AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठवाड्यात पावसाचा कहर, मुख्यमंत्र्यांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना मोठे आदेश, उद्याचा दिवस..

मराठवाड्यात सतत पाऊस सुरू असून पुरस्थिती निर्माण झालीये. अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. पिकांचे मोठे नुकसान झाले असून संपूर्ण शेती वाहून गेली. आता याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतलाय.

मराठवाड्यात पावसाचा कहर, मुख्यमंत्र्यांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना मोठे आदेश, उद्याचा दिवस..
Devendra Fadnavis
| Updated on: Sep 28, 2025 | 1:02 PM
Share

राज्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाचा कहर बघायला मिळतोय. अनेक भागांमध्ये अतिवृष्टी झाली असून पिकांचे मोठे नुकसान झाले. हेच नाही तर अजूनही अनेक गावांना पाण्याचा वेढा आहे. पूरस्थितीमध्ये लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम सध्या सुरू आहे. अधिकाऱ्यांनी नुकसानचे पंचनामे सुरू केली आहेत. हेच नाही तर जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात सर्व यंत्रणा असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आलीये. मात्र, ही मदत पुरेशी नसल्याचे विरोधक म्हणत आहेत. आजही राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाचा जोर बघायला मिळतोय. सतत पाऊस सुरू आहे. प्रशासनाने नागरिकांना कामाशिवाय घरा बाहेर न पडण्याचे आवाहन केलंय.

राज्यातील पावसाच्या परिस्थितीवर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे म्हणाले की, मराठवाड्यात एकाच दिवसात 113 टक्के पावसाची नोंद झालीये. काही ठिकाणी जणावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालाय. मी जिलहाधिकाऱ्यांना सांगून जणावरांच्या चाऱ्याचीही व्यवस्था केली आहे. आपण अगोदरच 2 हजार कोटी रिलीज केले आहेत. त्याचे वाटप देखील सुरू केले आहे. ज्या घरांमध्ये पाणी शिरले आहे, तिथे 10 हजारांची मदत देखील आपण सुरू केली आहे.

ठिकठिकाणी लोकांना राशनच्या किड वाटप देखील सुरू आहेत. मी जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट सांगितले आहे की, खालची यंत्रणा योग्य काम करत आहे की, नाही हे बघा. तुम्ही पण बाहेर रहा. आता काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झालेला आहे. कुठे पाणी शिरू शकते, याचा अंदाज घेऊन पहिले या लोकांना बाहेर काढा. देवेंद्र फडणवीसांनी मराठवाड्यातील पूरस्थितीचा आढावा घेतला आहे.

नुकसानग्रस्तांना तातडीची मदत केली जात आहे. आजचा दिवस आणि उद्याचा दिवस अधिक सर्तकेचा आहे. पुढचे दोन ते तीन दिवस अलर्ट मोडवर राहून कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही आणि कमी हानी होईल अशाप्रकारची व्यवस्था केली जातंय. सरकार जास्तीत-जास्त मदत लोकांना कशी पोहोचवता येईल, याकरिता प्रयत्न करत आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?