AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बुडालेल्या मुलांच्या शोधासाठी आलेल्या जवानांची बोट बुडाली, तीन जवानांचा मृत्यू, दोघांचा शोध सुरु

boat sank in ahmednagar pravara river: बुडालेल्या मुलांच्या शोधासाठी एसडीआरएफचे जवान गुरुवारी सकाळी पोहचले होते. सकाळी त्यांनी मुलांच्या शोध सुरु केल्यानंतर त्यांची बोट बुडाली. या दुर्घटनेत तीन जवानांचा मृत्यू झाला आहे. तसेच दोन जवानांचा शोध सुरु आहे.

बुडालेल्या मुलांच्या शोधासाठी आलेल्या जवानांची बोट बुडाली, तीन जवानांचा मृत्यू, दोघांचा शोध सुरु
मुलांच्या शोधासाठी आलेली बोट बुडाली
| Updated on: May 23, 2024 | 12:38 PM
Share

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात प्रवरा नदीत पोहण्यासाठी गेलेले दोन युवकांचा बुधवारी बुडून मृत्यू झाला. सागर पोपट जेडगुले (वय 25 रा. धुळवड ता. सिन्नर) आणि अर्जुन रामदास जेडगुले (वय 18 रा. पेमगिरी, ता. संगमनेर) अशी त्यांची नावे आहेत. या मुलांच्या शोधासाठी एसडीआरएफचे जवान गुरुवारी सकाळी पोहचले होते. सकाळी त्यांनी मुलांच्या शोध सुरु केल्यानंतर त्यांची बोट बुडाली. या दुर्घटनेत तीन जवानांचा मृत्यू झाला आहे. तसेच दोन जवानांचा शोध सुरु आहे. सोलापूर जिल्ह्यातील उजनी जलाशयात प्रवाशी बोट बुडाल्याची घटना घडली होती. त्यात पाच जणांचा मृत्यू झाला असतताना अहमदनगर जिल्ह्यात तीन जवान आणि दोन मुलांचा मृत्यू झाला आहे.

वाचवण्यासाठी आले अन् त्यांचा जीव गेला

प्रवरा नदीत बुडालेल्या दोघांचा शोध एसडीआरएफ जवानांनी सुरु केला होता. परंतु धरणातून पाणी सोडलेले असल्यामुळे नदीच्या प्रवाहात पाण्याचा वेग प्रचंड होतो. यामुळे जवानांची बोट उडाली. यामध्ये तीन जवानांचा मृत्यू झाला आहे. त्याचे मृतदेह मिळाले आहेत. तसेच दोघांचा शोध सुरु आहे. या बोटीत एसडीआरएफचे ४ जवान आणि १ स्थानिक नागरिक होता. अकोले तालुक्यातील सुगाव गावा जवळच ही घटना घडली आहे. जे जवान वाचवण्यासाठी आले, त्यांचाच मृत्यू झाल्याची घटना घडली.

घटनेची माहिती मिळाल्यावर माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात घटनास्थळी पोहचले. त्यांनी प्रशासनाला सूचना केल्या. प्रांताधिकारी शैलेश कुमार हिंगे यांनी दोन जणांच्या शोधासाठी सुरु असलेल्या प्रयत्नाची माहिती बाळासाहेब थोरात यांना दिली.

एकाचा शोध लागला दुसऱ्या सुरु

बुधवारी बुडलेल्या सागर पोपट जेडगुले याचा मृतदेह मिळाला आहे. परंतु अर्जुन रामदास जेडगूले याचा शोध अजूनही सुरु आहे.

एसडीआरएफचा पीएसआयचा मृत्यू

SDRF जवानांची जी बोट बुडाली त्यात पीएसआय प्रकाश नाना शिंदे, कॉन्स्टेबल राहुल गोपीचंद पावरा, चालक वैभव सुनील वाघ यांचा मृत्यू झाला आहे. तसेच कॉन्स्टेबल पंकज पंढरीनाथ पवार आणि कॉन्स्टेबल अशोक हिम्मतराव पवार यांच्यावर उपचार सुरु आहे. बोटीत असणारा स्थानिक राहिवाशी गणेश मधुकर देशमुख याचा शोध सुरु आहे.

सोलापूरमधील पाच जणांचा मृतदेह मिळाले

सोलापूर जिल्ह्यातील उजनी जलाशयात प्रवाशी बोट बुडाल्याची घटना बुधवारी घडली होती. या घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला. या पाचही जणांचे मृतदेह मिळाले आहे. त्यात कृष्णा दत्तू जाधव (वय 28), कोमल कृष्णा जाधव (वय 25), वैभवी कृष्णा जाधव (वय 2.5), समर्थ कृष्णा जाधव (वय 1) आणि अनिकेत ज्ञानदेव अवघडे (वय 21 ) यांचा समावेश आहे. बुडालेल्यांमधील गौरव डोंगरे यांचा मृतदेह सर्वात शेवटी मिळाला. सर्व मृतदेह मिळाल्यानंतर शोधकार्य थांबवण्यात आले. करमाळा तालुक्यातील कुगाव उजनी जलाशयाच्या काठावर गौरव डोंगरे यांचा मृतदेह मिळाला.

टन टन टोल टोल... गुणरत्न सदावर्तेंकडून राज ठाकरेंच्या भाषणाची मिमिक्री
टन टन टोल टोल... गुणरत्न सदावर्तेंकडून राज ठाकरेंच्या भाषणाची मिमिक्री.
खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का
खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का.
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?.
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?.
मोदी तेरी कब्र खुदेगी घोषणांमुळे संसदेत हंगामा अन् भाजप आक्रमक
मोदी तेरी कब्र खुदेगी घोषणांमुळे संसदेत हंगामा अन् भाजप आक्रमक.
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.