AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मेट्रो 4’च्या ट्रायलवेळी देवेंद्र फडणवीस यांनी केले एकनाथ शिंदेंचे अभिनंदन, म्हणाले, त्यांच्यामुळे..

Mumbai Metro 4 Trial : मेट्रो मार्ग 4 व 4 अ च्या टप्पा-1 प्राधान्य विभागावर तांत्रिक तपासणी व ट्रायल रनला सुरुवात एमएमआरडीए केली आहे. यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित होते.

'मेट्रो 4'च्या ट्रायलवेळी देवेंद्र फडणवीस यांनी केले एकनाथ शिंदेंचे अभिनंदन, म्हणाले, त्यांच्यामुळे..
Devendra Fadnavis
| Updated on: Sep 22, 2025 | 12:28 PM
Share

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मेट्रो मार्ग 4 व 4 अ च्या टप्पा-1 प्राधान्य विभागावर तांत्रिक तपासणी व ट्रायल रनला सुरुवात एमएमआरडीए केली आहे. ही तपासणी टप्पा-1 मधील गायमुख जंक्शन गायमुख गाव- घोडबंदर रोड- कासारवडवली- विजय गार्डन याप्रमाणे. नुकताच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी याला हिरवा झेंडा दाखवला असून फडणवीस आणि शिंदे मेट्रोने प्रवास करत आहेत. या प्रक्रियेत कमिशनर ऑफ मेट्रो रेल सेफ्टी (CMRS) यांच्या आवश्यकतेनुसार सर्व तांत्रिक प्रणाली सज्ज आहेत. या विभागातील मूलभूत पायाभूत सुविधा उड्डाणपूल (Viaduct), मार्गिका (Track) आणि ओव्हरहेड इक्विपमेंट (OHE) पूर्ण झाल्या आहेत.

यादरम्यान बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, या महत्वाच्या मेट्रो मार्गाचे टेस्टिंग आज आम्ही करत आहोत. हा मार्ग अत्यंत महत्वाचा अजून या मेट्रोची लांबी जवळपास 35 किलो मीटर आहे. 16 हजार कोटी याकरिता खर्च करण्यात येत आहेत. या मार्गीकेवरील जी मेट्रो असणार आहे ती, 8 डब्यांची असणार आहे. पूर्वउपनगरे, पश्चिम उपनगरे, ठाणे आणि मुंबईला जोडणारा हा महत्वाचा मार्ग होणार आहे.

58 किलो मीटरचा हा सर्व मार्ग होणार आहे आणि देशातील हा सर्वात मोठा मेट्रो मार्ग असेल. यामुळे जवळपास 21 लाख लोक प्रवास करू शकतील. या मेट्रो मार्गामुळे प्रवासाचा वेळ 50 टक्के कमी होणार आहे. रस्त्यावरील वाहतूक देखील यामुळे नियमित होणार आहे. मला आज आनंद आहे की, हा महत्वाचा टप्पा आज होतोय आणि टप्या टप्याने पुढच्या वर्षाच्या शेवटपर्यंत याचे सर्व टप्पे प्रवाशांसाठी खुले झाले पाहिजेत, अशाप्रकारचा आमचा प्रयत्न आहे.

पुढे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, मी विशेष: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन करेल. हा टप्पा होण्याकरिता त्यांनी विशेष प्रयत्न केले. आपल्याला मोगरपाड्याला डेपोची आवश्यकता होती आणि त्यांनी स्वत: लक्ष घालून अनेक अडचणीतून मार्ग काढत डेपोकरिता जागा मिळून दिली. आमदार सरनाईक यांनी देखील विशेष प्रयत्न केल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.