AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भोंदू बाबा खरातचा पापाचा घडा भरला, SIT चौकशीत सापडलं घबाड, कोणाचं पितळं उघडं पडणार?

अशोक खरातच्या मोबाईल आणि लॅपटॉपमध्ये अनेक धक्कादायक गुपिते दडलेली असून ५८ आक्षेपार्ह व्हिडीओमुळे खळबळ उडाली आहे. एसआयटीने आता या तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास चक्रावून टाकला आहे.

भोंदू बाबा खरातचा पापाचा घडा भरला, SIT चौकशीत सापडलं घबाड, कोणाचं पितळं उघडं पडणार?
ashok kharat
| Updated on: Mar 20, 2026 | 9:53 AM
Share

ज्योतिषशास्त्र आणि अंकशास्त्राच्या नावाखाली महिलांवर अत्याचार करणाऱ्या आणि अफाट संपत्ती गोळा करणाऱ्या स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात प्रकरणी नवनवीन माहिती समोर येत आहे. सध्या या प्रकरणाच्या SIT चौकशीला वेग आला आहे. आता हा तपास आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखालील विशेष तपास पथकाने (SIT) या प्रकरणाचा ताबा घेताच डिजीटल पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. याद्वारे खरातचे मोठे नेटवर्क समोर येणार असल्याचे बोललं जात आहे.

नेमके प्रकरण काय?

मर्चंट नेव्हीमधून निवृत्त झालेला अशोक खरात स्वतःला कॅप्टन म्हणवून घेत असे. नाशिक आणि सिन्नर परिसरात त्याने अंकशास्त्रज्ञ आणि कॉस्मॉलॉजी तज्ज्ञ म्हणून आपली ओळख निर्माण केली होती. सिन्नरच्या मिरगाव येथे त्याने श्री ईशान्येश्वर मंदिर नावाचे भव्य संस्थान उभारले होते. एका ३५ वर्षीय महिलेने खरातवर गुंगीचे औषध देऊन वारंवार बलात्कार केल्याचा आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दिल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले.

SIT चौकशीत काय?

सध्या याप्रकरणाची एसआयटी चौकशी सुरु असून डिजिटल फॉरेन्सिक तपासही केला जात आहे. पोलिसांनी खरातचे मोबाईल, लॅपटॉप आणि पेनड्राइव्ह जप्त केले आहेत. डिजिटल फॉरेन्सिकच्या मदतीने खरातचे कोणाशी संपर्क होते आणि त्याने कोणाकोणाची फसवणूक केली, याचे तांत्रिक पुरावे गोळा केले जात आहेत.

या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांच्या हाती ५८ आक्षेपार्ह व्हिडीओ लागले आहेत. या व्हिडीओमध्ये अनेक महिला असल्याचे स्पष्ट होत असून, या पीडितांना शोधून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी SIT प्रयत्न करत आहे. अशोक खरातकडे नाशिक, सिन्नर आणि शिर्डी परिसरात सुमारे २०० कोटींची बेकायदेशीर मालमत्ता असल्याचा संशय आहे. त्याच्या फार्महाऊसवर झालेल्या छाप्यात पोलिसांनी पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम जप्त केली आहे.

खरात हा एकटाच हे कृत्य करत नव्हता, तर त्याचे मोठे जाळे पसरलेले होते. त्याचे आर्थिक व्यवहार सांभाळणारे आणि त्याला गुन्ह्यात मदत करणाऱ्या सहकाऱ्यांचा शोध आता पोलीस घेत आहेत.

राजकीय आणि सामाजिक खळबळ

दरम्यान खरातच्या दरबारात राज्यातील अनेक बडे नेते आणि अधिकारी हजेरी लावत असत. अनेक प्रतिष्ठित व्यक्तींचे भविष्य सांगून त्याने आपले वजन वाढवले होते. आता पोलिसांच्या हाती लागलेल्या व्हिडिओमध्ये काही मोठे चेहरे असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं