AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मंत्रिपद किती वेळा आले अन् गेले, भुजबळ कधी संपले नाही? छगन भुजबळ यांचा थेट पक्षातील श्रेष्ठींना इशारा

Chhagan Bhujbal On Maharashtra Cabinet Expansion: मी ओबीसीची लढाई लढलो. त्यामुळे सर्व ओबीसी एकत्र आले आणि महायुतीला मोठे यश मिळाले आहे. अर्थात त्यात लाडकी बहीणचा वाटा आहे. परंतु ओबीसींचा सपोर्टही आहे. ओबीसींच्या लढाईमुळे यश मिळाले आहे, असे ज्यांना वाटते त्यांच्याबद्दल मी आभारी आहे, असे भुजबळ यांनी म्हटले.

मंत्रिपद किती वेळा आले अन् गेले, भुजबळ कधी संपले नाही? छगन भुजबळ यांचा थेट पक्षातील श्रेष्ठींना इशारा
chhagan bhujbal, Ajit pawar
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Dec 16, 2024 | 12:43 PM
Share

Chhagan Bhujbal On Maharashtra Cabinet Expansion: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना देवेंद्र फडणवीस सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळात स्थान दिले नाही. त्यामुळे छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा मंत्रिमंडळाच्या विस्तारापासून सुरु होती. अखेर सोमवारी माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ यांनी त्याला दुजोरा दिला. आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली. ते म्हणाले, मी सामान्य कार्यकर्ता आहे. मला डावलले काय आणि फेकले काय? काही फरक पडत नाही. मंत्रिपद किती वेळा आले आणि गेले. पण भुजबळ काही संपले नाही, असे वक्तव्य करत त्यांनी पक्षश्रेष्ठींना इशारा दिला.

अजित पवार यांच्याशी चर्चा नाही

मंत्रिपद मिळाले नाही, त्यानंतर पक्षातील नेत्यांशी किंवा अजित पवार यांच्याशी काही चर्चा झाली का? त्या प्रश्नावर भुजबळ म्हणाले, मी कालपासून काही चर्चा केली नाही. मी कुणाशी बोललो नाही. पुढे काय करायचे हे माझ्या लोकांशी, समता परिषदेच्या कार्यकर्त्यांशी बोलून ठरवणार आहे. तुम्ही शरद पवार यांच्याकडे जाणार का? या प्रश्नावर भुजबळ म्हणाले, शरद पवार यांच्याकडे मी १२ डिसेंबरला जाऊन आलो ना.

ओबीसीमुळे महायुतीला यश

मी ओबीसीची लढाई लढलो. त्यामुळे सर्व ओबीसी एकत्र आले आणि महायुतीला मोठे यश मिळाले आहे. अर्थात त्यात लाडकी बहीणचा वाटा आहे. परंतु ओबीसींचा सपोर्टही आहे. ओबीसींच्या लढाईमुळे यश मिळाले आहे, असे ज्यांना वाटते त्यांच्याबद्दल मी आभारी आहे, असे भुजबळ यांनी म्हटले.

मनोज जरांगे यांना अंगावर घेतले, त्याचे हे बक्षीस

मनोज जरांगे यांना अंगावर घेतले, त्याचे हे बक्षीस मिळाले, अशी संतप्त प्रतिक्रिया भुजबळ यांनी माध्यमांकडे बोलताना दिली. मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांचा वाद राज्यभर गाजला. या वादात छगन भुजबळ यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे अजित पवार यांची कोंडी झाली होती. छगन भुजबळ व मनोज जरांगे वादाचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसल्याचे मत पक्षातील काही लोकांनी व्यक्त केले होते.

Follow Us
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?