AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भिर्रर्रर्र… सशर्त परवानगीनंतर सांगलीत रंगणार बैलगाडा शर्यत, मावळ आणि आंबेगाव तालुक्यातील बक्षीसही जाणून घ्या

सांगली जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व नियम पाळून शर्यत भरवण्यासाठी परवानगीचे पत्र दिले आहे. त्यासाठी एकूण 26 नियम आणि अटी देण्यात आल्या आहेत. सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुक्यातील नांगोळे गावी 4 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं आहे. दुसरीकडे पुणे जिल्ह्यातील मावळ आणि आंबेगाव तालुक्यातील बैलगाडा शर्यतीसाठी बक्षिसांची घोषणा करण्यात आली आहे.

भिर्रर्रर्र... सशर्त परवानगीनंतर सांगलीत रंगणार बैलगाडा शर्यत, मावळ आणि आंबेगाव तालुक्यातील बक्षीसही जाणून घ्या
बैलगाडा शर्यत
| Edited By: sagar joshi | Updated on: Dec 31, 2021 | 7:14 PM
Share

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) सशर्त परवानगी दिल्यानंतर आता राज्यात बैलगाडा शर्यतीचं (Bullock cart race) आयोजन करण्यात येत आहे. त्यासाठी आयोजक आणि बैलगाडा मालकही सरसावले आहेत. महाराष्ट्रातील (Maharashtra) पहिल्या बैलगाडा शर्यतीला सांगली जिल्ह्यात अधिकृतरित्या परवानगी मिळाली आहे. सांगली जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व नियम पाळून शर्यत भरवण्यासाठी परवानगीचे पत्र दिले आहे. त्यासाठी एकूण 26 नियम आणि अटी देण्यात आल्या आहेत. सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुक्यातील नांगोळे गावी 4 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं आहे. दिल्ली येशील शेतकरी आंदोलनातील संदीप गिड्डे यांच्या पुढाकारातून ही बैलगाडा शर्यत होणार आहे.

दुसरीकडे पुणे जिल्ह्यातील मावळ आणि आंबेगाव तालुक्यातील बैलगाडा शर्यतीसाठी बक्षिसांची घोषणा करण्यात आली आहे. बक्षीस खालील स्वरुपात…

मावळ तालुक्यातील बैलगाडा शर्यतीसाठी बक्षीस काय?

प्रथम क्रमांक : एक मोटारसायकल

द्वितीय क्रमांक : 1 लाख 51 हजार रुपये रोख आणि अर्धा तोळ्याची सोन्याची अंगठी

तृतीय क्रमांक : 1 लाख रुपये रोख आणि अर्धा तोळ्याची सोन्याची अंगठी

चौथा क्रमांक : 75 हजार रुपये रोख आणि अर्धा तोळ्याची सोन्याची अंगठी

या बैलगाडा शर्यतीमध्ये 500 बैलगाड्या सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.

आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडीत होणाऱ्या बैलगाडा शर्यतीमध्ये बक्षीस काय?

प्रथम क्रमांक : 1 लाख रुपये रोख आणि त्यात पहिला आणि दुसरा यांना LED टीव्ही संच

द्वितीय क्रमांक : 75 हजार रुपये रोख आणि त्यात पहिला आणि दुसरा यांना दोन फ्रिज

तृतीय क्रमांक : 55 हजार रुपये रोख आणि त्यात पहिला आणि दुसरा यांना दोन जुंपतेगाडे

चौथा क्रमांक : 41 हजार रुपये रोख आणि दुसऱ्याला 7 हजार रुपये

पाचवा क्रमांक : 31 हजार रोख आणि दुसऱ्याला 5 हजार रूपये रोख

घाटाचा राजा : सोन्याची अंगठी

विशेष आकर्षण फायनल : मोटरसायकल

द्वितीय क्रमांक : सोन्याची अंगठी

तृतीय क्रमांक : सोन्याची अंगठी

चौथा क्रमांक : सोन्याची अंगठी

या बैलगाडा शर्यतीमध्ये 701 बैलगाड्या स्पर्धेत सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

बैलगाडा शर्यतीत हे नियम पाळावे लागणार

प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे देखील बंधनकारक असणार आहे. बैलगाडा शर्यतीत बैलांना इलेक्ट्रीक शॉक देणे, त्यांना बेदम मारहाण करणे असे प्रकार सर्सास होत असल्यानेच कोर्टाने शर्यतीवर बंदी घातली होती, असा कुठलाही प्रकार पुन्हा घडू नये असे आदेश न्यायलयाकडून देण्यात आले आहेत, मोठ्या प्रयत्नानंतर सुप्रीम कोर्टाने ही बंदी उठवली आहे, त्यामुळे हेही नियम शर्यतीत पाळावे लागणार आहेत. बैलगाडा शर्यतीसाठी येणाऱ्या प्रेक्षकांनी लसीचे दोन डोस घेतलेले असणे बंधनकारक आहे, कारण राज्यात सध्या ओमिक्रॉनचा फैलाव वाढल्याने पुन्हा निर्बंध लावले जात आहेत. अशातच या शर्यती पार पडत असल्याने कोरोना नियमांचे भान राखावे लागणार आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास कडक कारवाई करण्याचा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

इतर बातम्या :

ITR फाईल करण्यासाठी उरले अवघे काही तास; मुदतवाढ मिळणार नाही, अर्थ मंत्रालयाकडून स्पष्ट

पंतप्रधान मोदी म्हणाले ‘जुन्या गोष्टी सुधारण्यात सात वर्षे गेली’, तर ‘तुम्ही नेमकं केलं काय?’ राष्ट्रवादीचा सवाल

Follow Us
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?