संजय राऊत यांच्यावर हल्ला होऊ शकतो, छगन भुजबळ यांनी सांगितलं कारण

किरण बाळासाहेब ताजणे, Tv9 मराठी

Updated on: Nov 29, 2022 | 1:21 PM

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना कर्नाटक न्यायालयाने मागील काही वर्षांपूर्वी भडकाऊ भाषण केले म्हणून त्याकरिता समन्स बजावले आहेत.

संजय राऊत यांच्यावर हल्ला होऊ शकतो, छगन भुजबळ यांनी सांगितलं कारण
Image Credit source: TV9 Network

नाशिक : भडकाऊ भाषण केले म्हणून संजय राऊत यांना कर्नाटक न्यायालयाने समन्स बजावले आहे. त्याकरिता संजय राऊत हे कर्नाटकमध्ये जाणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी माझ्यावर हल्ला होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली होती. त्यावर राष्ट्रावादी कॉँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. भुजबळ म्हणाले, संजय राऊत यांच्या वर हल्ला चढविण्यासाठी बोलावलं जातं ही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे राऊत यांच्या जीवाला धोका असल्याचे बोलले जात आहे. छगन भुजबळ यांनी देखील सीमा प्रश्नाच्या संदर्भात यापूर्वी अनेक आंदोलन केले आहे, त्याप्रकरणी त्यांच्यावर पोलीसांनी कारवाई देखील केली होती. भुजबळ यांनी वेशभूषा बदलून बेळगावमधून प्रवेश केला होता. त्यामुळे कर्नाटकमध्ये संजय राऊत जात असतांना त्यांच्यावर हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी शंका उपस्थित केल्याने खळबळ उडाली आहे.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना कर्नाटक न्यायालयाने मागील काही वर्षांपूर्वी भडकाऊ भाषण केले म्हणून त्याकरिता समन्स बजावले आहेत.

संजय राऊत कर्नाटक न्यायालयात जाणार आहे, त्यामध्ये संजय राऊत यांनी स्वतः माझ्यावर हल्ला होऊ शकतो, त्यामुळे राजकारण न करता अमित शाह यांनी याबाबत लक्ष घातलं पाहिजे असं म्हंटलं आहे.

त्यामुळे संजय राऊत यांनी माझ्यावर हल्ला होऊ शकतो त्याबाबत मला भीती आहे. अशी शंका देखील राऊत यांनी उपस्थिती केली होती, त्यावरच छगन भुजबळ यांनीही मात व्यक्त केले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून कर्नाटक आणि महाराष्ट्रा सीमा प्रश्न हा वाद सुरू आहे. बेळगाव हे महाराष्ट्रात यायला हवे होते, जगातलं सगळ्यात मोठे आंदोलन इतक्या वर्ष चाललं असल्याचे भुजबळ यांनी म्हंटले आहे.

सगळ्या पक्षानी एकत्र येऊन लढायला हवं, आम्ही जास्त लोकशाही वादी आहोत म्हणून ते इकडे येऊन झेंडे लावत आहे. चंद्रकांत पाटील,शंभू राज बेळगाव जाताय आणि त्यांचे लोक दिल्लीत कोर्टात जात आहे.

हे सुद्धा वाचा

आपण दिल्लीत कोर्टात जायला हंव, नाहीतर पुन्हा महाजन कमिशन सारखं व्हायचं, सरकार कमी पडत आहे अस नाही असं छगन भुजबळ म्हणाले आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI