AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आतापर्यंत किती मंत्र्यांच्या आस्थापनांवर कारवाई केली? FDA ला हायकोर्टाचा सवाल

Bombay High Court and FDA : मुंबई उच्च न्यायालयाने FDA ला आतापर्यंत किती मंत्र्यांच्या आस्थापनांवर कारवाई केली? असा प्रश्न विचारला आहे. मंत्रालय आणि हायकोर्टासह राज्यातील सर्व सरकारी आणि निमसरकारी आस्थापनांची तातडीनं तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.

आतापर्यंत किती मंत्र्यांच्या आस्थापनांवर कारवाई केली? FDA ला हायकोर्टाचा सवाल
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jul 29, 2026 | 10:34 PM
Share

तुकाराम मुंढे यांनी अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाची सुत्रे स्वीकारल्यापासून राज्यभर कारवाई केली जात आहे. अशातच आता मुंबई उच्च न्यायालयाने FDA ला आतापर्यंत किती मंत्र्यांच्या आस्थापनांवर कारवाई केली? असा प्रश्न विचारला आहे. मंत्रालय आणि हायकोर्टासह राज्यातील सर्व सरकारी आणि निमसरकारी आस्थापनांची तातडीनं तपासणी करत शुक्रवारी अहवाल सादर करा असे आदेशही कोर्टाकडून देण्यात आले आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

हायकोर्टाचे FDA ला सवाल

राज्यात सध्या अन्न व औषध प्रशासनानं सुरू केलेल्या धडक कारवाईवर भाष्य करताना मुंबई हायकोर्टानं आयुक्त तुकाराम मुंढे यांचा नामोल्लेख न करता काही सवाल उपस्थित केले आहे. सध्या राज्यभरात या विभागाच्या धडाकेबाज कारवायांची जोरदार चर्चा आहे. मात्र केवळ खासगी आस्थापनांबाबत कारवाई मर्यादित राहणं योग्य नाही. आजवर तुम्ही किती मंत्र्यांच्या मालकीच्या आस्थापनांवर कारवाई केलीत? तसेच किती सरकारी आस्थापनांवर कारवाई केलीत? इतकंच काय जिथून आमचं जेवण येत ते हायकोर्टाच कँटिन तुम्ही तपासलंत का? आमच्या पाठीमागेच असलेली राज्यातील सर्वात महत्त्वाची इमारत असलेल्या मंत्रालयाची कधी पाहाणी केलीत का? असे सवाल कोर्टाने FDA ला विचारले आहेत. आता या सर्व प्रकरणाचा अहवाल सादर करण्यासही FDA ला सांगण्यात आले आहे.

कारवाईची व्हिडिओग्राफी करण्याचे आदेश

त्याचबरोबर राज्यातील सर्वच शासकीय आणि निमशासकीय इमारतीतील स्वयंपाक घरांची तातडीनं पाहाणी करण्याचे निर्देश देत या पाहाणीचा अहवाल येत्या शुक्रवारी हायकोर्टात सादर करण्याचे निर्देश एफडीएला देण्यात आले आहे. तसेच या कारवाईची व्हिडिओग्राफीही आवर्जून करा असंही कोर्टाने आपल्या आदेशात म्हटलं आहे. दरम्यान, नवी मुंबईतील अन्न परवाना रद्द करण्यात आलेल्या एका पंचतारांकित हॉटेलने मुंबई हायकोर्टात एक याचिका दाखल केली होती. या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. या सुनावणी दरम्यान हायकोर्टाने एफडीएला वरील आदेश दिले आहेत.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा