अमावस्येच्या रात्री सतेज पाटलांच्या घराबाहेर काळी बाहुली

कोल्हापूर: कोल्हापुरातील काँग्रेसचे नेते आणि विधानपरिषदेचे आमदार सतेज पाटील यांच्या निवासस्थानी भानामतीचा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. बावडा येथील राहत्या घरासमोर काही झाडं आहेत. यापैकी एका झाडाला काळी बाहुली दोऱ्यानं बांधून ठेवल्याचं पाहायला मिळालं. गेल्या आठ दिवसांमध्ये असा प्रकार दोन वेळा घडला आहे. सतेज पाटील यांच्या कसबा बवड्यातील ‘यशवंत’ या निवासस्थानी अमावस्येच्या रात्री अज्ञाताने हे …

अमावस्येच्या रात्री सतेज पाटलांच्या घराबाहेर काळी बाहुली

कोल्हापूर: कोल्हापुरातील काँग्रेसचे नेते आणि विधानपरिषदेचे आमदार सतेज पाटील यांच्या निवासस्थानी भानामतीचा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. बावडा येथील राहत्या घरासमोर काही झाडं आहेत. यापैकी एका झाडाला काळी बाहुली दोऱ्यानं बांधून ठेवल्याचं पाहायला मिळालं. गेल्या आठ दिवसांमध्ये असा प्रकार दोन वेळा घडला आहे.

सतेज पाटील यांच्या कसबा बवड्यातील ‘यशवंत’ या निवासस्थानी अमावस्येच्या रात्री अज्ञाताने हे कृत्य केलं. पांढऱ्या कपड्यात गुंडाळून काळी बाहुली झाडाला टांगण्यात आल्याचा  प्रकार उघडकीस आला.

त्यामुळं आमदार सतेज पाटील यांच्या घरासमोर घडलेल्या प्रकाराची चर्चा शहरात सुरु झाली आहे. ही बाहुली नेमकी कुणी बांधली,त्यामागे काय उद्देश होता, याला निवडणुकीचा काही संदर्भ आहे का? याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. मात्र सतेज पाटील यांच्या घराच्या संरक्षण भिंतीवर आता सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचं काम सुरु झालं आहे.

कोल्हापूर जिल्हा हा पुरोगामी जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र आता असे प्रकार घडल्यानं कोल्हापूरच्या पुरोगामीपणावर ठपका पडत आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *