AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रविवारी मध्य रेल्वेच्या या मार्गांवर मेगाब्लॉक, पश्चिम आणि हार्बरची काय स्थिती?

मध्य रेल्वे आणि ट्रान्सहार्बर मार्गावर या रविवारी १० मे रोजी मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे लोकलचे वेळापत्रक विस्कळीत असणार आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडताना वेळापत्रक पाहूनच प्रवासाचा निर्णय घ्यावा असे आवाहन केले आहे.

रविवारी मध्य रेल्वेच्या या मार्गांवर मेगाब्लॉक, पश्चिम आणि हार्बरची काय स्थिती?
mega block news
| Updated on: May 09, 2026 | 4:03 PM
Share

उपनगरीय मार्गांवर दर रविवारी विविध अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीची कामे घेतली जातात. त्यामुळे लोकल वाहतूकवर परिणाम होत असतो. येत्या रविवार दिनांक १० मे रोजी मध्य रेल्वेने मेगा ब्लॉक जाहीर केला आहे. यामुळे रविवारी घरातून बाहेर पडताना मुंबईकरांनी लोकलचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडावे असे आवाहन करण्यात येत आहे.

मध्य रेल्वेने येत्या रविवार दि. १० मे २०२६ रोजी आपल्या मुख्य मार्गावर आणि ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक जाहीर केला आहे. मध्य रेल्वेने आपल्या मुख्यमार्गावर माटुंगा आणि मुलुंड दरम्यान आणि ट्रान्स-हार्बर मार्गावर ठाणे आणि वाशी स्थानकांदरम्यान मेगा ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे.

मेगाब्लॉकमुळे प्रभावित होणाऱ्या सेवा खालीलप्रमाणे

मुख्य मार्ग :

ब्लॉक : माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान, अप आणि डाऊन जलद मार्गांवर सकाळी ११.०५ वा. ते दुपारी ३.४५ वाजेपर्यंत

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून सकाळी १०.३६ वा. ते दुपारी ३.१० वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील लोकल माटुंगा स्थानकावर डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल ट्रेन माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान आपल्या नियोजित थांब्यांनुसार थांबतील. तसेच नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने पोहोचतील. ठाण्यापलीकडील जलद गाड्या मुलुंड स्थानकावरुन डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील.

ठाणे येथून सकाळी ११.०३ वा. ते दुपारी ३.३८ वाजेपर्यंत सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील लोकल गाड्या मुलुंड स्थानकावर अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल गाड्या मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान त्यांच्या नियोजित थांब्यानुसार थांबतील. माटुंगा स्थानकावर पुन्हा अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिरा पोहोचतील.

ट्रान्सहार्बर मार्गावर ब्लॉक काळात ट्रेन बंद

मध्य रेल्वेच्या अप आणि डाऊन ट्रान्स-हार्बर लाईनवरील ठाणे आणि वाशी-नेरुळ स्थानकांदरम्यान सकाळी ११.१० वा. ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. त्यामुळे ब्लॉक कालावधीत वाशी-नेरुळ आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन ट्रान्स-हार्बर लाईनवरील लोकल फेऱ्या रद्द राहतील.

ठाणे येथून सकाळी १०.३५ वाजता ते सायंकाळी ४.०७ वाजेपर्यंत वाशी -नेरुळ- पनवेल येथे जाणाऱ्या डाऊन लाईन फेऱ्या आणि  पनवेल-नेरुळ- वाशी येथून सकाळी १०.२५ ते सायंकाळी ४.०९ वाजेपर्यंत ठाण्याकडे जाणाऱ्या अप लाईन लोकल फेऱ्या रद्द राहतील.

हार्बरमार्गावर ब्लॉक असणार नाही

उरण लाईनवर ब्लॉक नाही

पश्चिम रेल्वेवर ब्लॉक नाही

पायाभूत सुविधांची देखभाल आणि लोकल वाहतूक सुरक्षिततेसाठी हे देखभाल ब्लॉक आवश्यक आहेत. यामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?