कृषी विभाग विभागाकडून शेतकऱ्यांना मोठे आवाहन, पेरणीकरिता घाई नको, देवेंद्र फडणवीस यांनीही..

राज्यात पेरण्या रखडल्या आहेत. मॉन्सूनचा पाऊस दाखल झाला नाही. यादरम्यानच कृषी विभाग आणि देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना मोठे आवाहन केले. पेरण्याबाबत हे आवाहन करण्यात आले. 20 जूनला मॉन्सून राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे.

कृषी विभाग विभागाकडून शेतकऱ्यांना मोठे आवाहन, पेरणीकरिता घाई नको, देवेंद्र फडणवीस यांनीही..
Agriculture Department
| Updated on: Jun 15, 2026 | 8:45 AM

भारतीय हवामान विभागाने राज्यात 15 जून 2026 रोजी मॉन्सूनचा पाऊस येण्याचा अंदाज दिला होता. मात्र, मॉन्सून अजून अरबी समुद्रातच आहे. मॉन्सून अरबी समुद्रातून पुढे वाटचाल करताना दिसत नाही. एकाच ठिकाणी आहे. अफगाणिस्तानच्या दिशेने आलेल्या वाऱ्याने मॉन्सूनला अडथळा निर्माण झाला. आता भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, राज्यात 20 जूनपर्यंत मॉन्सून दाखल होईल. या अंदाजानुसार, शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. शेतकऱ्यांनी शेत पेरणीसाठी तयार ठेवले. नांगरनी झाली, घरात बिय बियाने, खते आणून टाकली आहेत. मात्र, वरूण राजा काही बरसताना दिसत नाहीये. शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत. यंदा पाऊस कमी पडण्याचा इशारा देण्यात आला. त्यात एल निनोचे वेगळे संकट उभे आहे. प्रशांत महासागरात एल निनो सक्रिय आहे. फक्त राज्यातीलच नाही तर देशातील मॉन्सून आजच्या घडीला धोक्यात आहे. 20 जूनच्या पावसाकडून सर्वांना अपेक्षा आहेत.

मॉन्सूनचा पाऊस 20 जूनला राज्यात दाखल होईल. त्यानंतर कृषी विभाग शेतकऱ्यांना पेरण्याबद्दल आवाहन करेल. कृषी विभागाने शेतकऱ्यांना मोठा इशारा देत स्पष्ट सांगितले आहे की, जोपर्यंत शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून आवाहन केले जात नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरण्या करू नयेत. जर आता पेरण्या केल्या तर दुबार पेरणीचे संकट उभे राहू शकते.

मॉन्सूनचा पाऊस जरी 20 जूनला दाखल होण्याचा अंदाज असला तरीही अजूनही तो अंदाजच आहे. अगोदर 15 जूनला मॉन्सून दाखल होईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, मॉन्सून पुढे गेला. यासोबतच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शेतकऱ्यांना मोठे आवाहन करत म्हटले की, शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. ज्यावेळी सांगितले जाईल, त्यावेळी पेरण्या कराव्यात.

अरबी समुद्रात मॉन्सून दाखल झाला. मात्र, तो एकाच ठिकाणी रेंगाळला आहे. पुढील 3-4 दिवसात मॉन्सून पुढे वाटचाल करण्याची शक्यता आहे. पण जोपर्यंत मॉन्सून पूर्णपणे मुंबईसह राज्यात दाखल होत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरण्या करू नयेत. पेरण्या रखडल्याने शेतकरी राजा चिंतेत आहे.

Follow Us