शिंदेंना अपात्र घोषित करू शकतो का? ‘सुप्रीम’ सुनावणीत कोर्टाचा थेट सवाल; शिवसेना पक्षचिन्हाबाबत मोठा निर्णय होणार?

शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाचं याबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ज्येष्ठ वकील देवदत्त कामत युक्तिवाद करत आहेत.

शिंदेंना अपात्र घोषित करू शकतो का? सुप्रीम सुनावणीत कोर्टाचा थेट सवाल; शिवसेना पक्षचिन्हाबाबत मोठा निर्णय होणार?
Shivsena Case hiring
Image Credit source: Google
| Updated on: Aug 19, 2026 | 4:24 PM

शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाचं याबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ज्येष्ठ वकील देवदत्त कामत युक्तिवाद करत आहेत. आज पुन्हा एकदा ठाकरे गटाकडून विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष हे कसे वेगळे आहेत याबाबत युक्तिवाद करण्यात आला. यानंतर न्यायमुर्ती बागची यांनी आम्ही स्वतः शिंदे यांना अपात्र घोषित करू शकतो का? असा सवाल कामत यांना विचारला आहे. यावर कामत यांनी म्हटले की, ‘ज्या निकालांमध्ये अपात्रता योग्य ठरवली गेली आहे, तिथे सर्वोच्च न्यायालयाने स्वतः अपात्र घोषित केले आहे.’ याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

देवदत्त कामत यांचा युक्तिवाद

देवदत्त कामत यांनी युक्तिवाद करताना म्हटले की, ‘विधिमंडळ आणि राजकीय पक्ष वेगळा आहे. निवडणुकीत उमेदवार राजकीय पक्ष ठरवत असतो. बंडखोरी झाली, त्यावेळी पक्षात कोण कोण होते हे अत्यंत महत्वाचे आहे. शिंदे पक्षात राहिले नाही तर त्यांच्यावर होणारे दावे कसे राहतील. इतर पर्यायांचा विचार केला पाहिजे होता, जो केला गेला नाही असं म्हणत विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

आम्ही स्वतः शिंदे यांना अपात्र घोषित करू शकतो का? कोर्टाचा सवाल

यावर न्यायमुर्ती बागची यांनी कामत यांना प्रश्न विचारताना म्हटले की, अध्यक्षांचा निर्णय कायद्याच्या विरोधात असेल, तर आम्ही तो आदेश रद्द करू शकतो. परंतु आम्ही स्वतः शिंदे यांना अपात्र घोषित करू शकतो का? यावर बोलताना कामत यांनी म्हटले की, ज्या निकालांमध्ये अपात्रता योग्य ठरवली गेली आहे, तिथे सर्वोच्च न्यायालयाने स्वतः अपात्र घोषित केले आहे असं म्हणत एकनाथ शिंदे यांना अपात्र घोषित करण्याची मागणी केली.

धनुष्यबाण चिन्ह गोठवा

याआधी शिवसेना ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. सिब्बल यांनी म्हटले की, शिवसेना ही ठाकरेंचीच आहे, हे घोषित करा. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना या नावाचा आणि धनुष्यबाण चिन्हाचा वापर करून फायदे घेतले आहेत. त्यामुळे धनुष्यबाण चिन्ह कुणालाच देऊ नका. हे चिन्ह गोठवून टाका. आता न्यायालय यावर काय निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us