AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठी सक्तीवरून घुमजाव? कोणी टाकला मिठाचा खडा, ऑटो- टॅक्सी चालकांना दिलासा? नवीन अपडेट वाचली का?

Marathi Compulsory for Auto-Taxi Drivers: मुंबईतील ऑटो आणि टॅक्सी चालकांना 1 मेपासून मराठी भाषा सक्तीचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पण आता या निर्णयात एक सवलत मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या निर्णयावरून महायुतीमधील नेत्यांमध्येच तू तू मैं मैं दिसून येत आहे.

मराठी सक्तीवरून घुमजाव? कोणी टाकला मिठाचा खडा, ऑटो- टॅक्सी चालकांना दिलासा? नवीन अपडेट वाचली का?
मराठी सक्ती, प्रताप सरनाईकImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Apr 28, 2026 | 10:15 AM
Share

Marathi Compulsory for Auto-Taxi Drivers: 1 मेपासून मुंबईमध्ये ऑटो रिक्षा चालकांना मराठी भाषा सक्तीबाबत राज्य सरकारने निर्णय घेतला. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक याप्रकरणी आग्रही आहेत. तर शिंदे सेनेतील काही नेत्यांनी या निर्णयाला विरोध केला आहे. त्यानंतर या निर्णयाबाबत फेरविचार सुरू असल्याचे समजते. एकदम निर्णय लादल्यास त्याचा मोठा परिणाम दिसून येऊ शकतो. ऑटो-टॅक्सी संघटनांनी याविषयावर तोडगा काढण्यासाठी सरकारशी वाटाघाटी सुरू केल्या आहेत. त्यामुळे या निर्णयाला ढील दिल्या जाऊ शकते.

आज प्रताप सरनाईकांसोबत बैठक

आज मंत्री प्रताप सरनाईकांची मुंबईत परिवहन आयुक्तांसोबत 10:30 वाजता वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होणार आहे. या बैठकीत 59 आरटीओचे सर्व प्रमुख उपस्थित असतील. या बैठकीला संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित असतील की नाही हे समोर आलेले नाही. पण या बैठकीनंतर मराठी सक्तीविषयी सरकारचे धोरण समोर येईल.

मराठी सक्तीचा निर्णय दोन टप्प्यात?

दोन टप्प्यांत मराठी सक्तीचा निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ऑटो आणि टॅक्सी चालकांना येत्या 15 ऑगस्टपर्यंत संधी दिली जाणार आहे. मराठी भाषा शिकण्यासाठी 6 महिने देण्यात येणार असल्याचे समजते. मुंबईतील टॅक्सी आणि ऑटो चालकांसाठी सरकार मराठीचा क्लास घेणार असल्याचे समजते. विविध शाळा , कार्यालये, प्रशिक्षण शिबीर केंद्रात मराठी शिकवली जाणार आहे. चालकांना यामुळे दिलासा मिळणार आहे. ऑटो आणि टॅक्सी चालकांचा येत्या 15 ऑगस्टपर्यंत परवाना अथवा परमिट रद्द होणार नसल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे.

ऑटो-टॅक्सी चालकांकरीता मराठीचा क्लास

ऑटो-टॅक्सी चालकांकरीता मराठी भाषेचा क्लास घेण्यात येणार आहे. सरकारने याविषयीचा निर्णय घेतला आहे. मराठी भाषा शिकण्यासाठी 6 महिने दिले जाणार आहे. यासाठी 2 पानी पुस्तकाचंही सरकारकडून प्रकाशन होणार आहे. या पुस्तकात चित्रांचा वापर करून मराठी शिकवण्यावर भर देण्यात येणार आहे. अनेक साहित्यिक , प्राध्यापक, मराठीचे जाणकार हे टॅक्सी चालकांना मराठीचे धडे देणार आहेत. मराठी भाषेचा इतिहासही समजावून सांगणार आहेत. मुंबईत व्यवसाय करायचाय तर मराठी भाषा अवगत असायलाच पाहिजे यावर प्रताप सरनाईक ठाम आहेत. त्यामुळे या निर्णयावरून सरकारने कोणतेही घुमजाव केले नाही. तर टॅक्सी चालकांना सहा महिन्यांची संधी दिल्याचे समोर येत आहे.

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच