या फोटोत प्रवीण दरेकर कुठे आहेत? फडणवीसांच्या सत्काराप्रसंगीचा फोटो व्हायरल?

उत्तर प्रदेश, मणिपूर, गोवा आणि उत्तराखंड या चारही राज्यात भाजपने दणदणीत विजय मिळविला आहे. त्यामुळे भाजपमध्ये जोश आणि उत्साह संचारला आहे. भाजपच्या मुख्यालयासमोर भाजप कार्यकर्त्यांनी हा विजय जल्लोषात साजरा केला.

या फोटोत प्रवीण दरेकर कुठे आहेत? फडणवीसांच्या सत्काराप्रसंगीचा फोटो व्हायरल?
या फोटोत प्रवीण दरेकर कुठे आहेत? फडणवीसांच्या सत्काराप्रसंगीचा फोटो व्हायरल?Image Credit source: facebook
Follow us
| Updated on: Mar 11, 2022 | 1:38 PM

मुंबई: उत्तर प्रदेश, मणिपूर, गोवा आणि उत्तराखंड (uttarakhand)  या चारही राज्यात भाजपने (bjp) दणदणीत विजय मिळविला आहे. त्यामुळे भाजपमध्ये जोश आणि उत्साह संचारला आहे. भाजपच्या मुख्यालयासमोर भाजप कार्यकर्त्यांनी हा विजय जल्लोषात साजरा केला. कार्यकर्त्यांना उत्साह इतका होता की ते पाहून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनीही ढोलाच्या तालावर ठेका धरला. त्यांच्यासोबत आमदार आशिष शेलार, नितेश राणे आणि इतर नेत्यांनी ताल धरला. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा ताफा आल्यानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. त्यानंतर भला मोठा गुच्छ घालून फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी इतरही भाजपचे नेते उपस्थित होते. त्याचा फोटोही व्हायरल झाला आहे. मात्र, या फोटोत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर कॉर्नरला गेल्याचं दिसत आहे. त्यामुळे कुठे आहे प्रवीण दरेकर? अशी कॅप्शन देऊन हा फोटो व्हायरल होताना दिसत आहे.

चार राज्यातील निकालाने भाजप आणखीनच मजबूत झाल्याचं दिसत आहे. तर गोव्यातील विजयामुळे देवेंद्र फडणवीस यांचं पक्षातील स्थान अधिकच मजबूत झाल्याचं दिसून येत आहे. फडणवीस हे निवडणूक काळात भाजपचे गोव्याचे प्रभारी होते. त्यांच्याच नेतृत्वात या निवडणुका लढवल्या गेल्या. या काळात फडणवीस गोव्यात ठाण मांडून बसले होते. त्यांनी पक्षातील अंतर्गत वाद रोखतानाच पक्षातून फुटून कोणीही दुसऱ्या पक्षात जाणार नाही याची काळजी घेतली. तसेच निवडणूक प्रचाराचं अचूक नियोजन करून घराघरात भाजप पोहोचवण्यात यश मिळवलं. त्यामुळे गोव्यात भाजपचा विजय झाला. गोव्यात भाजपच्या 20 जागा निवडून आल्या आहेत. मागच्यावेळी ही संख्या 21 होती. मात्र मागच्यावेळी भाजप युती करून लढला होता. यावेळी भाजप स्वबळावर लढला होता. त्यामुळे हा भाजपचा निर्विवाद विजय असल्याचं अधोरेखित झालं आहे. तसेच भाजपच्या मतांच्या टक्केवारीतही वाढ झाली आहे. त्यामुळे फडणवीस यांचं पक्षातील स्थान मजबूत झालेलं दिसत आहे.

व्हायरल फोटोत काय?

फडणवीस यांच्यामुळे गोवा राखता आल्याने गोव्याच्या विजयाचं सेलिब्रेशन भाजप कार्यकर्त्यांनी केलं. तसेच फडणवीसांचा जाहीर सत्कारही केला. एक भला मोठा हार घालून फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या गळ्यात हा हार घालण्यात आला. त्याचा फोटो व्हायरल झाला आहे. मुनगंटीवार यांच्या बाजूला प्रवीण दरेकर दिसत आहेत. त्यांचा चेहरा पूर्ण दिसत नाही. हा फोटो काही लोकांनी फेसबूक आणि इतर सोशल माध्यमांवर शेअर केला आहे. प्रवीण दरेकरांना शोधून दाखवा? असं हेडिंग देऊन त्यांचा फोटो व्हायरल केला गेला आहे. त्यावर काही नेटकऱ्यांच्या मजेदार प्रतिक्रिया आल्या आहेत. एकाने दरेकर यांचे फक्त डोळेच दिसत असल्याचं म्हटलं आहे. तर दुसऱ्याने दरेकरांचं फक्त नाकच दिसत असल्याचं म्हटलं आहे.

संबंधित बातम्या:

शिवसेनेमुळे भाजप उमेदवाराचा उत्तर प्रदेशात अवघ्या 771 मतांनी पराभव, शिवसेनेचा पहिला झटका; सेना भाजपला आव्हान ठरतंय?

VIDEO | देवेंद्र फडणवीस 10-20 शरद पवार खिशात घालून फिरतात; भाजप नेते पडळकरांची बोचरी टीका

अंबरनाथ पालिकेची प्रभाग रचना जाहीर,नव्या रचनेत शहरात दोन वॉर्ड वाढले; इच्छुकांमध्ये नाराजी

Non Stop LIVE Update
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.