सर्वात मोठी कारवाई, कोर्टाच्या आदेशानंतर एसटी महामंडळाचं विभागीय कार्यालय सील

उच्च न्यायालयाने एसटी महामंडळाला मोठा झटका दिला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एसटी महामंडळाचे कार्यालय सील करण्यात आलं आहे. तसेच जमीन देखील जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. उच्च न्यायालयाकडून एसटी महामंडळ प्रशासनाला मोठा इशारादेखील देण्यात आला आहे.

सर्वात मोठी कारवाई, कोर्टाच्या आदेशानंतर एसटी महामंडळाचं विभागीय कार्यालय सील
Follow us
| Updated on: Nov 30, 2023 | 10:18 PM

गणेश सोळंकी, Tv9 मराठी, बुलढाणा | 30 नोव्हेंबर 2023 : मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एसटी महामंडळाचे विभागीय कार्यालय सील करण्यात आलं आहे. उच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे एसटी महामंडळ प्रशासन हादरलं आहे. एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे पैसे देण्यास टाळाटाळ केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या कारवाईनंतरही महामंडळ ताळ्यावर आले नाही, तर कार्यालयाच्या जमिनीची लिलाव प्रक्रिया सुरू करण्यात येणार असा इशारा उच्च न्यायालयाकडून देण्यात आला आहे.

एसटी महामंडळाकडे 19 कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे तब्बल 53 लाख रुपये थकीत आहेत. उच्च न्यायालयाने मागील 25 सप्टेंबरला रक्कम अदा करण्याचे आदेश पारित केले होते. पण तरीही रक्कम पारित करण्यात आली नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाने एसटी महामंडळाचे विभागीय कार्यालय सील करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे दिले नाहीत तर कार्यालयाच्या जमिनीची लिलाव होईल, असा इशारा देण्यात आला आहे.

महामंडळाचे मुख्यालय हादरले

कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे उपदान देण्यास अक्षम्य टाळाटाळ केल्याने एसटी महामंडळाच्या बुलढाणा विभागीय कार्यालय आज संध्याकाळी उशिरा सील करण्यात आले. यानंतरही महामंडळ ताळ्यावर आले नाही तर, कार्यलयाच्या जमिनीची लिलाव प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याने महामंडळाचे मुख्यालय हादरले आहे.

महामंडळाची जमीन जप्त

19 कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे तब्बल 53 लाख रुपये महामंडळाकडे थकीत आहे. उच्च न्यायालयाने मागील 25 सप्टेंबरला रक्कम अदा करण्याचे आदेश पारित केले होते. मात्र दोन महिन्याचा कालावधी उलटूनही महामंडळाने गांभीर्याने विषय घेतला नाही. त्यामुळे त्यांची जमीन जप्त करून आज शासनाच्या नावे करण्यात आली. तसेच तहसीलदार रुपेश खंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली एका पथकाने आज मलकापूर मार्गावरील विभागीय कार्यालय सील करण्यात आले. दरम्यान उद्या शुक्रवारपर्यंत जर त्यांनी धनादेश दिला नाही तर जप्त जमिनीची लिलावाची प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. त्यामुळे मुख्यालय प्रशासन व बुलढाणा एसटी विभाग हादरला आहे.

Non Stop LIVE Update
एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन एकत्र आले तर... पाटलांचं वक्तव्य नेमकं काय?
एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन एकत्र आले तर... पाटलांचं वक्तव्य नेमकं काय?.
काय कमावल अन काय गमावल हे 13 जुलैला...जरांगे पाटलांचा नेमका इशारा काय?
काय कमावल अन काय गमावल हे 13 जुलैला...जरांगे पाटलांचा नेमका इशारा काय?.
गायब असलेला पाऊस 'या' दिवशी पुन्हा करणार कमबॅक, IMD चं मोठं अपडेट
गायब असलेला पाऊस 'या' दिवशी पुन्हा करणार कमबॅक, IMD चं मोठं अपडेट.
जरांगे पाटलांना रेड कार्पेट आणि आमची दखलही नाही? ओबीसी नेता आक्रमक
जरांगे पाटलांना रेड कार्पेट आणि आमची दखलही नाही? ओबीसी नेता आक्रमक.
तोडीबाज नेता, ब्लॅकमेलिंग आणि वसुलीत नंबर वन काम; बच्चू कडूंवर टीका
तोडीबाज नेता, ब्लॅकमेलिंग आणि वसुलीत नंबर वन काम; बच्चू कडूंवर टीका.
शरद पवार यांचं मुख्यमंत्र्यांना थेट पत्र अन् केली महत्त्वाची मागणी
शरद पवार यांचं मुख्यमंत्र्यांना थेट पत्र अन् केली महत्त्वाची मागणी.
मरतुकडी म्हैस ध्यानीमनी नसताना गाभण राहावी तसा राणेंचा...सामनातून टीका
मरतुकडी म्हैस ध्यानीमनी नसताना गाभण राहावी तसा राणेंचा...सामनातून टीका.
Elon Musk याच्या दाव्यानंतर निवडणूक आयोगानं फटकारलं, नेमकं काय प्रकरण?
Elon Musk याच्या दाव्यानंतर निवडणूक आयोगानं फटकारलं, नेमकं काय प्रकरण?.
लालपरीने शाळेत जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, विद्यार्थ्यांना आता शाळेत
लालपरीने शाळेत जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, विद्यार्थ्यांना आता शाळेत.
Monsoon रखडला..आगेकूच मंदावली, विदर्भ प्रतिक्षेत तर कोकण, मराठवाड्यात
Monsoon रखडला..आगेकूच मंदावली, विदर्भ प्रतिक्षेत तर कोकण, मराठवाड्यात.