
BMC Election 2026: महाराष्ट्रात महानगरपालिकेच्या निकालानंतर भाजप पुन्हा एकदा मोठा पक्ष ठरला आहे. अनेक ठिकाणी भाजप बहूमतांनी जिंकून आला आहे. आता मुंबईत देखील भाजपने बहुमत मिळवलं आहे. बीएमसी निवडणुकीत सत्ता संतुलन पूर्णपणे भाजप-एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेच्या बाजूने होतं. भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेने 118 जागा जिंकल्या. भाजपने 89 जागा जिंकल्या, तर शिंदे गटाने 29 जागा जिंकल्या. तर मनसे पक्षाचे फक्त 6 उमेदवार जिंकले आहेत. मुंबई हरल्यानंतर भाजपने राज ठाकरेंच्या जिव्हारी लागेल असा बाण चालवला आहे.
निवडणुकांचे निकाल घोषित झाल्यानंतर सोशल मीडियावर एक गोष्ट सर्वत्र ट्रेन्ड करत आहे आणि ती गोष्ट म्हणजे ‘रसमलाई…’, यामागे कारण देखील तसं आहे. सांगायचं झालं तर, निवडणुकींच्या प्रचारा दरम्यान, तामिळनाडू भाजपचे माजी अध्यक्ष अन्नामलाई मुंबईत दाखल झाले. तेव्हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रसमलईच्या व्यंगाने त्यांचे स्वागत केलं. आता निकाल समोर आले आणि राज ठाकरे यांच्या पक्षाला अनेक ठिकाणी खातं देखील खोलता आलं नाही. तर ज्याठिकाणी अन्नामलाई यांनी प्रचार केला, तेथील उमेदवार निवडून आले आहेत.
Mumbai Municipal Election Results 2026 : उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवली मनातील खंत...
BMC Election Results 2026 : उद्धव ठाकरे यांचे महापाैर पदाबद्दल अत्यंत मोठे विधान...
AIMIM BMC Election 2026 : BMC मध्ये भाजपला सपोर्ट करणार की उद्धव ठाकरेंना? असदुद्दीन ओवैसींनी काय उत्तर दिलं?
Mumbai Election Result 2026 : संजय राऊत यांनी गद्दार, खुद्दार विश्लेषण करणं कमी करावं - प्रवीण दरेकर
पिंपरी चिंचवडमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष, आकडे बहुतमापेक्षाही अधिक
सोलापूरच्या निवडणुकीत पैशाचा आणि सत्तेचा गैरवापर करून भाजपचा विजय : अमोल बापू शिंदे यांची टीका
निवडणुकीचे निकाल येताच, परिस्थिती बदलली. राज ठाकरेंच्या मनसे पक्षाची कामगिरी निराशाजनक झाली, तर अन्नामलाई यांनी ज्या भागात सभा घेतल्या त्या भागात भाजपने दणदणीत विजय मिळवला. आता भाजप ओडिशाचे नेते पीसी मोहन यांनी इंस्टाग्रामवर रसमलईचा फोटो शेअर केला आणि लिहिले, “काही रसमलई ऑर्डर केली.”
रसमलाई वादाची सुरुवार निवडणूक प्रचारा दरम्यान झाली. तामिळनाडू भाजपचे ज्येष्ठ नेते के. अन्नामलाई प्रचारासाठी मुंबईला आले तेव्हा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांच्यावर टीका केली. अन्नामलाई यांच्या नावाची खिल्ली उडवत एका सभेत राज ठाकरे म्हणालेले, ‘भाजप आता रसमलाई बोलत आहे…’, राज ठाकरे यांना असं म्हणायचं होतं की, महाराष्ट्राच्या निवडणुकीत दक्षिण भारतातील नेत्याचं काय काम?
सांगायचं झालं तर, निकालानंतर सोशल मीडियावर रसमलाई ट्रेन्ड करत आहे. #Rasmalai आणि #Annamalai हे दोन हॅशटॅग व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर अनेक मिम्स व्हायरल होत आहेत.