AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काही लोक सुतळी बॉम्ब घेऊन आले, आता ते…, महाएल्गार सभेपूर्वीच भुजबळांना भीती, नेमकं काय म्हणाले?

हौदराबाद गॅझेटवरून राज्यात सध्या वातावरण चांगलंच तापलं आहे, याविरोधात आज बीडमध्ये ओबीसी नेत्यांची महाएल्गार सभा पार पडत आहे, या सभेपूर्वी भुजबळांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

काही लोक सुतळी बॉम्ब घेऊन आले, आता ते..., महाएल्गार सभेपूर्वीच भुजबळांना भीती, नेमकं काय म्हणाले?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 17, 2025 | 7:04 PM
Share

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात हैदराबाद गॅझेट लागू करण्यात आलं आहे, मात्र हैदराबाद गॅझेटवरून सध्या चांगलंच वातावरण तापलं आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यास ओबीसी समाजाचा तीव्र विरोध होत आहे, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यात येऊ नये अशी समाजाची भूमिका आहे. हैदराबाद गॅझेट रद्द करण्याची मागणी सुरू असून, या विरोधात आता ओबीसीचे सर्व नेते एकवटल्याचं चित्र पहायला मिळत आहे.

आज बीडमध्ये ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी मंत्री छगन भुजबळ यांची महाएल्गार सभा पार पडत आहे. या सभेला आमदार धनंजय मुंडे, आमदार गोपीचंद पडळकर, प्रकाश शेंडगे, लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारेंसह ओबीसीचे जवळपास सर्वच नेते उपस्थित आहे. मात्र ही सभा सुरू होण्यापूर्वीच भुजबळ यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे, त्यामुळे आता चर्चेला उधाण आलं आहे.

नेमकं काय म्हणाले भुजबळ?  

आपल्याकडे काही लोक घुसवले आहेत. सुतळी बॉम्ब घेऊन आले आहेत. ते काही तरी गडबड करतील. त्यांना तिथेच दाबायचं आणि पोलिसांच्या हवाली करायचं. तुम्ही शांतपणे आपले नेते लोक काय सांगतात ते ऐकायचं. नेत्यांनी आपले विचारही कमीत कमी शब्दात पोहोचवायचे आहेत, असं यावेळी भुजबळ यांनी म्हटलं आहे. सोबतच आमचे काही लोक आमच्यावर नाराज होतात, आम्हाला बोलायला दिलं नाही. आमचा फोटो नाही, असं म्हणतात. मला त्यांना सांगायचं आहे, अधिकार की लड़ाई में निमंत्रण नहीं भेजे जाते। जिसका ज़मीर जिन्दा है वो खुद समर्थन में आ जाते हैं, असंही यावेळी भुजबळ यांनी म्हटलं आहे.

दरम्यान या सभेमध्ये बोलताना भटक्या समाजाचे नेते लक्ष्मण गायकवाड यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. छत्रपतींना विरोध करणारे सर्वजण आज जरांगे पाटलांबरोबर आहेत. पाटील आणि साऱ्या गावाचं चाटील आणि नंतर ओबसीचं चाटील. मराठ्यांना आवाहन आहे,  जरांगे पाटलाच्या मागे लागलात तर सगळं वाटोळं होईल, हाती काहीच लागणार नाही, असं लक्ष्मण गायकवाड यांनी म्हटलं आहे, तसेच स्वाभिमानीची मशाल पेटवा, आणि मराठ्यांना सत्तेमधून कायमचं हटवा,  ओबीसींना सत्तेत पाठवा, अशी घोषणाही त्यांनी यावेळी दिली.

टोमणे मारणे हाच उद्योग राहिलाय! शिरसाट यांचं ठाकरेंना खोचक प्रत्युत्तर
टोमणे मारणे हाच उद्योग राहिलाय! शिरसाट यांचं ठाकरेंना खोचक प्रत्युत्तर.
सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडले राईट टू डिस्कनेक्ट विधेयक
सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडले राईट टू डिस्कनेक्ट विधेयक.
रुपाली पाटील पक्ष सोडणार? अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाद
रुपाली पाटील पक्ष सोडणार? अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाद.
शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत
शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत.
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप.
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस.
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक.
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार.
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....