Maharashtra Election News LIVE : मलकापूर नवनिर्वाचित नगराध्यक्षाने विजय मिरवणुकीत उधळल्या नोटा

BMC, Maharashtra Municipal Corporation Election 2026 News LIVE Updates : नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीनंतर महाराष्ट्रात महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. राज्यात एकूण 29 महापालिका आहेत. या पार्श्वभूमीवर अनेक पक्षांमध्ये पक्षांतर, फोडाफोडीच राजकारण सुरु आहे.

Maharashtra Election News LIVE :  मलकापूर नवनिर्वाचित नगराध्यक्षाने विजय मिरवणुकीत उधळल्या नोटा
Breaking news
| Edited By: | Updated on: Dec 25, 2025 | 12:22 PM

LIVE NEWS & UPDATES

  • 25 Dec 2025 12:58 PM (IST)

    संजय शिरसाट यांची राऊतांवर टीका

    काल ठाकरे बंधू युती झाली,त्यांनी असे म्हटले की पोरं पळवणारी टोळी अली आहे, त्यांना भीती आली आहे की त्यांची पोर पळवणार आहे, संजय राऊत म्हणतात शिवसेनेचे पोरं पळवणार, एक दिवसात एकमत नसल्याचे दिसत आहे. आमच्याकडे मनसे जिल्हाध्यक्ष आमच्या पक्षात आला, त्याच्या डोळ्यावर पट्टी नव्हती, युती झाल्याने महाराष्ट्र राजकारण बदल होणार असे नाही.30 वर्ष सत्ता कुणाची होती, म्हणतात मराठी माणसासाठी एकत्र आले.तेव्हा मराठी माणूस कुठे गेला, तुम्ही आता स्वतःच हित पहा आम्ही मराठी माणसासाठी सक्षम आहोत, असा टोला संजय शिरसाट यांनी राऊतांना लगावला.

  • 25 Dec 2025 12:50 PM (IST)

    सांगलीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या इच्छुक उमेदवारांच्या एकत्रित मुलाखती

    सांगली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून एकत्रित इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येत आहेत. सांगलीतल्या आमराई क्लब या ठिकाणी आमदार जयंत पाटील,आमदार कदम आणि खासदार विशाल पाटलांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दोन्ही पक्षातल्या इच्छुक उमेदवारांच्या एकत्रित मुलाखती घेण्यात येत आहेत.महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून एकत्रित करून लढण्याचा निर्धार करण्यात आला आहे.त्या दृष्टीने आता इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती देखील एकत्रित पार पडत असून ज्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षातल्या इच्छुक उमेदवारांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे.

  • 25 Dec 2025 12:40 PM (IST)

    छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपच्या प्रचार कार्यालयाचे उद्धघाटन

    छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकसाठी भाजपा प्रचार कार्यालयाचे उदघाटन मंत्री अतुल सावे आणि खासदार भागवत कराड, आमदार संजय केनेकर, भाजपा जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांच्या उपस्थितीत होत आहे..आरती आणि रिबीन कापत आणि नारळ फोडून प्रचार कार्यालयाचे उदघाटन करण्यात येत आहे

  • 25 Dec 2025 12:30 PM (IST)

    आमदार किशोर जोरगेवार यांचा मोठा खुलासा

    चंद्रपूर महापालिका निवडणुकीच्या संदर्भातील भाजपच्या निवडणूक प्रमुख पदावरून स्थानिक भाजप आमदार किशोर जोरगेवार यांना हटविल्याच्या मुद्द्यावर स्वतः किशोर जोरगेवार यांनी दिली माहिती, अशा पद्धतीची कुठलीही सूचना पक्षाने दिली नसल्याची केला खुलासा केला आहे. माध्यमाच्या माध्यमातून आज सकाळपासून मला माहिती मिळत आहे,पक्षाची रचना जी मला माहित आहे निवडणूक प्रमुख त्या विधानसभा क्षेत्रातला रहिवासी हा प्रमुख असतो,नेमक्या कोणत्या पदावर त्यांची नियुक्ती झाली आहे मला काही माहीत नाही त्याची मी आता शहानिशा करेल आणि सायंकाळी तशी बैठकी आहे आणि याबाबतची स्पष्टता होईल.मुनगंटीवार हे मुख्यमंत्री दोन दिवसात अगोदर भेटले काल मीही मुख्यमंत्र्यांशी भेटलो रुटीन भेटलो त्यामध्ये काय बोलणं झालं मला कसे कळणार ते दोन्ही मोठे वरिष्ठ नेते आहे, अशी माहिती आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली.

  • 25 Dec 2025 12:20 PM (IST)

    प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींना सवाल

    आम्ही इमर्जन्सी भोगली आहे तुम्ही ती पाहिलेली नाही.राहुल गांधी हे एपस्टीन मध्ये आपल्या पंतप्रधानांचे फोटो आहेत का याबाबत प्रश्न विचारत नाही.पेगेसीस किंवा इतर विषयात कोणताही विरोधी पक्षातील नेता प्रश्न विचारत नाही. विरोधी पक्षातील नेत्यांना ईडी सीबीआयचा सासेमीरा लावलेला आहे.त्यामुळे कोणताही विरोधी पक्षनेता बोलायला तयार नाही, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.

  • 25 Dec 2025 12:13 PM (IST)

    तुम्ही किंवा कुटुंब धर्मांतर करणार आहात का?

    जे धर्माला पाहून मतदान करतात त्यांना माझा सवाल आहे की तुम्ही किंवा कुटुंब धर्मांतर करणार आहात का? तुम्ही जर धर्मांतर करणार नसाल तर मग आरएसएस, बीजेपीचा जो मुद्दा आहे तो खरा आहे का? लोकशाहीला हुकूमशाहीत परवर्तीत करण्याची प्रक्रिया भाजप, आरएसएसनें सुरु केली आहे, असा आरोप वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला.

  • 25 Dec 2025 12:00 PM (IST)

    विजयस्तंभ पेरणेफाटा येथील कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल

    विजयस्तंभ पेरणेफाटा येथील कार्यक्रमाच्या पार्श्वभुमीवर पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक सुरक्षित व सुरळीत राहण्याकरिता ३१ डिसेंबर २०२५ राेजी सकाळी १० वाजल्यापासून ते १ जानेवारी २०२६ राेजी रात्री १२ वाजेपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात बदल करण्याबाबतचे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी आदेश निर्गमित केले आहेत.चाकण ते शिक्रापूर-शिक्रापूर ते चाकण या दोन्ही बाजुकडील वाहतुकीस सर्व प्रकारच्या खाजगी चालकांना प्रवेश बंद करण्यात येत आहे. या मार्गावर अनुयायांच्या बसेसना प्रवेश देण्यात येणार आहे. तथापि अनुयायांच्या कार, जीप आदी हलक्या वाहनांना प्रवेश असणार नाही.

  • 25 Dec 2025 11:58 AM (IST)

    वसई-विरार महापालिकेत जागावाटपाचा तिढा, शिवसेनेचा ४० जागांवर दावा, तर भाजप ३० जागांवर ठाम

    वसई-विरार महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर महायुतीमधील जागावाटपाचा पेच आता थेट मुंबईतील प्रदेश कार्यालयापर्यंत पोहोचला आहे. शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये जागांच्या संख्येवरून रस्सीखेच सुरू असून, शिवसेनेने ४० जागांची आग्रही मागणी केली आहे. मात्र, भाजप केवळ २५ ते ३० जागा सोडण्याच्या मनस्थितीत असल्याची माहिती समोर येत आहे. शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख निलेश तेंडुलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक स्तरावर तोडगा न निघाल्याने हा प्रश्न आता वरिष्ठ स्तरावर सोपवण्यात आला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि शिवसेनेचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात होणाऱ्या अंतिम चर्चेनंतरच वसई-विरारमधील जागावाटपाचा तिढा सुटणार आहे. महायुतीमधील या ओढाताणीमुळे इच्छुक उमेदवारांमध्ये धाकधूक वाढली असून, वरिष्ठ नेत्यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • 25 Dec 2025 11:51 AM (IST)

    महापालिकेत शिवशक्ती-भीमशक्तीचा एल्गार! २९ महानगरपालिका निवडणुकीत युती

    महाराष्ट्रातील आगामी २९ महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर राज्याच्या राजकारणात एक मोठी युती झाली आहे. शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे आणि रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्यात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत, राज्यातील सर्व २९ महानगरपालिका निवडणुका एकत्रितपणे लढवण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. मुंबईसह सर्वच मोठ्या शहरांमध्ये ही युती प्रभावीपणे लढणार असून, संभाव्य जागावाटपाबाबत दोन्ही नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली आहे.

  • 25 Dec 2025 11:41 AM (IST)

    शिवसेनेत ४३ वर्ष देऊनही मुलावर अन्याय, विनायक पांडे यांचा उद्धव ठाकरेंची साथ सोडणार, भाजपमध्ये प्रवेशाचा निर्णय

    गेल्या ४३ वर्षांपासून शिवसेनेशी एकनिष्ठ राहिलेले ज्येष्ठ नेते विनायक पांडे यांनी अखेर पक्षाला जयहिंद करण्याचा निर्णय घेत भाजपची वाट धरली आहे. मागील निवडणुकीत माझ्या मुलाचे तिकीट कापले गेले आणि आताही तीच परिस्थिती आहे. संजय राऊत यांच्याशी बोलूनही कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही,” अशी खंत पांडे यांनी व्यक्त केली आहे. विनायक पांडे यांच्यासह त्यांचे संपूर्ण पॅनल भाजपमध्ये प्रवेश करणार असून, त्यांना उमेदवारी मिळण्याचे संकेतही मिळत आहेत.

  • 25 Dec 2025 11:30 AM (IST)

    मंत्रालयातील पीए आता निवडणूक ड्युटीवर; राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

    मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने एक अत्यंत महत्त्वाचा आदेश जारी केला आहे. राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांच्या १५ डिसेंबर २०२५ च्या आदेशानुसार, मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ च्या कलम २९ अंतर्गत मंत्र्यांच्या कार्यालयात कार्यरत असलेल्या वैयक्तिक सहाय्यकांची (PA) निवडणूक कामांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक नियमावली २००२ च्या नियम २२ नुसार ही कारवाई करण्यात आली असून, या कर्मचाऱ्यांवर मतदान, मतदार यादी अद्ययावत करणे, मतपत्रिका, मतमोजणी आणि निकाल जाहीर करण्याची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांची ‘सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी’ (APRO) म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, त्यांना निवडणूकविषयक प्रशिक्षणाला उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. मुंबईतील विविध विभागांमध्ये या नियुक्त्या जाहीर झाल्याने निवडणूक यंत्रणा आता पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये आली आहे.

  • 25 Dec 2025 11:19 AM (IST)

    माऊंट मेरी चर्चमध्ये ख्रिसमसचा जल्लोष, प्रभू येशूच्या जन्मोत्सवासाठी वांद्र्यात गर्दी

    मुंबईतील ख्रिसमस सेलिब्रेशनचे प्रमुख केंद्र असलेल्या वांद्रे येथील ऐतिहासिक माऊंट मेरी चर्चमध्ये आज ख्रिसमसचा सण अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा होत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मदिन साजरा करण्यासाठी आणि विशेष प्रार्थनेसाठी पहाटेपासूनच हजारो भाविकांनी या ठिकाणी गर्दी केली आहे. चर्चला करण्यात आलेली मनमोहक रोषणाई आणि आकर्षक सजावटीमुळे संपूर्ण परिसरात उत्सवी चैतन्य पसरले आहे. आध्यात्मिक आनंदाचा अनुभव घेण्यासाठी केवळ ख्रिस्ती बांधवच नव्हे, तर सर्वधर्मीय नागरिक येथे पोहोचत आहेत. प्रेम, दया आणि विश्वबंधुत्वाचा संदेश देणाऱ्या या सणानिमित्त परिसरात कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी मुंबई पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

  • 25 Dec 2025 11:09 AM (IST)

    मीरा-भाईंदरच्या राजकारणात नेक्स्ट जनरेशनची एन्ट्री? नरेंद्र मेहतांचे चिरंजीव तकशील मेहता महापालिका लढवण्यास इच्छुक

    मीरा-भाईंदर शहराच्या राजकारणात आता आमदार नरेंद्र मेहता यांच्यानंतर त्यांच्या कुटुंबातील पुढची पिढी सक्रिय होण्याचे संकेत मिळत आहेत. भाजपचे स्थानिक सामर्थ्यवान नेते आणि आमदार नरेंद्र मेहता यांचे चिरंजीव तकशील नरेंद्र मेहता हे आगामी मीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीत नशीब आजमावण्यासाठी इच्छुक असल्याची विश्वासार्ह माहिती समोर येत आहे. तकशील मेहता यांनी स्वतः निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याने शहरातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून, मेहता समर्थकांमध्ये या निर्णयामुळे मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.

  • 25 Dec 2025 10:45 AM (IST)

    नाशिकमध्ये युती फिसकटण्याच्या मार्गावर .. !

    50 जागा दिल्या तरच युती करणार – शिवसेनेचे हेमंत गोडसे यांनी असा दावा केला आहे. तर भाजप 38 ते 40 जागा देण्याच्या भूमिकेत आहेत. 50 जागा न मिळाल्यास आमची स्वबळाची तयारी आहे… असं वक्तव्य गोडसे यांनी केलं आहे.  गेल्या काही दिवसांपासून युतीमध्ये जागावा वाटपावरून सुरु रस्सीखेच आहे. आज गिरीश महाजन नाशिक मध्ये युती संदर्भात आढावा  घेणार आहेत.

  • 25 Dec 2025 10:30 AM (IST)

    शिवसेनेला ७० जागा देणार अशा बातम्या माध्यमात येत असल्याने एकनाथ शिंदेंकडून चिंता व्यक्त

    खोटा नरेटिव्ह पसरवण्याचा विरोधकांचा कट हाणून पाडा अशा नेत्यांना सुचना देण्यात आल्या आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार शिवसेना ११२ जागांवर तडजोड करायला तयार असल्याची माहिती समोर आली आहे.  त्याखालील जागा लढवणार नाही असाही सेना नेत्यांचा निर्धार आहे.. मुंबईत शिवसेनेचा वोटबॅंक , मित्रपक्षाने हे समजून घ्यावं अन्यथा फायदा विरोधकांना होईल , महायुतीच्या बैठकीत शिवसेना नेत्यांचा सूर… अशा माहिती सुत्रांनी दिला आहे.

  • 25 Dec 2025 10:20 AM (IST)

    ठाकरेंमुळे फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री – संजय राऊत

    ठाकरेंमुळे फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. फडणवीसांनी मराठी माणसासाठी काय केलं आहे.. भाजपने मराठी माणसासाठी काय केलं… असं म्हणत संजय राऊत यांनी भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

  • 25 Dec 2025 10:10 AM (IST)

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राजीनाम्यानंतर प्रशांत जगताप यांच्यासमोर कार्यकर्त्यांकडून दोन पक्षाचा प्रस्ताव

    मशाल किंवा हाताचा पंजा यावर पुढील वाटचाल करावी यासाठी प्रशांत जगताप यांच्याकडे कार्यकर्त्यांनी आग्रह धरला आहे. महापालिका निवडणुकीत प्रशांत जगताप काय निर्णय घेणार याकडे लक्ष मात्र वरिष्ठ स्तराकडून प्रशांत जगताप यांना अनेक पक्षांचे फोन येत आहेत. प्रशांत जगताप यांच्या कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी या दोन्हीपैकी एक पक्षाची निवड करण्याचं विनंती केली.

  • 25 Dec 2025 09:55 AM (IST)

    नांदेडच्या जवळा येथील एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू

    दोन मुलांची रेल्वेखाली आत्महत्या तर आई-वडील आढळले गळफास घेतलेल्या अवस्थेत. आई-वडिलांचा घातपात की आत्महत्या पोलीस तपासून होणार उघड. नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील जवळा लखे कुटुंबातील दुर्दैवी घटना.

