AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तो पुरावा द्या, नाहीतर मतीन पटेलचं घर जमीनदोस्त होणार…; शिवसेना नेत्याचा इशारा

नाशिक धर्मांतर प्रकरणी छत्रपती संभाजीनगरचे माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी एमआयएमवर गंभीर आरोप केले असून, आरोपीला आश्रय देणाऱ्या मतीन पटेलच्या घरावर बुलडोझर चालवण्याचा इशारा दिला आहे.

तो पुरावा द्या, नाहीतर मतीन पटेलचं घर जमीनदोस्त होणार...; शिवसेना नेत्याचा इशारा
matin patel
| Updated on: May 11, 2026 | 9:33 PM
Share

नाशिक येथील एका नामांकित आयटी कंपनीत समोर आलेल्या धर्मांतर प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरवून सोडले आहे. या प्रकरणाचे धागेदोरे आता छत्रपती संभाजीनगरपर्यंत पोहचले असून राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींना आश्रय देणाऱ्या मतीन पटेल याच्या घरावर आता प्रशासकीय कारवाईची टांगती तलवार आहे. देशद्रोही कारवाया करणाऱ्यांना शहरात थारा मिळणार नाही. मतीन पटेलने नोटीशीला योग्य उत्तर दिले नाही, तर त्याच्या घरावर १०० टक्के बुलडोझर चालणार, असा निर्वाणीचा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख आणि उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी दिला आहे.

नेमकं प्रकरण काय?

नाशिकमधील एका आयटी सॉफ्टवेअर कंपनीत काम करणाऱ्या हिंदू तरुण-तरुणींना प्रलोभने देऊन किंवा मानसिक दबाव टाकून त्यांचे धर्मांतर केले जात असल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. या प्रकरणात निदा खान ही मुख्य आरोपी म्हणून समोर आली. तपासादरम्यान नाशिक पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधून निदा खानला ताब्यात घेतले. धक्कादायक बाब म्हणजे, निदा खानला शहरात मतीन पटेल नामक व्यक्तीने आश्रय दिला होता. यावरून आता शहरातील हिंदुत्ववादी संघटना आणि स्थानिक नेते आक्रमक झाले आहेत.

एमआयएमवर थेट निशाणा

राजेंद्र जंजाळ यांनी या संपूर्ण प्रकरणामागे एका विशिष्ट राजकीय विचारसरणीचा हात असल्याचा आरोप केला आहे. हे केवळ धर्मांतर नसून एक मोठे षडयंत्र आहे. सक्तीने आणि आमिष दाखवून केले जाणारे हे धर्मांतर एमआयएम (MIM) पक्षाच्या पाठिंब्याशिवाय शक्य नाही. एमआयएमचे नेते इम्तियाज जलील असोत वा अन्य कोणी, जे या प्रकरणाशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे संबंधित आहेत, त्या सर्वांची सखोल चौकशी होऊन त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हायला हवा, असे राजेंद्र जंजाळ यांनी म्हटले.

प्रशासकीय नोटीस आणि बुलडोझरची चर्चा

मतीन पटेल याने गुन्हेगाराला आश्रय दिल्याने त्याचे घर आता रडारवर आले आहे. महानगरपालिका किंवा संबंधित प्रशासकीय विभागाने त्याच्या मालमत्तेच्या वैधतेबाबत नोटीस बजावली आहे. यावर बोलताना जंजाळ यांनी स्पष्ट केले की, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. जर मतीन पटेलने समाधानकारक कागदपत्रे सादर केली नाहीत, तर उत्तर प्रदेशच्या धर्तीवर येथेही बेकायदेशीर बांधकामावर बुलडोझर फिरवला जाईल.

शहरात कडक बंदोबस्त

या प्रकरणाच्या संवेदनशीलतेमुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. नाशिक पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा संयुक्त तपास करत असून, आणखी काही मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Follow Us
अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंच
Vikas Lavande : अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंचा मोठा दावा
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप,
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप, न्यायालयात जाणार!
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट....
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट एकनाथ शिंदेंकडे मांडली तक्रार!
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरण...
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान नेमका कोणाला दिला इशारा?
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला...
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला विक्रमी भाव, शेतकऱ्यांना दिलासा!
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड...
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड होताच पहिली प्रतिक्रिया
महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड...
Gokul Milk Union Big Update : महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले, आज उद्धव ठाकरे...
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणा
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणार? हसन मुश्रीफांचं मोठं विधा
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य....
NCP Merger : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य करण्याचा अधिकार केवळ...; नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?