब आहे असल्याचा दावा त्यांनी केलाय. तसेच महाविकास आघाडीचे सरकार हे जनतेला रोजगार देणार आहे. या सरकारमुळे जनता समाधानी आहे. जनतेच्या मनात महाविकास आघाडीचे सरकार आपले असल्याची भावाना असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. यासाठी त्यांनी खास गुजराती भाषेचा वापर करुन जनता ‘समाधानी आज राज्यातला बापडा, म्हणतोय मविआ छे आपडा’ असं म्हटलंय. तसेच, शेवटी मोदी सरकारमुळे देशातील करोडो लोक बेरोजगार झाल्याचा आरोपही त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला आहे.

सचीन सावंत यांचे काव्यात्मक उत्तर

उघड डोळे बघ नीट केशवा, तुझा शब्दच्छल आहे फसवा अरे अजब नव्हे, गजब आहे हे सरकार, नाठाळांच्या माथी धोंडा अन् जनतेला मणिहार मोदी कृपेने करोडो झाले बेरोजगार भाजपासाठी बिल्डर असे मलिदा, आमच्यासाठी बांधकाम क्षेत्र जनतेला रोजगार समाधानी आज राज्यातला बापडा, म्हणतोय, मविआ ‘छे आपडा’

दरम्यान, केशव उपाध्ये यांची टीका आणि सचीन सावंत यांनी त्याच शैलीत उपाध्ये यांच्या टीकेला दिलेले उत्तर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

संबंधित बातम्या :

आमच्यावर टीका केल्याशिवाय ते महाराष्ट्रात मोठे होऊ शकत नाहीत : गुलाबराव पाटील

ठाकरे सरकार बिल्डरधार्जिणे म्हणणाऱ्या भाजपला काँग्रेसचं जोरदार प्रत्युत्तर

‘त्या’ निर्णयाचा सामान्य ग्राहकांना कोणताही लाभ नाही; देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा

(Sachin sawant and keshav upadhye poetic criticism to each other)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.