AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : चंद्रकांत पाटील यांना नोबेल पुरस्कार द्या, जागतिक विज्ञान विद्यापीठाचं कुलगुरू करा – राऊतांनी शालजोडीतून हाणलं

चंद्रकांत पाटलांच्या 'दगडावरील ठसे आधारला लिंक करणार' या विधानामुळे खळबळ उडाली आहे. एका आंदोलनातील दगडांच्या वापरावरून केलेल्या या दाव्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी तीव्र शब्दांत समाचार घेतला. राऊतांनी पाटलांना या 'शोधा'बद्दल नोबेल पुरस्कार देण्याची शिफारस करत, त्यांना जागतिक विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू करण्यावर विचार करण्याची उपहासात्मक सूचना केली.

Sanjay Raut : चंद्रकांत पाटील यांना नोबेल पुरस्कार द्या, जागतिक विज्ञान विद्यापीठाचं  कुलगुरू करा - राऊतांनी शालजोडीतून हाणलं
संजय राऊत यांचा चंद्रकांत पाटील यांना टोला
| Updated on: Jul 31, 2026 | 10:26 AM
Share

अख्खा देश गाजवणारं तरूणाईचं, सीजेपीचं आंदोलन, आता संपलं तरी खूप चर्चेत आहे. भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी यावरून केलेल्या एका वक्तव्यावरून मात्र चांगलीच खळबळ माजली आहे. आंदोलनामध्ये जे दगड वापरले गेलो होते, त्याच्यावरचे ठसे आधारकार्डशी लिंक केले जाणार असून त्याआधारे तपास केला जाणार आहे, असं ते म्हणाले. मात्र त्यांच्या विधानाने खळबळ माजली असून शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी या विधानाच समाचार घेत पाटील यांना शालजोडीतले लगावले आहेत. चंद्रकांत पाटील यांना नोबेल पुरस्कार देण्याची शिफारस मुख्यमंत्री फडणवीस यांनी करावी, त्यांना एखाद्या जागतिक विज्ञान विद्यापीठाचं कुलगुरू करता येईल का ते पहाव, असं म्हणत राऊतांनी पाटील यांना चिमटा काढला.

काय म्हणाले राऊत ?

चंद्रकांत पाटील जे बोलले, त्याबद्दल मी ते वाचलं. चंद्रकांत दादा हे उच्चशिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री आहेत. त्याच्यामध्ये विज्ञान वगैरे जे विषय येतात. चंद्रकांत पाटील यांनी हे जे नवं संशोधन केलं आहे, आंदोलनताल दगड, त्यावरचे ठसे आधारा कार्डला लिंक केलं जाईल, या त्यांच्या शोधाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नोबेल पुरस्कार समितीला एक शिफारस केली पाहिजे. चंद्रकांत पाटील यांना या वर्षीचा विज्ञान व संशोधन या क्षेत्रातला नोबेल पुरस्कार द्यायला हवा, असं राऊत म्हणाले.

पाटील यांना एखाद्या जागतिक विज्ञान विद्यापीठाचं कुलगुरू करता येईल का, याचा शोध घेणं गरजेचं आहे. कारण इतका मोठा शोध आत्तापर्यंत कोणीही लावला नव्हता. दगडावरच्या हातांचे ठसे घेऊन, ते आधार कार्डला लिंक करायचे, आधार कार्डाच शोध केला ते नंदन निलेकणी जे आहेत, ते हा शोध ऐकून 2 दिवस कोमात गेले, काय करावं ते काही त्यांना सुचत नाही. मला कसं नाही हे समजलं, असा खोचक टोला राऊत यांनी लगावला.

त्यांच्या पक्षात सगळे दगड भरलेत

यापूर्वीही चंद्रकांत पाटील यांनी दगडाबद्दल विधानं केली आहेत. त्यांचा दगडाशी फार संबंधं आहे. छातीवर दगड ठेऊन,  रस्त्यालवरचे दगड घेऊन… काय ते कळ नाही.  त्यांच्या सारख्या ज्ञानी महापुरूषाचा दगडाशी फार संबंध आहे, याचा अर्थ असा आहे की , त्यांच्या पक्षात जे सगळे दगड-धोंडे आलेले आहेत,  बिनडोक, त्याचा हा परिणाम दिसतोय, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली. त्यांना विज्ञानातला नोबेल पुरस्कार देण गरजेचं आहे, नाहीतर देश एका मोठ्या वैज्ञानिकाला मुकेलं, असाही टोला त्यांनी पुन्हा लगावला.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा