ठाकरे गटाचा बडा नेता अडचणीत, पाईपलाईन चोरी प्रकरणाच्या आरोपानंतर फरार नेत्याच्या शोधासाठी एसआयटी

जळगाव महापालिकेच्या जुन्या पाईपलाईन चोरी प्रकरणात दहा दिवस उलटूनही मुख्य सूत्रधार व महापालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते सुनील महाजन हे पोलिसांना सापडलेले नाहीत. त्यामुळे तपासासाठी एसआयटी स्थापना करण्यात आली आहे.

ठाकरे गटाचा बडा नेता अडचणीत, पाईपलाईन चोरी प्रकरणाच्या आरोपानंतर फरार नेत्याच्या शोधासाठी एसआयटी
sunil mahajan jalgaon
| Updated on: Dec 13, 2024 | 10:51 AM

जळगाव शहरातील महानगरपालिकेच्या मालकीच्या जुन्या पाईपलाईनची चोरी झाली होती. या प्रकरणात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नेत्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातील पाच जणांना अटक करण्यात आली. परंतु या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचा आरोप असणारे महापालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते सुनील महाजन अजूनही फरार आहे. त्यामुळे त्यांच्या शोधासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली आहे. पोलीस उपअधिक्षक संदीप गावित यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली आहे.

यामुळे एसआयटीची स्थापना

जळगाव महापालिकेच्या जुन्या पाईपलाईन चोरी प्रकरणात दहा दिवस उलटूनही मुख्य सूत्रधार व महापालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते सुनील महाजन हे पोलिसांना सापडलेले नाहीत. त्यामुळे तपासासाठी एसआयटी स्थापना करण्यात आली आहे. मनपाच्या गिरणा पंपिंग रस्त्यावरील पाणीपुरवठ्याची जुनी पाइपलाइन चोरी प्रकरणात दोन पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहे. या एसआयटी तपास पथकात तिन्ही गुन्ह्याचे तपास अधिकारी आहेत. या तिन्ही गुन्ह्याचा तपास आता एसआयटीच्या माध्यमातून केला जाणार आहे. स्वतंत्र तपास पथकाच्या मदतीने गुन्ह्याचा सखोल तपास करण्यात येणार आहे.

काय होते प्रकरण

२ डिसेंबर रोजी जळगाव महापालिका मालकीची जुनी पाईपलाईन जेसीबीच्या सहाय्याने काढली जात होती. या पाईप चोरीचा प्रयत्न करण्यात आला. हा प्रकार उघड झाल्यानंतर याप्रकरणी जळगाव महापालिका पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता योगेश बोरोले यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून संशयित आरोपी अक्षय अग्रवाल, रोहन चौधरी, भावेश पाटील, अमीन राठोड व नरेंद्र पानगडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर तपासात सुनील महाजन आणि रोहन चौधरी यांची नावे वाढवली होती. या प्रकरणात सूत्रधार सुनील महाजन असल्याचे समोर आले.

कोण आहेत सुनील महाजन

जळगाव मनपात विरोधी पक्षनेते राहिलेले सुनील महाजन हे ठाकरे यांच्या शिवसेनेत आहे. त्यांच्या पत्नी जळगाव शहराच्या महापौर राहिलेल्या आहेत. जयश्री महाजन यांनी नुकतीच झालेली विधानसभा निवडणूक शिवसेना ठाकरे गटाकडून लढवली होती. जळगाव शहर मतदार संघात भाजप उमेदवार सुरेश भोळे यांच्याविरोधात जयश्री महाजन उभ्या होत्या. परंतु जयश्री महाजन यांचा पराभव झाला.