AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadnavis : कुणाल कामरावरुन सुरु असलेल्या वादावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

Devendra Fadnavis : स्टँडअप कॉमेडीयन कुणाल कामरा याच्यावरुन वाद सुरु आहे. त्याने एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आक्षेपार्ह गाण गायलं. आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी त्याचा स्टुडिओ फोडला. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या सर्व विषयावर प्रतिक्रिया आली आहे.

Devendra Fadnavis : कुणाल कामरावरुन सुरु असलेल्या वादावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया
Devendra Fadnavis Image Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Mar 24, 2025 | 11:24 AM
Share

“स्टँडअप कॉमेडी करण्याचा कोणालाही अधिकार आहे. पण स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा कोणालाही अधिकार नाही. कामराला हे माहित असलं पाहिजे की, महाराष्ट्रातील जनतेने 2024 साली कोण गद्दार आणि कोण खुद्दार ते दाखवून दिलय. कोणाकडे स्वर्गीय हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची विरासत आहे. हे जनतेने ठरवलेलं आहे” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. स्टँडअप कॉमेडीयन कुणाल कामराने शिवसेना पक्षप्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल गाण गाताना जे आक्षेपार्ह शब्द वापरले त्यावर मुख्यमंत्र्यांनी टीका केली.

“अशा प्रकारची खालच्या दर्जाची कॉमेडी करुन आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेते, ज्यांच्याबद्दल राज्यातील जनतेमध्ये आदर आहे, त्यांच्याविषयी असा अनादर करण्याचा कोणालाही अधिकार नाही” असं देवेंद्र फडणवीस यांनी निक्षून सांगितलं. “हे चुकीच आहे. तुम्ही कॉमेडी करा, व्यंग करा. पण अपमानित करण्यात काम कोणी करत असेल, तर ते सहन केलं जाणार नाही” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

‘स्वैराचार करता येणार नाही’

“कुणाल कामराने माफी मागितली पाहिजे. ते संविधानाच पुस्तक दाखवतात. त्या संविधानाची त्यांना माहिती असेल, त्यांनी वाचलं असेल, तर संविधानाने सांगितलय स्वातंत्र्याचा स्वैराचार करता येणार नाही. तुम्हाला दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण करता येणार नाही. त्यांनी माफी मागितली पाहिजे” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Follow Us
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत