AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निदा खान हिला आश्रय देणाऱ्या मतीन पटेल यांच्या घर आणि कार्यालयावर बुलडोझर ?

नाशिक TCS कंपनीतील धर्मांतर प्रकरणातील मुख्य सूत्रधार निदा खान हिला आश्रय देणारे एमआयएमचे (AIMIM) नगरसेवक मतीन पटेल गोत्यात सापडले आहे. या प्रकरणात आता छत्रपती संभाजीनगर महापालिका सक्रीय झाली आहे.

निदा खान हिला आश्रय देणाऱ्या मतीन पटेल यांच्या घर आणि कार्यालयावर बुलडोझर ?
Nida Khan and Mateen Patel
| Updated on: May 09, 2026 | 7:32 PM
Share

नाशिकच्या TCS कंपनीतील धर्मांतर प्रकरणातील मुख्य सूत्रधार निदा खान हीला आश्रय देणाऱ्या एमआयएमचे (AIMIM) नगरसेवक मतीन पटेल यांच्यावरही सहआरोपी म्हणून कारवाई करण्यात येत आहे.या प्रकरणात निदा खान हिला पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधून २५ दिवसांनंतर अटक केली होती. गेल्या अनेक दिवसांपासून निदा खान पोलिसांना चकवा देत होती. त्यानंतर पोलीस विशेष पथकाने संयुक्त कारवाई करून तिला अटक केली. या प्रकरणात आता तिला आश्रय देणाऱ्या एमआयएमचे नगरसेवक यांच्या घरावर आणि कार्यालयावर पालिकेने कारवाईची नोटिस चिकटवली आहे. त्यामुळे त्यांच्या घर आणि कार्यालयावर बुलडोझर फिरणार का ? असा सवाल केला जात आहे.

नाशिक येथील TCS बीपीओ कार्यालयातील कथित लैंगिक छळ आणि सक्तीचे धर्मांतर प्रकरण सध्या राज्यात गाजत आहे. या प्रकरणातील प्रमुख सूत्रधार म्हणून निदा खान ही गेल्या अनेक दिवस फरार होती.या प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान (Nida Khan) हिचा अटकपूर्व जामीन अर्ज नाशिक सत्र न्यायालयाने नुकताच (२ मे २०२६) फेटाळून लावला होता. या प्रकरणात निदा खान हिला छत्रपती संभाजीनगरमधून पोलीसांच्या विशेष पथकाने संयुक्त कारवाई करून अटक केली.या प्रकरणात निदा खान हीला आश्रय देणारे एमआयएम ( AIMIM ) नगरसेवक मतीन पटेल यांच्यावरही सहआरोपी म्हणून कारवाई करण्यात येत आहे. निदा खान फरार असताना एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांनी तिला आश्रय दिला होता.

बुलडोझर फिरणार का ?

निदा खान हीला आश्रय देणाऱ्या नगरसेवक मतीन पटेल याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मतीन यांच्या ऑफिस आणि घरावरही कारवाई होणार आहे असे म्हटले जात आहे. कारण मतीन यांच्या घरावर आणि कार्यालयावर छत्रपती संभाजीनगर महापालिकेने नोटीस चिटकवली आहे. नगरसेवक मतीन पटेल यांनी या नोटीसला तीन दिवसात समाधानकारक उत्तर न दिल्यास आता मातीन याच्या घरावर बुलडोझर फिरणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आता मतीन पटेल यांच्या घरावर उत्तर प्रदेश प्रमाणे बुलडोझर फिरणार का ? याकडे लक्ष लागले आहे.

Follow Us
नागपूरच्या डॉक्टरचा सांगलीत अपघाती मृत्यू; रुग्णालयातून घरी जाताना...
Nagpur | नागपूरच्या डॉक्टरचा सांगलीत अपघाती मृत्यू; रुग्णालयातून घरी जाताना काळाचा घाला
जिथे दिसेल तिथे कानशिलात लगावणार; हाके संतापले...
जिथे दिसेल तिथे कानशिलात लगावणार; हाके संतापले, प्रसाद लाड यांना थेट इशारा!
आधी वाचलास आता... NCP नेत्याला थेट जीवे मारण्याची धमकी, व्हायरल ऑडियो
मोठी बातमी! आधी वाचलास आता... NCP नेत्याला थेट जीवे मारण्याची धमकी, व्हायरल ऑडियो क्लीपने खळबळ
आम्ही निवडणुक आयोगाची 'ती' चूक समोर आणली, अपात्रतेबाबत... सुनावणीनंतर
आम्ही निवडणुक आयोगाची 'ती' चूक समोर आणली, अपात्रतेबाबत... सुनावणीनंतर ठाकरे गटाकडून पहिली प्रतिक्रिया
एकनाथ शिंदे यांची निवडच बेकायदेशीर... ठाकरेंच्या वकिलांच्या दाव्याने..
एकनाथ शिंदे यांची निवडच बेकायदेशीर... वकिलांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद म्हणजे काय ब्रम्हवाक्य नाही, आम्ही...
कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद म्हणजे काय ब्रम्हवाक्य नाही, आम्ही... शिंदे गटातील नेत्याच्या विधानाने खळबळ
आम्हाला अपात्रतेवर निर्णय द्यायचा आहे; कोर्टाच्या सुनावणीत मोठा खुलासा
मोठी बातमी! आम्हाला अपात्रतेवर निर्णय द्यायचा आहे; सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीत मोठा खुलासा, मात्र शिवसेना कुणाची? ह्यावर सस्पेन्स कायम
अपात्रतेआधीच चिन्ह दिलं, निवडणूक आयोगाला धारेवरच धरलं
Shivsena SC Hearing | सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल यांचा मोठा दावा! अपात्रतेआधीच चिन्ह दिलं, निवडणूक आयोगाला धारेवरच धरलं
मुलीला पलंगाच्या टोकाला बांधलं अन्... डार्क वेबचा वापर करून कट?
Nagpur | मुलीला पलंगाच्या टोकाला बांधलं अन्... वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लेकाचं भयनाक कृत्य
विधिमंडळ पक्ष म्हणजे मूळ पक्ष नाही; कोर्टात सिब्बल यांचा युक्तिवाद
Shivsena Symbol Hearing Update | विधिमंडळ पक्ष म्हणजे मूळ पक्ष नाही; सुप्रीम कोर्टात सिब्बल यांचा सडेतोड युक्तिवाद