AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी एका बाजूला झुकली, नंतर पत्त्यासारखी कोसळली… नालासोपाऱ्यात मोठी दुर्घटना; इमारतीतील रहिवाश्यांचं काय झालं?

नालासोपाऱ्यात भीषण दुर्घटना घडली आहे. अल्कापुरी परिसरात 4 मजली इमारत पत्यासारखी कोसळली आहे. ही इमारत अनधिकृत असल्याचीही माहिती समोर आली आहे.

आधी एका बाजूला झुकली, नंतर पत्त्यासारखी कोसळली... नालासोपाऱ्यात मोठी दुर्घटना; इमारतीतील रहिवाश्यांचं काय झालं?
building collapaseImage Credit source: Meta AI
Updated on: Jul 05, 2025 | 5:50 PM
Share

नालासोपाऱ्यात भीषण दुर्घटना घडली आहे. अल्कापुरी परिसरात 4 मजली इमारत पत्यासारखी कोसळली आहे. साई राज 2 असे या इमारतीचे नाव असून, काल रात्री ही इमारत एका बाजूला झुकली होती आणि आज कोसळली. ही इमारत अनधिकृत असून 20 ते 25 वर्षांपूर्वीची जुनी आहे अशी माहिती समोर आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार काल ही इमारत एका बाजूला झुकली होती. त्यामुळे वसई-विरार महापालिकेने काल रात्रीच तात्काळ पावले उचलत सर्व 30 कुटुंबांना सुरक्षितरीत्या बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलविले होते. त्यानंतर आणि आज दुपारी चारच्या सुमारास ही इमारत पूर्णपणे कोसळली कोसळली आहे. इमारत रिकामी होती, त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.

या दुर्घटनेमुळे शेजारील कुसुम अपार्टमेंटचे नुकसान झाले आहे. या भागात मोठ्या प्रमाणात अनधिकृत इमारती उभ्या राहिल्या असून, त्यातील किमान 4 ते 5 इमारती धोकादायक अवस्थेत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता या इमारतींवर प्रशासन कारवाई करणार का ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

अंबरनाथमध्ये घराची भिंत कोसळली

अंबरनाथ शहरात रिमझिम पावसामुळे एका घराची भिंत कोसळल्याची घटना घडली.त्यामुळे घरातल्या सामानाचं मोठं नुकसान झालं आहे. गांधी नगरमध्ये नाल्याच्या बाजूला हे घर होते. रिमझिम पावसामुळे मागच्या नाल्याचा प्रवाह वाढला त्यामुळे माती खचत गेली, यामुळे आज दुपारी 3.30 वाजता याठिकाणी घराची मागची भिंत अचानक कोसळली. या घटनेत एक महिला थोडक्यात बचावली आहे.

नाल्याच्या बाजूला पालिकेने संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे मात्र ती अर्धवट असल्याने ही दुर्घटना घडल्याचे स्थानिक लोकांनी म्हटले आहे. त्यामुळे नुकसानाची भरपाई मिळावी अशी मागणी घराच्या मालकाने केली आहे.

हनीट्रॅपचा मुद्दा विधानसभेत गाजला, सभागृहात पटोलेंचा पेनड्राईव्ह बॉम्ब
हनीट्रॅपचा मुद्दा विधानसभेत गाजला, सभागृहात पटोलेंचा पेनड्राईव्ह बॉम्ब.
हनी ट्रॅपमध्ये कोण? नावं सांगा, शिंदेंचा विरोधकांना सवाल
हनी ट्रॅपमध्ये कोण? नावं सांगा, शिंदेंचा विरोधकांना सवाल.
राज्य रोजंदारी कर्मचाऱ्यांचा प्रश्न 'राज'दरबारी! काय झाली चर्चा?
राज्य रोजंदारी कर्मचाऱ्यांचा प्रश्न 'राज'दरबारी! काय झाली चर्चा?.
फक्त 12 गुंठ्यासाठी मारलं, सुरेश धसांचा आकावर नवा गंभीर आरोप
फक्त 12 गुंठ्यासाठी मारलं, सुरेश धसांचा आकावर नवा गंभीर आरोप.
कृषी खातं जेलमधला आका चालवायचा, धसांचा नाव न घेता कराडवर आरोप
कृषी खातं जेलमधला आका चालवायचा, धसांचा नाव न घेता कराडवर आरोप.
मुंडेंच्या बंगल्यावरून कराडचा फोन अन्... ज्ञानेश्वरी मुंडेंकडून आरोप
मुंडेंच्या बंगल्यावरून कराडचा फोन अन्... ज्ञानेश्वरी मुंडेंकडून आरोप.
फडणवीसांच्या ऑफरनंतर आदित्य ठाकरे म्हणाले, ऑफर दिली म्हणून स्वागताला..
फडणवीसांच्या ऑफरनंतर आदित्य ठाकरे म्हणाले, ऑफर दिली म्हणून स्वागताला...
फडणवीसांनी ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर राऊत स्पष्टच बोलले; ते पटाईत अन्...
फडणवीसांनी ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर राऊत स्पष्टच बोलले; ते पटाईत अन्....
लाडकी बहीण, वन पार्टी वन इलेक्शन; बघा ठाकरेंच्या मुलाखतीचा नवा टीझर
लाडकी बहीण, वन पार्टी वन इलेक्शन; बघा ठाकरेंच्या मुलाखतीचा नवा टीझर.
विक्रोळीत मनसैनिकांनी व्यापाऱ्याला धुतलं अन् काढली धिंड; घडलं काय?
विक्रोळीत मनसैनिकांनी व्यापाऱ्याला धुतलं अन् काढली धिंड; घडलं काय?.