बुलडाण्यात मोबाईल नेटवर्कची मोठी समस्या, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं 'शोले' स्टाईल आंदोलन

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शाम अवथळे यांनी पदाधिकाऱ्यांसह शोले चित्रपट स्टाईल आंदोलन केलं. (Buldana Swabhimani Shetkari Sanghatana Agitation)

बुलडाण्यात मोबाईल नेटवर्कची मोठी समस्या, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं 'शोले' स्टाईल आंदोलन

बुलडाणा : गेल्या अनेक दिवसांपासून बुलडाणा जिल्ह्यात बऱ्याच कंपन्यांच्या मोबाईल नेटवर्कची मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह इतरांचे मोठे नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शाम अवथळे यांनी पदाधिकाऱ्यांसह शोले चित्रपट स्टाईल आंदोलन केलं. (Buldana Swabhimani Shetkari Sanghatana Agitation)

बुलडाण्यात गेल्या 15 दिवसांपासून दररोज तीन तास कोणत्याही कंपनीचे नेटवर्क येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ऑनलाईन शाळांमुळे घराघरात स्मार्टफोन वापरावे लागतात. मात्र नेटवर्क नसल्याने त्यात विद्यार्थ्यांना अडचणी येतात.

त्याशिवाय महिनाभराचा रिचार्ज करूनही नेटवर्क कंपनी ग्राहकांची फसवणूक होते. त्यामुळे आज विविध कंपन्यांच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक पवित्रा धारण करत अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. बुलडाण्यातील जिल्ह्यातील अटाळी येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नेटवर्क सेवा देणाऱ्या एका कंपनीच्या टॉवरवर चढले. त्यानंतर शोले चित्रपटाच्या स्टाईलमध्ये आंदोलन केलं. (Buldana Swabhimani Shetkari Sanghatana Agitation)

संबंधित बातम्या : 

भल्या सकाळी अजित पवार मैदानात, बारामतीत नुकसानीची पाहणी, तातडीने पंचनाम्याचे आदेश

नागपूरकरांवर आता ‘एनडीएस’ पथकाची नजर, बाजारपेठेत गर्दी केल्यास कारवाई

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *