AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुष्काळी परिस्थिती पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक

राज्यात यंदा मोठा दुष्काळ पडला आहे. स्थिती गंभीर आहे. त्यातच केंद्राचे पथक राज्यातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी पोहोचले होते. मुख्यमंत्र्यांसोबत या पथकाची बैठक झाली.

दुष्काळी परिस्थिती पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक
Devendra Fadnavis
| Updated on: Oct 11, 2026 | 12:47 PM
Share

राज्यात यंदा समाधानकारक पाऊस झाला नाही. पिके हातून गेली. त्यातच राज्य सरकारने दुष्काळाची घोषणा केली. राज्यातील अनेक भागात स्थिती गंभीर आहे. दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक राज्यात दाखल झाले. त्यांनी अनेक भागात जाऊन दुष्काळाची पाहणी केली. दुष्काळी परिस्थिती पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली. यावेळी गिरीश महाजन, दत्तात्रय भरणे, मकरंद पाटील हे मंत्री उपस्थित होते. केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाचे प्रमुख केंद्रीय संयुक्त सचिव मुक्तानंद अग्रवाल आणि पथकातील इतर सदस्य यांच्यासोबत बैठक केली. यंदा राज्यात कोरडा दुष्काळ पडला असून धरणातील पाणीसाठा कमी होत आहे. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. एलनिनोचे मोठे संकट आहे. एलनिनोमुळे समाधानकारक पाऊस झाला नसल्याचे सांगितले जातंय.

केंद्रीय पथकाची निरीक्षणे

कापूस आणि सोयाबीन उत्पादन कमी झाले. तूर सुद्धा प्रभावित झाली. पाण्याचे स्त्रोत प्रभावित झाला असून पाण्याचा गंभीर प्रश्न आहे. केंद्रीय पथकाच्या प्रत्येक सदस्याने सांगितली परिस्थिती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यादरम्यान केंद्रीय पथकाने सर्वंकष दौरा केला, त्याबद्दल आभार मानले. मोठे कृषी संकट आहे. रब्बीवर सुद्धा संकट आहे. सर्व प्रकारची मदत शेतकऱ्यांना द्यावी लागेल, असेही त्यांनी म्हटले.

मदतीचा फोकस हा सामान्य शेतकरी आणि शेतमजूर असेल.केंद्राकडून अधिक मदत मिळावी. पिण्याच्या पाण्याची समस्या असेल, राज्य सरकार संपूर्ण नियोजन करेल. संकटाला संधीत परावर्तित करण्याचा प्रयत्न करावा लागेल. पशुधन वाचवावे लागेल. पाण्याचे आरक्षण आम्ही केले आहे. प्राधान्य पिण्याचे पाणी आणि प्राण्यांसाठी पाणी असेच आहे.

प्राथमिक निवेदन आम्ही सादर केले आहे. लवकरच अंतिम अहवाल सादर करू, असे त्यांनी म्हटले. केंद्राकडून आता राज्याला किती मदत होते, हे पाहण्यासारखे ठरणार आहे. मोठा दुष्काळ राज्यात पडला आहे. ऑक्टोबर महिन्यात उन्हाचा कडाका वाढला आहे. स्थिती अधिक गंभीर होताना दिसत आहे. पुढील काही महिन्यात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न आहे.

Follow Us
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवास्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवास्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाई...
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाईमुळे नातेवाईकांची तीव्र नाराजी
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात अवमान याचिका! सुनावणी सुरु
अभिजीत दीपकेंवर 20 हुन अधिक FIR दाखल मात्र 'या' कारणावरून दिलं जामीन,
अभिजीत दीपकेंवर 20 हुन अधिक FIR दाखल मात्र 'या' कारणावरून दिलं जामीन, गेल्या 24 तासांत नेमकं काय घडलं?
अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात नवरात्रोत्सवाचा जल्लोष! पहाटेपासूनच...
अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात नवरात्रोत्सवाचा जल्लोष! पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी
CJP आंदोलनातील अभिजित दिपके यांच्यासह तिन्ही नेत्यांना जामीन, पोलिस...
CJP आंदोलनातील अभिजित दिपके यांच्यासह तिन्ही नेत्यांना जामीन, पोलिस कोठडीतून सुटका
मोठी बातमी! CJP च्या दिपके, सौरव दास, रांका यांची सुटका, हमीपत्रावर...
मोठी बातमी! CJP च्या अभिजीत दिपके, सौरव दास, रांका यांची सुटका, हमीपत्रावर लिहून घेतली अट
ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याठी पुन्हा आंदोलन; दिल्लीला छावणीचे...
Ajinkya Shinde : ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याठी पुन्हा आंदोलन; दिल्लीला छावणीचे स्वरूप