‘रूप तेरा मस्ताना’ आधी असं नव्हतंच ! किशोरदांनी दिला ट्विस्ट अन् तयार झालं अजरामर गाणं..
'रूप तेरा मस्ताना' हे अजरामर गाणे आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर यांच्यावर चित्रित झालेल्या या गाण्यामागची कहाणी रंजक आहे. विशेष म्हणजे, याचं शूटिंग अवघ्या एका दिवसात पूर्ण झालं.

हिंदी सिनेमातील काही गाणी अशी आहेत,जी कानावर पडताच जुन्या आठवणी ताज्या होतात, मन भूतकाळात रमतं. काही गाणी कवितेवर किंवा शायरीवर आधारित असता, तर काही कव्वालीवर.. बॉलिवूडमध्ये अनेक गाणी ही लोकगीतवरूनपण बनली आहेत, हे कदाचित अनेकांना माहीत नसेल. प्रसिद्ध अभिनेते राजेश खन्ना यांच एक गाणंही त्यापैकी होतं, त्या गाण्याचं नाव – ‘रूप तेरा मस्ताना’.. ऐकून आश्चर्य वाटलं ना ? पण हे खरं आहे. ‘आराधना’ चित्रपटातलं हे अजरामर गाण आजही अनेकांच फेव्हरिट आहे. राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर यांच्यावर चित्रीत झालेलं हे गाणं बऱ्याच लोकांना आवडतं. मात्र या गाण्यामागची कहाणी फारच कमी लोकांना माहीत असेल. तुम्ही ऐकला आहे का हा किस्सा ?
गाण्यामागचा रंजक किस्सा
बॉलिवूडमधील काही गाणी अशी आहेत, जी काळाच्या पुढे जाऊनही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. ‘रूप तेरा मस्ताना’ हे त्यापैकीच एक! आजही या गाण्याची धून आणि किशोर कुमार यांचा जादुई आवाज ऐकला की जुन्या आठवणी ताज्या होतात. मात्र या अजरामर गाण्याच्या निर्मितीमागे एक रंजक किस्सा दडला आहे. खरंतर अभिनेता आणि डान्सर जावेद जाफरी यांनी आता हा किस्सा चाहत्यांसोबत शेअर केला. ‘इंडियाज बेस्ट डान्सर सीझन 5’च्या आगामी भागात जावेद जाफरी या सुपरहिट गाण्याशी संबंधित काही खास आठवणी सांगताना दिसतील. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘रूप तेरा मस्ताना’ आपण आज ज्या अंदाजात ऐकतो, सुरूवातीला ते काही याच रुपात, तयार झालं नव्हतं.
आधी लोकगीताच्या धाटणीचं होतं गाणं !
जावेद जाफरी यांनी सांगितलं की, या चित्रपटाचे संगीतकार, एस. डी. बर्मन यांनी ‘रूप तेरा मस्ताना’ हे सुरूवातीला लोकगीताच्या शैलीत तयार केलं होतं. मात्र नंतर किशोर कुमार यांनी या गाण्याला अधिक आधुनिक आणि वेगळा टच देण्याची कल्पना मांडली. अखेर किशोर कुमार आणि एस. डी. बर्मन यांनी मिळून या गाण्याच्या शैलीत बदल केला आणि त्यातून तयार झालं ते आजही रसिकांच्या मनावर गारूड करणारं हे गाणं. खरं सांगायचं झालं तर किशोर कुमार यांच्या आवाजाची जादू आणि त्यांची खास गायकी यामुळे गाण्याला एक वेगळीच ओळख मिळाली.
एका दिवसांत उरकलं शूटिंग
या गाण्याच्या शूटिंगमागची गोष्टही तितकीच भन्नाट आहे. जावेद जाफरी यांच्या म्हणण्यानुसार, त्या काळात शर्मिला टागोर खूप व्यस्त होत्या. त्यामुळे त्यांच्याकडे शूटिंगसाठी फारसा वेळ उपलब्ध नव्हता. म्हणूनच ‘रूप तेरा मस्ताना’चं शूटिंग अवघ्या एका दिवसातच पूर्ण करण्यात आलं.
खरंतर एवढ्या कमी कालावधीमध्ये ते शूटिंग करणं काही सोपं नव्हतं. गाण्याच्या रेकॉर्डिंगपासून ते शूटिंग पर्यंत अनेक गोष्टी शेवटच्या क्षणी बदलण्यात आल्या. . मात्र एवढ्या दबावातही संपूर्ण टीमने जबरदस्त काम केलं आणि त्याचा परिणाम इतिहास घडवणारा ठरला. ‘आराधना’ चित्रपटातलं हे गाजलेलं गाणं राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर यांच्या जोडीने आणखी खास बनलं. पडद्यावरची दोघांची केमिस्ट्री, किशोर कुमार यांचा आवाज आणि गाण्याची मोहक धून यामुळे ‘रूप तेरा मस्ताना’ आजही प्रेक्षकांच्या मनात तितकंच ताजं आहे.
