Buldana ZP School | शेलुदच्या जिल्हा परिषद शाळेची भिंत पडली, अवैध उत्खनन आणि पाण्याचा प्रवाह अडवल्याने शाळेच्या आवारात साचले पाणी

शाळेच्या पाठीमागे नाला होता. बांधकाम व्यावसायिकांनी हा नाला गहाळ केला. त्याठिकाणी बांधकाम केले. नाल्याचा प्रवाह शाळेत काढला. शाळेला आवारभिंत होती. ती नाल्याच्या प्रवाहाने कमजोर झाली. पावसाचे तसेच नाल्याचे पाणी भिंत खचण्याचं प्रमुख कारण आहे. हळूहळू खचून गेली. या व्यावसायिकांनी स्वतःच्या फायद्यासाठी मुरुम खोदले. भिंतीलगचे मुरुम खोदल्यानं त्याठिकाणी खड्डे तयार झाले. पाणी नेहमी साचून राहू लागले. त्यामुळं भिंत खचून पडली.

Buldana ZP School | शेलुदच्या जिल्हा परिषद शाळेची भिंत पडली, अवैध उत्खनन आणि पाण्याचा प्रवाह अडवल्याने शाळेच्या आवारात साचले पाणी
शेलुदच्या जिल्हा परिषद शाळेची भिंत पडली
| Edited By: | Updated on: Jun 24, 2022 | 3:56 PM

बुलडाणा : जिल्ह्यातील शेलुद येथील जिल्हा परिषद (Shelud Zilla Parishad School) शाळेची भिंत पडली. त्यामुळं शाळकरी मुलामध्ये आणि पालकांमध्ये (Parents) भीतीचे वातावरण पसरलंय. नशीब बलवत्तर म्हणून शाळेत विद्यार्थी नव्हते. अन्यथा काही दुर्घटना (Accidents) घडली असती तर त्याला जबाबदार कोण ?, असा प्रश्न पालक वर्गाना पडलाय. शेलुदच्या शाळेच्या पाठीमागून जुना नाला होता. मात्र तो नाला बांधकाम व्यावसायिकांनी दाबून टाकला. त्या पाण्याचा प्रवाह शाळेत काढला. शाळेत पावसाचे आणि नाल्याचे पाणी साचले. तसेच भिंती शेजारील मुरूमही बांधकाम करणाऱ्यांनी खोदले. त्याठिकाणी खड्डा पडला आहे. परिणामी त्यामध्ये पाणी साचले आणि भिंत कमजोर होऊन शाळेची भिंत्त पडलीय.

भिंत का पडली

शाळेच्या पाठीमागे नाला होता. बांधकाम व्यावसायिकांनी हा नाला गहाळ केला. त्याठिकाणी बांधकाम केले. नाल्याचा प्रवाह शाळेत काढला. शाळेला आवारभिंत होती. ती नाल्याच्या प्रवाहाने कमजोर झाली. पावसाचे तसेच नाल्याचे पाणी भिंत खचण्याचं प्रमुख कारण आहे. हळूहळू खचून गेली. या व्यावसायिकांनी स्वतःच्या फायद्यासाठी मुरुम खोदले. भिंतीलगचे मुरुम खोदल्यानं त्याठिकाणी खड्डे तयार झाले. पाणी नेहमी साचून राहू लागले. त्यामुळं भिंत खचून पडली. ही भिंत खचण्यामागे व्यावसायिक जबाबदार असल्याचा आरोप केला जातो. पण, त्यांच्याविरोधात तक्रार कोण करणार, असा प्रश्न आहे. तक्रार केली, तर कारवाई करण्याची हिंमत कुणाची असंही बोललं जातंय.

मोकाट जनावरे, कुत्र्यांचा त्रास

शाळेत विद्यार्थी नव्हते. त्यामुळं बर झालं. शाळा सुरू असताना दुर्घटना घडली असती तर काही सांगता येत नव्हतं. आता शाळेच्या आवारात पाणी साचल्यास त्याचा त्रास विद्यार्थ्यांना सहन करावा लागेल. शिवाय मोकाट जनावरे शाळेच्या आवारात येतील. याचा विद्यार्थी-शिक्षकांना त्रास होईल. गावठी कुत्रे भटकल्यास याचाही येथे येणाऱ्यांना त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या शाळेचे आर्थिक नुकसान झाले. शिवाय आता मोकाट जनावरे, कुत्री हे सुद्धा शाळेत फिरणार आहेत. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. अन्यथा यानंतर काही घटना घडली तर जबाबदारी कोणी घ्यायची, असा प्रश्न ग्रामस्थ करताहेत.