हे अभयारण्य की बीअरबार; अबब! अभयारण्यातून निघाल्या ४० पोती दारूच्या बाटल्स

ज्ञानगंगा अभयारण्य परिसरात दरवर्षी अशा बाटल्स गोळा केल्या जातात. पण, मद्यपींवर याचा काही परिणाम होत नाही. सामाजिक संघटना आपलं काम करतात आणि मद्यपी आपलं...

हे अभयारण्य की बीअरबार; अबब! अभयारण्यातून निघाल्या ४० पोती दारूच्या बाटल्स
Follow us
| Updated on: Jun 05, 2023 | 9:43 PM

गणेश सोळंकी, प्रतिनिधी, बुलढाणा : शहरातल्या मद्यपींना बीअरबार कमी पडू लागले. त्यांना निसर्गरम्य वातावरणात दारुचा आस्वाद घ्यायचा असतो. त्यासाठी ते जंगलाशेजारी दारू ढोकसतात. त्यानंतर त्या दारूच्या किंवा बीअरच्या बाटल्स तिथंच फेकून देतात. त्यामुळे जंगलात दारूच्या बाटल्स सापडतात. ज्ञानगंगा अभयारण्य परिसरात दरवर्षी अशा बाटल्स गोळा केल्या जातात. पण, मद्यपींवर याचा काही परिणाम होत नाही. सामाजिक संघटना आपलं काम करतात आणि मद्यपी आपलं…

वन्यजीव सोयरे स्वयंसेवी संस्थेचा उपक्रम

जिल्ह्यात आरक्षित ज्ञानगंगा अभ्ययारण्य आहे. या अभ्ययारण्यातून बुलढाणा-खामगाववरून रस्ता जातो. या रस्त्याच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्स फेकल्या होत्या. बीअरच्या काचेच्या बाटल्या वन्यजीव सोयरे या स्वयंसेवी संस्थेने जमा केल्या. या 40 पोते जमा झाल्यात. या माध्यमातून जंगलाची सफाई केलीय.

पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वन्यजीव सोयरे ही सामाजिक संघटना 2016 पासून हा उपक्रम दरवर्षी राबवत आहे. या अभ्ययारण्यात अनेक हिंस्त्र प्राणी आहेत. ते जंगलात वावरताना त्यांना कुठेही दुःखापत होऊ नये. या उद्देशाने या सामाजिक संघटनेने हा उपक्रम चालवला आहे.

हे सुद्धा वाचा

सामाजिक संघटनेने संपूर्ण जंगलात फिरून तब्ब्ल 40 पोती दारू तसेच बिअरच्या काचेच्या बाटल्या जमा केल्या. अभ्ययारण्यातून बाहेर आणल्या आहेत. ज्ञानगंगा अभ्ययारण्य काचेच्या बाटल्यातून मुक्त केले असल्याची भावना संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.

सायकल रॅलीचे आयोजन

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बुलढाणा जिल्ह्यात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. सकाळी बुलढाणा शहरातून पर्यावरण सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. सकाळीच जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या हस्ते या सायकल रॅलीला हिरवी झेंडी देऊन सायकल रॅलीची सुरवात करण्यात आली आहे.

या सायकल रॅलीच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणाचा संदेश घेऊन ही रॅली शहराच्या प्रमुख भागात फिरणार आहे. या रॅलीत बुलढाणा शहरातील विद्यार्थ्यांसोबत अबालवृद्धांनी मोठ्या संख्येत सहभाग घेतला.

Non Stop LIVE Update
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.