AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मला तुला पर्सनल भेटायचंय, नाहीतर तुझ्या मुलीला… अजित पवार गटाच्या नेत्याकडून महिला अधिकाऱ्याला धमकी, तहसील कार्यालयात घुसून जे केलं…

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात महिला मंडळ अधिकाऱ्याला अश्लील मेसेज पाठवून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचा पदाधिकारी युवराज चावरे याच्यावर पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मला तुला पर्सनल भेटायचंय, नाहीतर तुझ्या मुलीला... अजित पवार गटाच्या नेत्याकडून महिला अधिकाऱ्याला धमकी, तहसील कार्यालयात घुसून जे केलं...
फोटो प्रातिनिधिक
| Updated on: May 17, 2026 | 11:18 AM
Share

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातून एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. विहामांडवा विभागात कार्यरत असलेल्या एका महिला मंडळ अधिकाऱ्याला अश्लील मेसेज पाठवून मानसिक त्रास देणे, बदनामी करणे आणि थेट जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका राजकीय पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युवराज चावरे असे या आरोपीचे नाव आहे. तो स्वतःला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा तालुकाध्यक्ष असल्याचे सांगत महिला अधिकाऱ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या गंभीर प्रकरणामुळे जिल्ह्यात राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

व्हॉट्सॲपवर अश्लील व्हिडिओ आणि मानसिक छळ

मिळालेल्या माहितीनुसार, विहामांडवा येथील महिला मंडळ अधिकारी आपल्या पदावर कर्तव्य बजावत असताना आरोपी युवराज चावरे याने त्यांच्या मोबाईलवर व्हॉट्सॲपद्वारे अश्लील संदेश आणि व्हिडीओ पाठवण्यास सुरुवात केली. एवढेच नव्हे तर, मी तुला रोज असाच मानसिक त्रास देणार अशी उघड धमकी दिली. “मला तुला पर्सनल भेटायचे आहे” असे आक्षेपार्ह मेसेजही तो पाठवायचा. या प्रकरणी महिला अधिकाऱ्याने विरोध करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीची मुजोरी आणखी वाढली.

तहसील कार्यालयात घुसून धक्काबुक्की 

हा छळ केवळ मेसेजपुरता मर्यादित राहिला नाही. आरोपी युवराज चावरे याने थेट तहसील कार्यालयात जाऊन महिला अधिकाऱ्याला गाठले. तिथे त्याने सर्वांसमोर महिला अधिकाऱ्याला अश्लील शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. अत्यंत मुजोरपणा दाखवत “तुझे घर मला माहिती आहे, तुझ्या मुलीला गायब करून टाकीन,” अशी थेट जीवे मारण्याची आणि कुटुंबाला संपवण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे महिला अधिकारी अत्यंत भीतीच्या आणि मानसिक दबावाखाली आल्या होत्या.

पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

या जाहीर अपमान आणि सततच्या त्रासाला कंटाळून अखेर महिला अधिकाऱ्याने कायदेशीर पाऊल उचलले. त्यांनी पाचोड पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपीविरुद्ध रीतसर फिर्याद नोंदवली. महिला अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून पाचोड पोलिसांनी आरोपी युवराज चावरे याच्याविरुद्ध विनयभंग, माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act) आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, पाचोड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक या प्रकरणाचा पुढील तपास करत असून आरोपीचा शोध घेतला जात आहे. शासकीय महिला अधिकाऱ्याला अशा प्रकारे धमकावणाऱ्या राजकीय पदाधिकाऱ्यावर पोलीस काय कडक कारवाई करतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?