
मुंबई : राजस्थानातील मेवाड प्रांतात चित्तोड आणि सिसोदे ही एकाच वंशाची दोन नावे होती. चित्तोडच्या वंशांना रावळ तर सिसोदे यांच्या वंशजांना राणा अशा संज्ञा होत्या. या दोन्ही घराण्याचे मूळ मात्र अयोध्या प्रांतात सिसोदे नावाचे सूर्यवंशीय राजघराणे होते. पुढे दिल्लीत यवनांचे राज्य आले. सत्तेच्या लालसेपोटी यवन बादशाह यांनी राजपूत राजांवर आक्रमणे केली. त्यांच्यात वारंवार युद्धे होत होती. अनेक हिंदुराजे त्यांचे अंकित झाले. पण, चितोडच्या शूर राजपुतांनी त्यांना मुळीच दाद दिली नाही. सन 1303 साली दिल्लीचा सुलतान अल्लाउद्दीन खिलजी याने चित्तोडवर स्वारी केली. त्यावेळी चितोडवर रावळ रत्नसिंह याचे राज्य होते. रत्नसिंह याची पत्नी राणी पद्मिनी ही अति लावण्यवती होती. तिला प्राप्त करण्याच्या लालसेने खिलजी याने आक्रमण केले होते. खिलजी याच्या आक्रमणाला रावळ रत्नसिंह प्रतिकार करत होता. त्याच्या सोबतीला सिसोद्याचे राणा लक्ष्मणसिंह आपल्या सात मुलांसह मदतीसाठी धावून आला. अल्लाउद्दीन खिलजी काही केल्या चितोडचा वेढा...