  • 25 Dec 2025 09:50 AM (IST)

    प्रशांत जगताप यांच्याबाबत सुप्रिया सुळे यांची थेट प्रतिक्रिया

    रात गई बात गई रोज नही सुबह होती है…प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्यावर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया. प्रशांत जगपात यांच्या पक्षप्रवेशानंतर शरद पवार गटाला धक्का.

  • 25 Dec 2025 09:40 AM (IST)

    लोणी गावात ट्रक आणि कारचा भीषण अपघात

    मंत्री विखे पाटलांनी अपघाताची पाहणी करत प्रशासनाला केल्या मदतीच्या सूचना. काल रात्री 10 वाजेच्या सुमारास लोणी गावात ट्रक आणि कारचा अपघात. अपघातात कारचे मोठे नुकसान.. सुदैवाने जीवितहानी नाही. नेवासा दौऱ्यावरून परतणाऱ्या विखे पाटलांनी अपघातस्थळी ताफा थांबवत घेतला आढावा…

  • 25 Dec 2025 09:30 AM (IST)

    जळगाव महापालिका निवडणुकीसाठी दोन दिवसात 1 हजार 395 अर्ज विक्री

    जळगाव महापालिका निवडणुकीसाठी दोन दिवसात 1 हजार 395 अर्ज विक्री, मात्र दाखल एकही नाही. पहिल्या दिवशी 777 अर्जाची विक्री, तर दुसऱ्या दिवशी 618 जणांनी नामनिर्देशन अर्ज विकत घेतले.आज आणि रविवारी अशा दोन सुट्यांमुळे अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांना केवळ 4 दिवस शिल्लक. महापालिकेत आतापर्यंत इच्छुक उमेदवारांना 268 ना-हरकत प्रमाणपत्रे वितरित झाली आहेत.

  • 25 Dec 2025 09:20 AM (IST)

    जागा वाटपाबाबत शिवसेनेत नारा, पुण्यात शिवसेनेची वरिष्ठ नेत्याची मनमानी

    निवडणुकीच्या धामधुमीत ऐका वरिष्ठ नेत्याची घरी झाली बैठक. बैठकीत दोनच वरिष्ठ नेते ,शहर प्रमुख ,महानगर प्रमुख यांना ही या बैठकीतून डावलाल. या दोन वरिष्ठ नेत्यांनी काही जागांवर तीच चर्चा केल्याची माहिती. सर्व नेत्यांना डावल्याने कार्यकर्त्यांचा मोठा उद्रेक शिवसेना कार्यकर्त्यांची भूमिका वेगळे लढण्याच्या तयारीत. वरिष्ठ नेत्यांच्या मनमानीला शिवसैनिक शहर प्रमुख महानगर प्रमुख व इतर नेते कार्यकर्ते वैतागले

  • 25 Dec 2025 09:10 AM (IST)

    तुझी भावजय नगरसेवक पदी निवडुन कशी काय आली? असे म्हणत कोयता फिरवत दहशत

    बीडच्या नगरपरिषद निवडणुकीत संत नामदेवनगर येथील अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आरती बनसोडे या नगरसेवक पदी निवडुन आल्या. निकालानंतर शेजारीच राहणाऱ्या कौशल्य मस्के याने आरती बनसोडे यांचे दीर अजिंक्य बनसोडे यांच्या घरासमोर धारदार कोयता घेऊन जात तुझी भावजय नगरसेवक पदी निवडून कशी काय आली? असा जाब विचारत कोयत्याने दोन दुचाकींची तोडफोड केली आणि कोयता मिरवत दहशत माजवली.

  • 25 Dec 2025 09:04 AM (IST)

    बस आणि कंटेनर ट्रकचा अपघात, 17 जणांचा मृत्यू

    चित्रदुर्ग जिल्ह्यातील हिरियूर येथे एक धक्कादायक अपघाताची घटना घडली. बस आणि कंटेनर ट्रकचा अपघात होऊन लागलेल्या आगीत 17 जणांचा मृत्यू झाला. बस बंगळूरूहून गोकर्ण येथे जात होती तर कंटेनर ट्रक बंगळूरूला निघाला होता. कंटेनर ट्रक डिव्हायडरला धडकला आणि नंतर बसला धडकल्याने पहाटे हा मोठा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.

