AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“निवडणुका जवळ आल्यानंतर काही घटक…”, मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर छगन भुजबळ यांच ते ट्वीट व्हायरल

राज्यात राजकीय भूकंपाच्या वर्षापूर्तीनंतर आणखी मोठी घडामोड घडली आहे. पहाटेच्या शपथविधी डिवचलं जाणाऱ्या अजित पवार यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यामुळे राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

निवडणुका जवळ आल्यानंतर काही घटक..., मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर छगन भुजबळ यांच ते ट्वीट व्हायरल
"...अशा प्रवृत्तीना खरे उत्तर ठरेल", शपथ घेण्यापूर्वी छगन भुजबळांना अशी मांडली होती भूमिका
| Updated on: Jul 02, 2023 | 5:46 PM
Share

मुंबई : राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही, असं काहीसं गेल्या म्हणावं लागेल. गेल्या वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना दणका देत संपूर्ण शिवसेना आपल्यासोबत उभी केली. पक्षाचं आणि 40 आमदारांसह भाजपाशी युती करत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. या घडामोडीला वर्ष पूर्ण झालं असताना राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. अजित पवार यांनी पुन्हा एकदा भाजपा-शिवसेना गटाशी सलगी केली आहे. त्यामुळे राजकीय जाणकारांना आश्चर्याचा मोठा धक्का बसला आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ देली. यावेळी त्यांच्यासोबत छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा आत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे व अनिल पाटील यांना देखील मंत्रिपदाची शपथ देण्यात आली.

छगन भुजबळ यांचं ते ट्वीट आणि व्हिडीओ व्हायरल

काल परवापर्यंत भाजपावर ताशेरे ओढणाऱ्या नेत्यांचं घुमजाव पाहून सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. इतकंच काय तर शरद पवार यांच्या देवेंद्रवासी या वक्तव्याचाही खरपूस समाचार घेतला जात आहे. याच पार्श्वभूमीवर मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या छगन भुजबळ यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरील तो व्हिडीओ चर्चेत आला आहे.

“जाती जातीमध्ये, धर्मा धर्मामध्ये भांडणं लावायचं काम सुरु आहे. ठराविक लोक मुद्दाम काहीतरी करतात आणि अल्पसंख्यांक हे करत आहेत. म्हणून अल्पसंख्याकांच्या विरुद्ध बहुसंख्याकांना उठवतात आणि दंगे कसे होतील ते पाहतात. निवडणुकांपर्यंत जे आहे. हे सगळे दंगे जे आहेत, हे वाढविण्याचं काम या महाराष्ट्रात होणार आहे. कदाचित या देशात होणार आहे. आज आपण या गोष्टींना अजिबात बळी पडता कामा नये.”

छगन भुजबळ यांची राजकीय कारकिर्द

शिवसेनेतून राजकारणाची सुरुवात केली. 1973 मुंबई महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून गेले होते. 1973 ते 1984 मुंबई महापालिकेत विरोधी पक्षनेता म्हणून भूमिका बजावली. त्यानंतर 1985 मध्ये मुंबईचे महापौर म्हणून निवड झाली. 1991 मध्ये दुसऱ्यांदा मुंबई महापालिकेत मुंबईचे महापौर म्हणून विराजमान झाले. 1991 मध्ये शिवसेना सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

1999 मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केल्यानंतर भुजबळांचाही राष्ट्रवादीत प्रवेश केला. 1985 आणि 1990 अशा दोन वेळा मुंबईतील माझगावमधून विधानसभेवर निवडून आले. नोव्हेंबर 1991 मध्ये महसूलमंत्रिपदी विराजमान झाले.

1995 पर्यंत गृहनिर्माण आणि झोपडपट्टी सुधारणा या खात्याचे मंत्री होते. एप्रिल 1996 मध्ये विधान परिषदेत विरोधी पक्षनेते होते. 18 ऑक्टोबर 1999 रोजी उपमुख्यमंत्रिपदाची माळ गळ्यात पडली. सोबतच गृह आणि पर्यटन खात्यांचाही कारभार सांभाळला.

एप्रिल 2002 मध्ये विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाली. एप्रिल 2002 ते 23 डिसेंबर 2003 या कालावधीत उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्रिपद सांभाळलं. 2004 मध्ये येवला मतदारसंघातून विधानसभेवर निवड आले. नोव्हेंबर 2004 ते 3 डिसेंबर 2008 या कालावधीत सार्वजनिक बांधकाममंत्री झाले. 2010 रोजी महाराष्ट्राचे दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री झाले

BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.