बॉलीवूडची अनेक गाणी जेथे चित्रीत झाली त्या धरणाची शताब्दी येतेय..
हा विल्सन डॅम साल १९२६ रोजी पूर्ण झाला. त्याकाळात ब्रिटीश स्थापत्यशैली आणि भारतीय मजूरांनी हे धरण १६ वर्षात बांधून काढले. या धरणाच्या पाणी अडविणाऱ्या भिंतीची उंची २७८ फूट इतकी आहे. त्याद्वारे ४७ चौरस किलोमीटर पाणलोट क्षेत्र आहे.

साल १९८५ मध्ये प्रदर्शित झालेला ‘राम तेरी गंगा मैली हो गयी’ या चित्रपटासह अनेक हिंदी मराठी चित्रपटाचे शूट झाले तो भंडारदरा यंदा १०० वर्षांचा होत आहे. होय यंदाचे वर्षे हे भंडारदरा धरणाच्या शताब्दीचे वर्षे आहे.या ब्रिटीशकाळात अभियंत्यांनी साल १९०५ मध्ये या जागेचे सर्वेतक्षण केले आणि साल १९१० मध्ये प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली आणि १९२६ मध्ये या धरणाचे काम अखेर पूर्णत्वास आले.
भंडारदरा धरणाला उभारण्यासाठी ८४ लाख रुपये त्याकाळात खर्च झाले होते.येथे १८७५ मध्ये श्रीरामपूर-राहाता भागात पाण्यासाठी कालवे खोदण्यात आले होते. संगमनेर तालुक्यात ओझर येथे १८८५ मध्ये पिकअप वॉल बांधली गेली. आधी शेतीच्या सिंचनाकरीता येथे कालवे बांधले नंतर मग गुळ आणि चुनखडी वापरुन कातळ खोदून बेसाल्ट खडकाची भिंत उभारण्यात आली होती. अखेर हा विल्सन डॅम साल १९२६ रोजी पूर्ण झाला. त्याकाळात ब्रिटीश स्थापत्यशैली आणि भारतीय मजूरांनी हे धरण १६ वर्षात बांधून काढले. या धरणाच्या पाणी अडविणाऱ्या भिंतीची उंची २७८ फूट इतकी आहे. त्याद्वारे ४७ चौरस किलोमीटर पाणलोट क्षेत्र आहे.
या धरणाच्या कामासाठी त्याकाळात ८४ लाख १४ हजार १८८ रुपये खर्च झाल्याची आकडेवारी सांगते.हे धरण शंभर वर्ष पूर्ण होत आले तरीही मजबूत असून केवळ १९७३ मध्ये भंडारदरा धरणाच्या भिंतीचे बळकटीकर झाले होते. ८५ मीटर उंची इतका ११०३९ दशलक्ष घनफूट इतका पाणी साठविण्याची या धरणाच्या भिंतीची क्षमता आहे.
येथे पाहा पोस्ट –
भंडारदरा धरण उभारणीस यावर्षी १०० वर्षे पूर्ण होत आहेत. ब्रिटिशकालीन धरणाचा पाठीचा कणा आजही ताठ असून स्थापत्य शास्त्राचा हा अप्रतिम ठेवा आहे. अवघे ८४ लाख रुपये खर्चुन हे धरण १९२६ ला पूर्ण झाले. आधी शेती सिंचनासाठी कालवे व नंतर गूळ-चुनाखडी वापरून दगडात धरणाची ++ 👇🏻👇🏻 pic.twitter.com/dq6DNof5r7
— ~ Mr_Perfect ~ (@HadkulaTiger1) May 16, 2025
‘सजनी ग भुललो मी, काय जादू झाली..
भंडारदरा, रंधा धबधब्या परिसरात १९४० पासून शंभर हून अधिक चित्रपट आणि ३९ गाण्यांचे चित्रीकरण येथे झाले आहे.१९८५ सालच्या आर.के.बॅनरच्या ‘राम तेरी गंगा मैली चित्रपटातील ‘तुझे बुलाये ये मेरी बाहे.. ‘ आणि कित्येक गाण्यांचे चित्रीकरण भंडारदरा धरणाच्या बागेतील प्रसिद्ध अम्ब्रेला फॉलजवळ झाले आहे. याच धबधब्यात अभिनेत्री मंदाकिनी यांच्यावर ते बहुचर्चित सीन चित्रीत करण्यात आला होता.’सजनी ग भुललो मी, काय जादू झाली’ हे भिंगरी या मराठी चित्रपटातील सुषमा शिरोमणी आणि विक्रम गोखले यांच्यावर चित्रीत झालेले गीत येथे शूट झाले होते.
