छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख केल्यास….बुलढाण्यात वातावरण तापले…आंदोलनस्थळी राडा होणार? संजय गायकवाडांचा तो थेट इशारा
Sanjay Gaikwad Criticized Agitation: संवैधानिक पद्धतीने आमदार संजय गायकवाड यांच्या घरावर मोर्चा काढणार असल्याचे प्रकाशक प्रशांत आंबी म्हणाले. त्यावरून वातावरण तापले आहे. गायकवाड यांनी सु्द्धा जशाच तसे उत्तर देणार असल्याचे संकेत दिले आहे. त्यामुळे बुलढाण्यात वातावरण तापले आहे.

Sanjay Gaikwad Criticized Agitation: ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून वातावरण तापले आहे. प्रकाशक प्रशांत आंबी यांनी संवैधानिक पद्धतीने आमदार संजय गायकवाड यांच्या घरावर मोर्चा काढणार असल्याचे म्हटले आहे. पुरोगामी संघटनांचे कार्यकर्ते या पुस्तकाचे वाचन करणार आहेत. तर छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख केल्यास त्यांना बघू असा सज्जड इशारा गायकवाड यांनी दिला आहे. त्यामुळे दोन्ही गट आमने-सामने आल्यास मोठा राडा होण्याची शक्यता आहे. आज बुलढाण्यात वातावरण तापले आहे.
एकेरी उल्लेख केला तर मात्र…
पोलिसांनी आमच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली. त्यांचा ही कार्यक्रम पोलिसांनी रद्द केला. तरीही राज्यातील तमाम शिवभक्तांच्या जखमेवर मीठ चोळण्याकरीता जाणून बुजून जे पुस्तक तुम्ही छापलं. 20 लाख प्रति विकल्या. असे असतानाही तुम्हाला इथं येऊन पुस्तक वाचण्याची आवश्यकता काय आहे. ते जर पुस्तक वाचायला येतील तर मग आम्ही पुस्तक वाचायला जाणार. आम्ही त्या कार्यक्रमात समोर खाली बसणार. आम्ही विनयशीलतेने सर्व काही ऐकणार आणि त्यामध्ये जर त्यांनी पुस्तक वाचताना छत्रपती शिवराय असा उल्लेख केला तर आम्ही टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत करणार. पण जर त्यांनी महाराजांचा एकेरी उल्लेख केला आणि त्या ठिकाणी शिवभक्तांच्या भावना अनावर झाल्या तर याची जबाबदारी त्या आयोजकांची अथवा पुस्तक वाचणाराची असेल असा सज्जड इशारा आमदार संजय गायकवाड यांनी दिला.
आता तमाशा, नाटकं कशाला?
कोल्हापूरचा लांडगा इथं येईल आणि कोल्हेकुई करेल. नाहक कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करेल, छत्रपती शिवरायांचा अपमान होईले, असे त्या मंडप मालकाला वाटलं. त्यामुळे त्याने स्वत:च मंडप काढून नेला, असा दावा गायकवाड यांनी केला. प्रकाशक प्रशांत आंबी यांच्यावरही भावना भडकवल्याचा 505 ब गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. तर पुरोगामी गटाने आयोजित केलेल्या मंडपात आम्ही सुद्धा पुस्तक वाचणं करणार असे संजय गायकवाड म्हणाले. आता तमाशा आणि नाटकं कशाला करता असा सवालही त्यांनी केला.
औरंगजेबाला आदर आणि महाराजांचा एकेरी उल्लेख
या सर्व विषयात छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी करण्यात आली आहे. महाराजांचा खोटा इतिहास लिहितात. या पुस्तकात 300-400 वेळा त्यांनी शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला आहे. एकाठिकाणी या पुस्तकात औरंगजेबाला औरंगजेबजी म्हटले आहे तर शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला आहे असा आरोप गायकवाड यांनी केला आहे. त्यांनी यावेळी आमदार रोहित पवार यांच्यावरही तोंडसुख घेतले. ते हिरोगिरी करत असल्याचा आरोप त्यांनी केला.