अपघातात भिकाऱ्याचा मृत्यू, गोधडीत सापडले लाखो रुपये आणि.. मुद्देमाल पाहून पोलिसही चक्रावले

| Updated on: Nov 11, 2023 | 11:54 AM

रस्ते अपघातात एका भिकारी जखमी झाला आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मात्र पोलीस तपासात त्याच्याकडे जे सामान मिळालं ते पाहून सर्वच चक्रावले.

अपघातात भिकाऱ्याचा मृत्यू, गोधडीत सापडले लाखो रुपये आणि.. मुद्देमाल पाहून पोलिसही चक्रावले
Follow us on

गणेश सोळंकी, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, बुलढाणा | 11 नोव्हेंबर 2023 : चित्रपटातले सगळे प्रसंग काही खरे नसतात, म्हणूनच आपण ते डोळे विस्फारून पहात असतो. मात्र बुलढाण्यात एखाद्या चित्रपटाला शोभेल अशीच एक घटना घडली. एका दुचाकीच धडक बसून रस्त्यावरील भिकारी जखमी झाला आणि अपघातात त्याचा मृत्यू झाला. मात्र त्यानंतर पोलिसांनी त्याचे सामन तपासले असता, त्यातून जे सामान सापडले, ते पाहून सर्वांचे डोळेच विस्फारले. पोलीसही चकित झाले.

रस्त्यावरच्या त्या भिकाऱ्याच्या गोधडीत चक्क लाखो रुपये सापडले. एवढेच नव्हे तर अनेक बँकांची पासबुके, एटीएम आणि चेकबुक्सही होती. हा सगळाचा प्रकार चक्रावून सोडणारा होता.

नक्की काय घडलं ?

एखाद्या हिंदी सिनेमात शोभावा अशी ही घटना जिल्ह्यातील मेहकर हेथे घडली.दीपक मोरे असे त्या मृत भिकाऱ्याचे नाव आहे. तो मेहकर ते डोनगाव रस्त्यावरून सायकलवर जात असताना एका अज्ञात दुचाकीस्वाराची त्याला धडक बसली आणि त्यामध्ये तो भिकारी गंभीर जखमी झाला. त्याला उपाचारासाठी तातडीने रुग्णालयात नेण्यात भरती करण्यात आले. मात्र अकोल येथे त्याच्यावर उपचार सुरू असतानाच दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला.

मृत पावलेला हा भिकारी नेमका कोण आहे, तो कुठला याचा पोलिस शोध घेत होते. त्यासाठी त्यांनी त्याचे उर्वरित सामान तपासायला सुरूवात केली आणि ते चक्रावलेच. कारण त्या भिकाऱ्याकडे असलेल्या गोधडीत आणि थैलीमध्ये अनेक बँकाची पासबुक्स, एटीएम कार्ड्स, आणि पिशवीत लाखो रुपयांची चिल्लर आढळली. तसेच त्याच्या बँकेच्या पासबूकमध्ये लाखो रुपयांची नोंद असल्याचेही पोलिसांना आढळले.

त्याच्याकडील कागदपत्रांवरून मृत पावलेला हा माणूस म्हणजे मेहकर तालुक्यातील अंजनी बुद्रुक येथील दीपक मोरे नावाचा रहिवासी असल्याचे पोलिसांना समजले.
त्यानंतर पोलिसांनी दराही वेळ न दवडता त्याच्या कुटुंबियांचा शोध घेतला आणि त्याची सर्व कागदपत्र, आणि पैसे त्यांच्याकडे सुपूर्त केले. मात्र भीक मागणाऱ्या व्यक्तीकडे एवढे मोठे घबाड सापडते, हे सगळेच चक्रावणारे असून सध्या सर्वत्र त्या भिकाऱ्याचीच चर्चा सुरू आहे.