Buldana: शब्दाला शब्द वाढला आणि तलवारीच निघाल्या! मलकापुरात तलावरीनं सपासप वार, एकाच कुटुंबातील तिघे जखमी

| Updated on: Apr 19, 2022 | 9:00 AM

Malkapur sword attack on family: दोन दिवसांपूर्वी मलकापूर शहराजवळील वाघूळ या गावात दोन गटांमध्ये शुल्लक कारणांवरून वाद झाला होता. मात्र हा वाद गावकऱ्यांच्या मध्यस्थीने मिटवण्यातही आलेला.

Buldana: शब्दाला शब्द वाढला आणि तलवारीच निघाल्या! मलकापुरात तलावरीनं सपासप वार, एकाच कुटुंबातील तिघे जखमी
मलकापुरातील धक्कादायक घटना
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

बुलडाणा : बुलडाणा (Buldana) जिल्ह्यातील एका गावात छोट्याशा कारणावरुन मोठा राडा झाला. यावेळी चक्क तलावारी घेऊन एका गावातील कुटुंबावर सपासप वार (Sword attack on family) करण्यात आले. या मध्ये एकाच कुटुंबातील तिघेजण गंभीर (Three people injured) जखमी झाले. ही घटना उघडकीस आल्यानं संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली होती. या घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेनंतर गावातील बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी गावातील दोन गट भिडले होते. त्यांच्यात एका शुल्लक कारणावरुन वाद झाला होता. हा वाद गावकऱ्यांच्या मध्यस्थीनं मिटवण्यातही आला होता. मात्र शाब्दीक वादावादीचा राग मनात ठेवत एका गटानं कुटुंबावर हल्ला चढवला. या हल्ल्यात तिघे जण गंभीर जखमी झाले. शरीरातून रक्ताच्या धारा वाहत असलेल्या गंभीर अवस्थेत तिघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या जखमीवर उपचार सुरु आहे.

कोणत्या गावातील घटना?

बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरालगत असलेल्या वाघुळ गावामध्ये ही थरारक घटना घडली. रविवारी रात्री या गावातील दोन गटात हाणामारी झाली. यामध्ये एका गटाकडून तलवारीने हल्ला चढविण्यात आला. त्यात तिघे गंभीर जखमी झाले. तलवारीनं सपासप वार केल्यामुळे तिघांना गंभीर जखमा झाल्या असून त्यांची प्रकृती चिंतजनक आहे.

एका गटानं केलेल्या हल्ल्यामध्ये वाघुळ गावातील राऊत कुटुंबियांमधील तलावरीनं वार करण्यात आले. जखमी झालेल्या तिघांनाही मलकापूरच्या रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आलंय. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी वाघूळ गाव गाठलं आणि पोलिस बंदोबस्तात वाढ केली आहे.

शब्दाला शब्द वाढला..

दोन दिवसांपूर्वी मलकापूर शहराजवळील वाघूळ या गावात दोन गटांमध्ये शुल्लक कारणांवरून वाद झाला होता. मात्र हा वाद गावकऱ्यांच्या मध्यस्थीने मिटवण्यातही आलेला. हा वाद मिटला असं गावकऱ्यांना वाटत असतानाच रविवारी रात्री जीवघेणा हल्ला राऊत कुटुंबीयांवर करण्यात आला. गावातीलच तिघांनी मिळून रविवारी पुन्हा रात्री एका कुटुंबियांवर तलवारीने हल्ला चढवला. यामध्ये मुरलीधर राऊत, गंगाबाई राऊत गौरव राऊत हे गंभीर जखमी झाले. तिघांना गावकऱ्यांच्या मदतीने तत्काळ मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आलंय मात्र तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी बुलडाणा इथं हलविण्यात आलं. सध्या पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

संबंधित बातम्या :

बातमी छापली म्हणून पत्रकाराला अश्लील शिविगाळ, जीवे मारण्याचीही धमकी! महाराष्ट्रात कुठे घडला प्रकार?

बुलडाण्यात सवर्णा फाट्यावर विचित्र अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली

वर्ध्यातील एका वृत्तपत्राच्या संपादकावर प्राणघातक हल्ला! गाडी अडवून जबर मारहाण