AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टीका करणारे दगड फेकतात, पण मी कासवासारखा… देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान, म्हणाले, माझी चाल..

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये मोठे खुलासे करताना फडणवीस दिसले. आपली भूमिका कासवाप्रमाणे असल्याचे म्हटले. कासवाचा वेग नाही पण कासवासारखे कवच आपल्याकडे असल्याचे त्यांनी म्हटले.

टीका करणारे दगड फेकतात, पण मी कासवासारखा… देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान, म्हणाले, माझी चाल..
Devendra Fadnavis
| Updated on: Sep 20, 2026 | 2:00 PM
Share

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये फडणवीस विरोधकांबद्दल बोलताना दिसले. देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, माझी प्रेरणा ही कासव आहे… माझी स्पीड कासवाची नाही पण प्रेरणा कासवाची आहे. कारण धोका आला कुणी दगड मारला की आपल्या कवचामध्ये कासवासारखा जातो आणि परत बाहेर येतो… देवेंद्र फडणवीस यांनी हे अत्यंत मोठे विधान केले. फडणवीस यांनी म्हटले, मला दिवसभर भेटणारे लोक, राज्यात उद्योग सुरु करणारे उद्योजक आणि माझ्या परिवारात बायको आणि मुलगी हे कायम काम करण्यासाठी ऊर्जा देत असतात. नागपूरात आम्ही लोक घरांचा पत्ता विचारत नाही कोण कोणाच्या घराजवळ राहतो असे आम्ही पत्ता सांगतो. माझी अनेक मित्र असे आहेत की त्यांच्यासाठी मी मुख्यमंत्री नाही. अनेक लोक मला सांगतात की हे बरोबर नाही, असे ते सांगतात.

अनेकदा लोक मोठ्या पदावर लोक गेल्यावर ते स्वत:बद्दल चुकीचे काही एकण्याची तयारी ठेवत नाहीत. पण मी सर्व ऐकण्याची तयारी ठेवतो. आपल्या चुकीच्या गोष्टीही लोकांनी आपल्याला सांगितल्या पाहिजेत. महायुतीचे सरकार आहे. आपण पुर्ण मनाने एखादे काम केले. तर सहयोगी पक्ष मदतीला येतात. मी समृद्धी महामार्ग तयार करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा सहयोगी पक्षांनी मला सहयोग केला.

ते माझ्यासोबत कायम राहिले. पण शरद पवार यांनी तेव्हा विरोध केला. उद्धव ठाकरे यांनी देखील विरोध केला जेव्हा की ते आमचे महायुतीचे भाग होते. पण मी माझ्या ध्येयाला धरून काम करत राहिलो. आज समृद्धी महामार्ग तयार झाला. एका वर्षात आम्ही जमीन अधिग्रहित केल्या, जे लोक विरोधात बोलायचे ते आज या प्रकल्पाचे गुणगान गात आहेत. सगळ्या विरोधकांचे तोंड बंद झाले.

मुंबईत वेस्टर्न एक्सप्रेस वे ला आम्ही समांतर रोड तयार करणार आहोत. ठाणे बोरीवली हा नवा मार्ग तयार करतोय, नवे भुयार तयार केले जात आहे. आता बुलेट ट्रेन आणि मुंबई विमानतळ जोडणार आहेत. मुंबईत कोणीही कुठे 45 मिनिटात पोहचू शकेल असा आमचा प्रयत्न आहे. तिसरी मुंबई आम्ही तयार करतोय.

Follow Us
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...