  • 25 Dec 2025 09:02 AM (IST)

    कल्याण पूर्वेत शिवसेना-भाजप पुन्हा आमने सामने

    भाजप ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील यांनी शिवसेना शिंदे गटावर ‘युतीत पाठीत खंजीर खुपसल्याचा’ आरोप केल्यानंतर शिवसैनिक आक्रमक. आमच्या नेत्यांचा अपमान बंद करा. कल्याण पूर्वेत भाजपचा एकही नगरसेवक स्वबळावर निवडून येण्याचे नाकीनऊ होते. युतीमुळेच तो निवडून येत होता.आमची ताकद दाखविण्याची वेळ आणू नका, स्वबळावर एकदा होऊन जाऊ द्या. विधानसभा निवडणुकीत एक मावळा भारी पडू शकतो; सगळे जुंपले तर तुमचा सुपडा साफ होईल. शिवसेन संपर्कप्रमुख आणि माजी नगरसेवक महेश गायकवाड यांचं भाजप नेते जगन्नाथ पाटील यांना सडेतोड प्रत्युत्तर.

  • 25 Dec 2025 08:52 AM (IST)

    गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचात माकडांची दहशत

    तेलंगणा राज्यातून आलेले वानर सिरोंच्या तालुक्यात धुमाकूळ घालत आहेत. सकाळ आणि सायंकाळच्या वेळेस शहरातील अनेक घरांमध्ये खाद्यपदार्थ नेणे, भांडे नेणे अशी माकडांनी नागरिकांना त्रास देत आहेत. अनेक नागरिकांवर हल्ले करण्याचे काम हे माकड करीत आहेत. मोठ्या संख्येत तेलंगणा राज्यातून काही दिवसा अगोदर हे माकड महाराष्ट्रातील सीमावरती भागात आली. वन विभाग माकडाच्या हायदोसमुळे चिंताजनक

  • 25 Dec 2025 08:32 AM (IST)

    भाजपाचा एकच वेळी काँग्रेस आणि ठाकरेंच्या सेनेला धक्का

    नाशिकचे दोन माजी महापौर भाजपच्या गळाला. माजी महापौर विनायक पांडे, यतिन वाघ करणार भाजपात प्रवेश. तर काँग्रेसचे दिग्गज नेते शाहू खैरे देखील भाजपाच्या वाटेवर. सूत्रांची माहिती. गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत होणार प्रवेश सोहळा. विनायक पांडे ठाकरेंच्या शिवसेनेचे दिग्गज नेते तर शाहू खैरे देखील काँग्रेसचे मोठे नेते. भाजपाचा एकच वेळी काँग्रेस आणि ठाकरेंच्या सेनेला धक्का.

नाशिकचे दोन माजी महापौर भाजपच्या गळाला लागले आहेत. माजी महापौर विनायक पांडे, यतिन वाघ भाजपात प्रवेश करणारं. काँग्रेसचे दिग्गज नेते शाहू खैरे देखील भाजपाच्या वाटेवर असल्याची सूत्रांची माहिती. गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत होणार प्रवेश सोहळा. विनायक पांडे ठाकरेंच्या शिवसेनेचे दिग्गज नेते, तर शाहू खैरे देखील काँग्रेसचे मोठे नेते आहेत. भाजपाचा एकच वेळी काँग्रेस आणि ठाकरेंच्या सेनेला धक्का. ऐन निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दोन माजी नगरसेवक भाजपत दाखल झाले आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश कार्याध्यक्ष, माजी मनपा गटनेते किसन जाधव आणि माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांचा भाजपत प्रवेश. शहराध्यक्ष आणि कार्याध्यक्षांच्या मनमानी कारभाराला कंटाळून आम्ही भाजपत प्रवेश केल्याची प्रतिक्रिया. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत मध्यरात्री हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला आहे. एकीकडे पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने शरद पवार गटासोबत युती केली असतानाच दुसरीकडे सोलापुरात भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दोन हुकमी एक्के फोडलेत.