AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मी बालसाहित्य वाचत नाही’; फडणवीसांची संजय राऊतांच्या पुस्तकावर एका वाक्यात प्रतिक्रिया

शिवेसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपलं पुस्तक  ‘नरकातील स्वर्ग’  मध्ये राजकारणातील खळबळजनक गौप्यस्फोट केले आहेत. या पुस्तकावर प्रतिक्रिया देताना फडणीस यांनी संजय राऊत यांना खोचक टोला लगावला आहे.

'मी बालसाहित्य वाचत नाही'; फडणवीसांची संजय राऊतांच्या पुस्तकावर एका वाक्यात प्रतिक्रिया
| Updated on: May 16, 2025 | 2:54 PM
Share

शिवेसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपलं पुस्तक  ‘नरकातील स्वर्ग’  मध्ये राजकारणातील खळबळजनक गौप्यस्फोट केले आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासंदर्भात मोठा दावा केला आहे. ‘गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि तत्कालीन गृहराज्यमंत्री अमित शाह यांना शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांनी कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन मदत केली’ असं त्यांनी आपल्या पुस्तकामध्ये म्हटलं आहे, दरम्यान संजय राऊत यांच्या या गौप्यस्फोटानंतर आता भाजप नेत्यांकडून संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्या या पुस्तकावर प्रतिक्रिया देताना खोचक टोला लगावला आहे.

नेमकं काय म्हणाले फडणवीस? 

मी कादंबऱ्या वाचणे कधीचं सोडलेले आहे, कथा, कादंबऱ्या आणि बालवाड्मय वाचायचं माझं वय राहिलेलं नाही.  त्यामुळे असल्या गोष्टी मी वाचत नाही, त्यांचे सोडून द्या, ते खूप मोठे नेते आहेत का असो खोचक टोला यावेळी फडणवीस यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.

दरम्यान लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत? या निवडणुकांबाबत आता सर्वांनाच उत्सुकता निर्माण झाली आहे. या निवडणुका महायुती म्हणून लढवणार का? असा प्रश्न देखील यावेळी देवेंद्र फडणीस यांना विचारण्यात आला, याला देखील फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे, आम्ही महायुती म्हणूनच निवडणुका लढवणार आहोत, असं त्यांनी म्हटलं आहे.

काय आहे संजय राऊत यांचा दावा? 

संजय राऊत यांनी आपल्या ‘नरकातील स्वर्ग’  या पुस्तकात अनेक गौप्यस्फोट केले आहेत.  ‘गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि तत्कालीन गृहराज्यमंत्री अमित शाह यांना शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांनी कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन मदत केली’ असं त्यांनी आपल्या पुस्तकामध्ये म्हटलं आहे. यातील अनेक घटनांचा मी साक्षीदार आहे, यातील अनेक घटना मी माझ्या डोळ्यांनी पाहिल्या आहेत, असंही राऊत यांनी यावेळी म्हटलं.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?