AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकनाथ शिंदेनी नगरसेवक हलवताच देवेंद्र फडणवीस मैदानात, महापौर कोणाचा? स्पष्टच सांगितलं

मुंबई महानगरपालिकेत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर आता महापौर कोणाचा होणार? नगरसेवकांच्या पळवापळवीच्या चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली महत्त्वाची प्रतिक्रिया आणि महायुतीचा सत्तेचा फॉर्म्युला जाणून घ्या

एकनाथ शिंदेनी नगरसेवक हलवताच देवेंद्र फडणवीस मैदानात, महापौर कोणाचा? स्पष्टच सांगितलं
eknath shinde devendra fadnavis
| Updated on: Jan 18, 2026 | 12:19 PM
Share

मुंबई महानगरपालिकेच्या २२७ जागांपैकी महायुतीने ११८ जागा जिंकून बहुमताचा ११४ हा आकडा पार केला. आता मुंबई महापालिकेच्या सत्तेच्या चाव्या कुणाकडे राहणार? आता महापौर कोणाचा होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेषतः महापौरपदावरून महायुतीमधील घटक पक्षांमध्ये भाजप, शिवसेना-शिंदे गट आणि राष्ट्रवादी-अजित पवार गट यांच्यात छुपी स्पर्धा सुरू असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्याच आता मुंबईत नगरसेवकांच्या फोडाफोडीच्या राजकारण सुरु असल्याचे दिसत आहे. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आमच्याकडे स्पष्ट बहुमत

मुंबई महापालिकेत निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने आपल्या नगरसेवकांना हॉटेलमध्ये हलवल्यामुळे पळवापळवीच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. यावर देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली. आम्ही ज्याप्रमाणे आमच्या नगरसेवकांना एकत्र बोलावले, तसेच शिंदेंनीही केले असेल. मात्र, आता आम्हाला कोणत्याही पळवापळवीची आवश्यकता नाही. आमच्याकडे स्पष्ट बहुमत आहे आणि महायुती म्हणून आम्ही भक्कम आहोत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आता कुठेही पळवापळवी होणार नाही

महायुतीमधील तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते एकत्र बसून मुंबईच्या सत्तेचा फॉर्म्युला ठरवतील. यामध्ये केवळ महापौरपदच नाही, तर उपमहापौर आणि महत्त्वाच्या वैधानिक समित्यांचे स्थायी समिती, सुधार समिती इत्यादी अध्यक्षपद कोणाला द्यायचे, याचे गणित मांडले जाईल. आम्ही पोरखेळ होऊ देणार नाही, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच आता कुठेही पळवापळवी होणार नाही, असेही देवेंद्र फडणवीसांनी म्हटले.

सर्व निर्णय खेळीमेळीने घेऊ

शिंदे गटाकडून मुंबईत अडीच वर्षे महापौरपद मिळावे, अशी मागणी होत असल्याच्या चर्चा आहेत. यावर देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टपणे उत्तर दिले. मी आणि शिंदे साहेब एकत्र बसू आणि सर्व निर्णय खेळीमेळीने घेऊ, दोन्ही पक्षांमध्ये कोणतेही मतभेद होणार नाहीत आणि आम्ही मिळून मुंबईचा विकास करू, असे त्यांनी स्पष्ट केले.

मुंबई महानगरपालिका गेली अनेक दशके शिवसेना ठाकरे गटाच्या ताब्यात होती. आता शिंदे गट आणि भाजपला एकत्र येऊन हे वर्चस्व मोडीत काढायचे आहे. अशा वेळी जर महायुतीतच फूट पडली, तर त्याचा फायदा विरोधकांना महाविकास आघाडी होऊ शकतो. ही जोखीम ओळखूनच फडणवीसांनी एकजुटीचा मंत्र दिला आहे.

Follow Us
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला