
देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी काल मतदान झालं. आज सकाळपासूनच मतमोजणीला सुरूवात झाला.दिवस जसजसा वर चढत गेला मुंबईत भाजप-शिंदे गटाची सरशी होताना दिसू लागली. मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने शतक पूर्ण केलं असून 106 जागांवर आघाडीवर आहेत. त्यामुळे 114 जागांची मॅजिक फिगर गाठून महापालिकेवर भगवा फडकावण्यासाठी त्यांना आता फक्त 06 जागांची गरज आहे. तर 20 वर्षांनी एकत्र आलेले राज व ठाकरे बंधू यांनीही युती करत मुंबई महापालिकेची निवडणूक लढवली खरी, पण ते केवळ 67 जागा मिळवू शकले आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेची सत्ता आता भाजप-शिंदे गटाच्या हातात जाणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.
हाती आलेल्या कलांनुसार, भारतीय जनता पक्ष 85, शिवसेना 21, मनसे 9, शिवसेना ठाकरे गट 58 जागांवर आघाडीवर अशी आकडेवारी समोर आली आहे. 80हून अधिक जागांमुळे भारतीय जनता पक्ष हा मुंबईतील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजप आणि शिंदे गटाने मिळून शकत गाठलं असून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची युती हीच मुंबई पालिकेत सत्तेत असेल हेच हे आकडे दर्शवत आहेत.
Latur Nagarsevak Election Results 2026 : लातूर महापालिकेतून हैराण करणारी अपडेट...
Maharashtra Election Results 2026 : मालेगावात चर्चेत नसलेल्या पक्षाची थेट धमाकेदार कामगिरी...
Mumbai Election Results Live 2026 : वॉर्ड क्रमांक 166, 73 चा निकाल काय?
Mumbai Election Results Live 2026 : वॉर्ड क्रमांक 147, चारचा निकाल काय?
Sangli Municipal Election Results 2026 : सांगली महापालिका प्रभाग 13 चा निकाल समोर
Solapur Municipal Election Results 2026 : सोलापूर प्रभाग 11 चा निकाल समोर, भाजचे सर्व उमेदवार विजयी
ठाकरे बंधूंची भावनिक साद, मतदारांची मात्र पाठ
महाराष्ट्रासमोर आमच्यातले वाद शुल्लक आहोत. महाराष्ट्रासाठी, मराठीसाठी आम्ही एकत्र आलो आहोत असे सांगत राज व ठाकरे पर्यायाने मनसे-शिवसेना महापालिका निवडणुकीत एकत्र आलेली दिसली. मुंबई वाचवा असा नारा देत, मराठी अस्मितेचा मुद्दा लावून धरत दोन्ही ठाकरे बंधूंनी मतदारांना भावनिक सादही घातली. मात्र त्यांचा करिश्मा फारसा चाललेला नाही. ठाकरे बंधू आणि शरद पवार यांनी एकत्र निवडणूक लढवून सुद्धा त्यांना केवळ 67 जागांवर समाधान मानावे लागल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे. त्यामुळे मनसे, म्हणजेच राज ठाकरे यांना एकत्र घेऊनही उद्धव ठाकरे यांना फारसा फायदा मिळाल्याचे दिसत नाहीये. ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
मुंबईतील विजयी उमेदवार
प्रभाग क्रमांक- 50 – भाजपचे विक्रम राजपूत विजयी
प्रभाग क्रमांक- 52 – भाजपच्या प्रीती साटम विजयी
प्रभाग क्रमांक – 33 काँग्रेसचे मोईन सिद्दिकी विजयी
प्रभाग क्रमांक – 1 शिवसेनेच्या रेखा यादव विजयी
प्रभाग क्रमांक – 135 भाजपचे नवनाथ बन विजयी
प्रभाग क्रमांक – 215 भाजपचे संतोष ढोले
प्रभाग क्रमांक – 214 भाजपचे अजय पाटील विजयी
प्रभाग क्रमांक – 19 भाजपचे प्रकाश तावडे विजयी
प्रभाग क्रमांक – 123 शिवसेना ठाकरे गटाचे सुनील मोरे विजयी
प्रभाग क्रमांक – 50 भाजपचे विक्रम राजपूत विजयी
प्रभाग क्रमांक – 20 भाजपचे दीपक तावडे विजयी