मराठी भाषा माझी आई तर हिंदी भाषा माझी मावशी… देवेंद्र फडणवीस यांचे मोठे विधान, अमित शाह..
हिंदी दिवस तसेच अखिल भारतीय राजभाषा संमेलन कार्यक्रमात अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे सहभागी झाले. अमित शाह कालपासून मुंबई दाैऱ्यावर आहेत. यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे विधान केले.

हिंदी दिवस तसेच अखिल भारतीय राजभाषा संमेलन कार्यक्रमात अमित शाह सहभागी झालेत. या कार्यक्रमात नवी मुंबईतील वाशी सिडको एक्सबिशन सेंटर सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, मद्रास प्रातांतून निवडून आलेल्या अय्यंगारजींनी हिंदी भाषेचा प्रस्ताव मांडला होता. हिंदी सोबत इंग्रजी ही राजभाषा असेल असा नंतर प्रस्ताव मांडला गेला. आपल्या देशात मातृभाषेचा आग्रह सुरु झाला. आपल्या पंतप्रधानांनी म्हटले आहे की, प्रत्येकाने त्याच्या राज्यातील मातृभाषा शिकलीच पाहिजे. कारण जे ज्ञान मातृभाषेतून मिळते ते दुसऱ्या कुठल्याही भाषेतून मिळू शकत नाही. मुन्शी प्रेमचंद यांनी हिंदी भाषेत जे साहित्य लिहले ते कालजयी आहे. मातृभाषेसोबत किमान एक भाषा शिकली पाहिजे.
पुढे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, देशातील सर्व भाषा खूप सुंदर आहेत… मराठी भाषा माझी आई आहे तर हिंदी भाषा माझी मावशी आहे. आईसोबत मावशीचाही सन्मान आहे. मातृभाषा शिकलीच पाहिजे, असं मोदी नेहमीच म्हणतात. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते. एकनाथ शिंदे यांनी कालच अमित शाह यांची भेटत घेतली.
एकनाथ शिंदे यांनी या कार्यक्रमात बोलताना म्हटले की, जे असभंव वाटत होते ते अमित शाह यांनी शक्य करुन दाखवले…काश्मीरचे 370 कलम हटवून दाखवले. देशभरातून आलेल्या सर्व साहीत्यिकांचे मी येथे स्वागत करतो. 14 सप्टेंबरची फक्त एक तारीख नाही….हिंदी व मराठी भाषा फक्त देवनागरी लीपीची अपत्ये नाहीत. तर आपला अभिमान आहे.
संत नामदेवांची रचना हे दाखवून देते की दोन्ही भाषेत एक नाते आहे. आता वातावरण बदलले आहे…2014 नंतर अमित भाई हिंदी भाषेचा गौरव वाढवला आहे. त्यांच्या सहकारिता विभागात हिंदीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. या कार्यक्रमाकडे सर्वांच्या नजरा आहेत. अमित शाह कालपासून मुंबई दाैऱ्यावर आहेत. गणेशोत्सवाच्या काळात त्यांच्या या मुंबई दाैऱ्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
