शेगाव-खामगाव रोडवरील सवर्णा फाट्यावर मारुती ओमनी या गाडीचा विचित्र अपघात घडला आहे. सुदैवाने अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही.
1 / 5
शेगावकडून खामगावकडे एक आयशर वाहन भरधाव जात होते. यावेळी सवर्णा फाट्याजवळ हे वाहन आले असताना वाहनाचा मध्यभागी असलेला पाईप उखडून उजव्या बाजूने निसटून हवेत उडाला.
2 / 5
नेमके त्याचवेळी विरूध्द दिशेने म्हणजे शेगावकडे धावत असलेल्या मारूती ओमनी व्हॅनमध्ये तो पाईप काचेतून कंडक्टर सिटला भेदून आरपार घुसला.
3 / 5
सुदैवाने कंडक्टर साईडने कोणीही नव्हते त्यामुळे जीवितहानी टळली. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.
4 / 5
मारुती ओमनीमध्ये मागच्या बाजूने एक व्यक्ती बसलेला होता. मात्र तो सुध्दा ड्रायव्हरच्या दिशेने असल्याने सुदैवाने वाचला.