समृद्धी महामार्गावरून प्रवास करताय, सावधान! ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे

रस्ता मोकळा असल्याने सुसाट वाहन चालवली जातात. पण, तोल गेल्यास अपघात होतात. त्यावर नियंत्रण घालणे गरजेचे आहे. यासाठी परिवहन विभागाने एक मोहीम सुरू केली आहे.

समृद्धी महामार्गावरून प्रवास करताय, सावधान! ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे
| Updated on: May 06, 2023 | 3:58 PM

गणेश सोळंकी, प्रतिनिधी, बुलढाणा : समृद्धी महामार्गावर अपघात होत आहेत. याला वेगवेगळे कारणं आहेत. त्यापैकी एक म्हणजे वाहनांची वेग मर्यादा होय. रस्ता मोकळा असल्याने सुसाट वाहन चालवली जातात. पण, तोल गेल्यास अपघात होतात. त्यावर नियंत्रण घालणे गरजेचे आहे. यासाठी परिवहन विभागाने एक मोहीम सुरू केली आहे. ती वाहनांच्या वेगावर मर्यादा आणणारी आहे. स्पीड लिमिट ओलांडल्यास सुरुवतीला ताशी १२० च्या आत वाहन चालवण्याची सूचना दिली जाईल. त्यानंतर वेग कमी होत नसेल तर दंडसुद्धा केला जाऊ शकतो.

सावधान, समृद्धी महामार्गावर आता एक्झिट मॅनेजमेंट सिस्टीम राबविली जातेय. जर तुम्ही स्पीड लिमिट ओलांडली तर तुमचे वाहन होऊ शकते ब्लॅक लिस्ट.. शिवाय एका इंटरचेंज दुसऱ्या इंटरचेंजला जर ठरलेल्या वेळेच्या आत पोहचाल तर सायरन वाजेल.

अन्यथा दंड भरावा लागेल

समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांना आता स्पीड ओलांडली तर आपले वाहन ब्लॅक लिस्ट होऊ शकते. त्यामुळे आपले वाहन ठरलेल्या वेळेतच चालवावे. अन्यथा आपल्याला दंडही भरावा लागेल. असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन विभागाने केलंय.

वाहन ब्लॅकलिस्ट होणार

समृद्धी महामार्गावरून जाणाऱ्या वाहनाचा अपघात होऊ नये. यासाठी जिल्ह्यातील उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून विविध मोहिमा राबवल्या जात आहेत. यामध्ये आता परिवहन विभागाकडून वाहनांना ब्लॅक लिस्ट आणि दंडही केला जात आहे. समृद्धी महामार्गावर नागपूर ते मुंबई चार ठिकाणी इंटर चेंज आहे.

टोल नाक्यावर वाजेल सायरन

जर वाहन एका इंटरचेंजवरून दुसऱ्या इंटरचेंजला ठरलेल्या वेळेच्या आत पोहचले तर त्या टोल नाक्यावर सायरन वाजेल. ते वाहन काही वेळेसाठी ब्लॅक लिस्ट होईल. एवढेच नव्हे तर उपप्रादेशिक विभागाकडून त्या चालकाचे समुपदेशन करण्यात येईल.

वेगमर्यादा १२०

संबंधिताला वाहन 120 वेगाच्या आतच चालवण्याचे आवाहन करण्यात येईल. एवढेच नव्हे तर चालकाने पुनः पुन्हा वेळेची मर्यादा ओलांडली तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई सुद्धा प्रस्तावित करण्यात येईल. अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी दिली.