AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एसटीत आता ब्लाईंड स्पॉट कॅमेरे लागणार, संपूर्ण 360 अंशातून निगराणी होणार

एसटीमध्ये आमुलाग्र बदल करण्याचा ध्यास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला आहे. त्यांच्या प्रयत्नाला महाराष्ट्र शासनाची योग्य ती साथ लाभेल याची मी यावेळी ग्वाही देतो असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

एसटीत आता ब्लाईंड स्पॉट कॅमेरे लागणार, संपूर्ण 360 अंशातून निगराणी होणार
| Updated on: May 28, 2025 | 3:43 PM
Share

एसटी महामंडळाच्या नव्या  बसेस मध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी खास ब्लाइंड स्पॉट कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यामुळे हे कॅमेरे 360 अंशातून निगराणी करणार आहेत. त्यामुळे एसटीच्या येणाऱ्या नवीन बसेस प्रवासासाठी अधिक सुरक्षित असतील असे मत उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. ते ठाण्यात एआय तंत्रज्ञानावर आधारित सुरक्षा प्रणाली बसवलेल्या स्मार्ट एसटी बसेसची पाहणी करताना बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष  प्रताप सरनाईक आणि एसटीचे अधिकारी उपस्थित होते

एआय तंत्रज्ञानावर आधारित ” एकात्मिक सुरक्षा प्रणाली “

उपमुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, सध्या दररोज सरासरी ५५ लाख प्रवाशांना दळणवळण सेवा देणारी एसटी भविष्यात अधिक सुरक्षित झाली पाहिजे, या उद्देशाने एआय तंत्रज्ञानावर आधारित ” एकात्मिक सुरक्षा प्रणाली ” नव्या बसेस ना बसविण्यात येणार आहे. चालकाच्या बस चालवण्याच्या पद्धतीपासून बसमध्ये बसलेल्या प्रवाशांच्या हालचालीवर देखरेख करणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेरा बरोबरच मनोरंजनासाठी वायफाय, जाहिरात प्रसारासाठी एलईडी स्क्रीन, तसेच जीपीएस प्रणाली सह फोम बेस आग प्रतिबंधक प्रणाली देखील बसविण्यात येणार आहे.

परिवहन मंत्री आग्रही होते

या स्मार्ट बसेस बनवण्यासाठी एसटी महामंडळाचे अध्यक्ष आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे आग्रही होते. त्यांच्या सातत्य पुर्ण प्रयत्नांचे कौतुक करावं तितकेच थोडंच आहे असेही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. कारण त्यांनी भविष्याचा विचार करून  एसटीमध्ये आमुलाग्र बदल करण्याचा ध्यास घेतला आहे. त्यांच्या प्रयत्नाला महाराष्ट्र शासनाची योग्य ती साथ लाभेल याची मी यावेळी ग्वाही देतो असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

स्मार्ट बसची वैशिष्ट्ये..

प्रगत ड्रायव्हर सहाय्य प्रणाली (ADAS) आणि ड्रायव्हर मॉनिटरिंग कॅमेरा – समोरून होणाऱ्या धडकेची सूचना, लेन बदलण्याची सूचना, ड्रायव्हर स्थिती निरीक्षण, पादचाऱ्यांशी होणाऱ्या धडकेची सूचना इत्यादी सुविधा.

ब्लाइंड स्पॉट कॅमेरे: संपूर्ण 360 अंश कॅमेरे ( समोर, मागे, उजवीकडे 180 अंश आणि डावीकडे 180 अंश )

व्हिडीओ निरीक्षणासाठी कॅमेरे: प्रवाशांसाठी आत 2 कॅमेरे, समोरील कॅमेरा, मागील कॅमेरा

प्रवासी मोजणी सेन्सरची सुविधा

कॅमेर्‍यांच्या दृश्यांसह ड्रायव्हर सहाय्य स्क्रीन

4G आणि GPS ट्रॅकिंग आणि  स्टोरेजसह मोबाइल NVR प्रणाली

जाहिराती आणि मार्ग प्रदर्शनासाठी LCD स्क्रीन

मार्ग प्रदर्शनासाठी तीन LED स्क्रीन ( समोर, बाजूला आणि मागे )

बसमध्ये सूचना देण्यासाठी सार्वजनिक घोषणा प्रणाली

Follow Us
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल